Skip to main content

अनोळखी वाट

लेखक अनन्त्_यात्री यांनी बुधवार, 30/05/2018 21:05 या दिवशी प्रकाशित केले.
अनोळखी वाट घनदाट वनी मला नेते निब्बरल्या तनामना नितळ सावली देते हिरव्या रंगाच्या छटा पानोपानी अगणित सळसळ लहरते वार्‍यासंगे अविरत विजनात दूरवर घुमतसे घुघुत्कार पसरती अंधाराचे पडसाद रानभर पाखरांनो घरट्यात पिले हळूच जोजवा लखलख काजव्यांचा झाडाझाडावर दिवा
काव्यरस

आकाश के उस पार भी आकाश है

लेखक पुष्कर यांनी बुधवार, 30/05/2018 14:01 या दिवशी प्रकाशित केले.
आपल्याला असा कधी प्रश्न पडला आहे का, की माणूस नेहमी सगळ्या वस्तूंना ठराविक आकारच का देतो? आमची घरे चौकोनी असतात. आमची पुस्तके चौकोनी, संगणकसुद्धा एका विशिष्ट आकाराचा; सगळीकडे चौकोन, आयत, त्रिकोण, गोल हेच आकार. आम्ही एखादे वेळी त्रिकोण किंवा पिरेमिड बांधतो. पण पृथ्वीवर सगळीकडे जमीन उंच-सखल आहे, आम्ही ती सपाट करून टाकतो. खोल भागात भराव टाकतो, डोंगर फोडून काढतो. पण सृष्टी अशी कुठे आहे? कुठला डोंगर अगदी बरोबर त्रिकोणी अथवा शंकू आकाराचा असतो? ढगांना कधी विशिष्ट आकार असतो का? आपले हात, पाय, नाक, डोळे, सगळेच वेगळे आकार. हे आकार आपण भूमितीमध्ये शिकतच नाही.

मित्र

लेखक अविनाशकुलकर्णी यांनी बुधवार, 30/05/2018 13:48 या दिवशी प्रकाशित केले.
मित्र तो रिटायर्ड झाला अन त्याला सोशल नेटवर्क आवडु लागले कथा कविता..काही अनुभव तो लिहितं असे.. फेसबुक वरच्या पोस्टा वाचत होता..अन तेव्हढ्यात "तो" आला हॅलो..तो म्हणाला. तू?? हो मी च ....ओळखले का मला? अरे मित्रा तुला कोण विसरणार? ऍट्याक आला होता.. आय सी यू त ऍडमिट असताना कायम माझ्या भोवती तू उभा असायचास..खास मित्र आहेस तू. आता काय विशेष?..तो म्हणाला... काही नाही..चला आमच्या बरोबर..वेळ भरली आपली... कुठे नेतोस बाबा ??

औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: २

लेखक सुधीर कांदळकर यांनी बुधवार, 30/05/2018 09:56 या दिवशी प्रकाशित केले.
हिपोक्रेटस इ.स.पू. ४६० मध्ये जन्माला आला तर सुश्रुत इस.पू. सुमारे ६०० वर्षे. म्हणजे सुश्रुत हा कालक्रमाने हिपोक्रेटसच्याही अगोदरचा आहे. महाभारतातील एका उल्लेखाप्रमाने सुश्रुत हा विश्वामित्र ऋषींचा पुत्र होय. सुश्रुतसंहिता या ग्रंथाचा आजही आदराने उल्लेख केला जातो. सुश्रुतसंहितेत १८४ श्लोक आहेत . त्यात ११२० व्याधींचे तसेच ७७० औषधी वनस्पतींचे वर्णन आहे. ६४ खनिज स्त्रोत असलेल्या औषधांचे आणि ५७ प्राणीस्रोत असलेल्या औषधांचे वर्णन आहे. शस्त्राने शरीराचा छेद घेणे, टोचणे, शरीरात घुसलेली बाह्य वस्तू बाहेर काढणे, जखम चिघळू नये किंवा बरी व्हावी म्हणून रसायनांच्या साहाय्याने चटका देणे इ.

औषधशास्त्र, औषधे, वैद्यक: १

लेखक सुधीर कांदळकर यांनी बुधवार, 30/05/2018 09:48 या दिवशी प्रकाशित केले.
मानवाच्या शरीरातील व्याधी आणि विकृती कमीत कमी वेदनामय मार्गाने दूर करून एक सुखकर, उत्साही आणि निरोगी आयुष्य त्याला द्यावे हे अंतिम ध्येय प्रत्येक औषधी चिकित्साप्रणालीचे असावे यात दुमत नसावे. कफ, पित्त आणि वात हे तीन दोष म्हणजेच त्रिदोष मानवी शरीरात संतुलित अवस्थेत असतात आणि त्यांच्या असंतुलनामुळे मानवी शरीरात विविध व्याधी निर्माण होतात. औषधयोजना किंवा/आणि पथ्य, जीवनशैली, इत्यादी आणि पंचकर्मादि विविध उपाययोजना करून वाढीव दोषांचे दमन करून दूर करून वा त्यांचा समतोल साधून व्याधी दूर करून रुग्णाला निरोगी अणि आनंदी दीर्घायुष्य मिळवून द्यावे ही एक प्राचीन आयुर्वेदिक संकल्पना आहे.

राजयोग - ६

लेखक रातराणी यांनी बुधवार, 30/05/2018 03:56 या दिवशी प्रकाशित केले.
गोमती नदीच्या दक्षिण दिशेचा किनारा एका ठिकाणी बराच उंच आहे. पावसाच्या पाण्याने आणि नदीच्या छोट्या छोट्या प्रवाहानी तिथे अनेक गुहा, भुयारं तयार झाली आहेत. आठळ्या इतस्ततः पसरलेल्या लहान मोठ्या खडकांमधून पाण्याचे वेडेवाकडे प्रवाह वाट काढत मुख्य नदीत जाऊन मिसळत होते. तिथे आजूबाजूला अजिबात झाडे वाढली नव्हती. टेकडीवरच्या खडकांमध्ये एखाद दुसरं चुकार रोपटं उगवलं होतं. पण इथून थोडंस दूर अंतरावरून सागवान आणि निलगिरीच्या मोठमोठ्या वृक्षांनी या किनाऱ्याला अर्धचंद्र आकारात वेढलं आहे. मंदिराच्या आसपास उंच उंच वाढलेल्या झाडांमुळे विस्तीर्ण आकाश दिसू शकत नसे. इथे मात्र नजर जाईल तिथे मोकळं आकाश दिसायचं.

"अथातो घाटजिज्ञासा" - भाग २ रा

लेखक दिलीप वाटवे यांनी मंगळवार, 29/05/2018 23:29 या दिवशी प्रकाशित केले.

'घाटवाटा म्हणजे काय'?

शिवकालीन इतिहासाचा अभ्यास करताना 'सह्याद्री आपले सामर्थ्य आणि आपल्या शत्रूंचे दौर्बल्य आहे' हे महाराजांनी पुर्णपणे ओळखलं होतं हे जाणवतं. तसं पहायला गेलं तर शिवकाळात मराठ्यांची मनुष्यबळ, युद्धसामग्री आणि आर्थिक बाजू अतिशय कमकुवत होती. पण केवळ याच सह्याद्रीच्या मदतीने त्यांनी आखलेले आपले डावपेच पुर्णत्वास नेले. त्या वेळचं मराठ्यांचं सैन्य म्हणजे समाजातील सामान्यातलं सामान्य घटक होतं.

बाप ….

लेखक मनिष यांनी मंगळवार, 29/05/2018 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
सगळ्या बापांसारखेच, आपल्या बापालाही काही कळत नाही याची खात्री पटल्यानंतर… मला ह्याच शाळेत का घातलं? फुटबॉल ऐवजी क्रिकेटला का नाही टाकलं? असे आरोप केल्यानंतर… बाप आहे ना, तो चुकतोच. आपल्यासारखा स्मार्ट तो मुळात नसतोच हे समजून चुकल्यानंतर… मग तू स्वतः बाप झाल्यावर, वैतागून पोरांना ओरडून झाल्यावर प्रेमाने जवळ घेतल्यानंतर… कधीतरी आठवेल का तुला लहानपणी तू शांत झोपल्यावर, कित्येकदा तुझ्या केसांमधून हात फिरवत, हळूच तुझी पापी घेऊन, तुला एकटक पहात असतांना भरून आलेले माझे डोळे. माझ्या गालांवरून ओघळणारे ते पाणी कधीतरी उतरेल का तुझ्या डोळ्यात, माझ्या हळव्या आठवणीने मी नसल्यानंतर? ~ मनिष (28/5/2018)

रम्य ते बालपण- आंब्याचा सिझन

लेखक OBAMA80 यांनी मंगळवार, 29/05/2018 15:26 या दिवशी प्रकाशित केले.
आंबा या शब्दांतच मला फार रस आहे. सर्व फळांचा हा राजा. त्यात देवगडचा/रत्नागिरी हापूस म्हणजे जणू चक्रवर्ती सम्राटच. केसरी, तोतापूरी, पायरी, बैंगनपल्ली इ. बाकीच्या आंब्याच्या जाती या सम्राटाचे जणू मांडलिक राजेच. उन्हाळ्यात दिग्वीजयाला निघालेला हा सम्राट पुण्या-मुंबईतच श्रीमंताचा पाहुणचार करत रमायचा. सोलापूरसारख्या कोकणापासून दूर रहाणार्‍या आम्हां सामान्य जनतेला आमच्या लहानपणी याची फारच वाट पहावी लागायची. सामान्य जनतेला हा सम्राट फारच “महाग” होता.