Skip to main content

फेसबुकवरचे आश्चर्यकारक जाहिरातविश्व : रु. १२० खर्चून प्राप्त झालेले ज्ञान

लेखक चहाबिस्कीट यांनी शनिवार, 23/06/2018 09:26 या दिवशी प्रकाशित केले.
या लेखाची पीडीएफ लिंक (अद्ययावत नाही)

नमस्कार,

आमचा सध्या चालू असलेला उपक्रम, म्हणजे वेगवेगळ्या खेळांचे नियम सांगणारी वेब सिरीज, हिची माहिती अधिकाधिक लोकांना व्हावी म्हणून काय करता येईल याचा आम्ही विचार करत होतो. वॉट्सअप वर सर्वाना लिंक पाठवूनही व्यूझ फारसे वाढेनात, म्हणून कोणीतरी सजेस्ट केलं फेसबुकवर लिंक टाकून पहा.

'व्हेअर द माईंड इज विदाऊट फिअर' कवितेचे अनुवाद

लेखक माहितगार यांनी शनिवार, 23/06/2018 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
मी अलिकडे मिपावर कितीसा पुरोगामी आहेस ? हि कविता लिहिली. :) (त्या कवितेची प्रेरणा विशीष्ट मिपाकर आहेत असे वाटण्याचा संभव आहे :), तसे खरे असण्यास हरकत नव्हती :) पण त्यांच्या दुर्दैवाने -ते दुर्दैवावर विश्वास ठेवत नसलेतरी आम्ही ठेवतो :) - त्या कवितेची तात्कालीक प्रेरणा अभारतीय आमेरीकन व्यक्तीचे अभारतीय विषयावरचे लेखन आहे :( ) कितीसा पुरोगामी आहेस ? कवितेस तुम्ही पुरोगाम्यांनाच का टार्गेट करता परंपरावाद्यांना का नाही असा एक तरी प्रतिसाद यावा अशी राहून राहून इच्छा होती.
काव्यरस

मृत्यू – समाधी, प्रायोपवेशन, बलिदान आत्महत्या वगैरे

लेखक आदित्य कोरडे यांनी शनिवार, 23/06/2018 06:46 या दिवशी प्रकाशित केले.
मृत्यू – समाधी, प्रायोपवेशन, बलिदान आत्महत्या वगैरे... सध्या भैयुजी महाराजांच्या आत्महत्येने बराच गोंधळ (फक्त सोशल मिडीयावर) चालू आहे. अगदि परवा परवा हिमांशू राय ह्यांनी दीर्घ आजारपणाला कंटाळून आत्महत्या केली तेव्हा देखील एवढा गदारोळ मजला नव्हता, म्हणजे हळहळ सगळ्यानी व्यक्त केली पण हे भैयुजी महाराज पडले महाराज, राष्ट्रसंत वगैरे, मग संत, महाराज, बाबा वगैरे लोकांनी आत्महत्या करावी का असे प्रश्न विचारले जाऊ लागले . कसा काय कुठून पण समाधी घेणे म्हणजे एक प्रकारे आत्महत्या नाही काय, स्वा.सावरकरानी प्रायोपवेशनाने प्राणार्पण केले ती आत्महत्या नव्हती काय?

प्रकाश

लेखक मिसळलेला काव्यप्रेमी यांनी शनिवार, 23/06/2018 04:14 या दिवशी प्रकाशित केले.
त्या हातांचे मेहंदीभरले तळवे तळव्यांमध्ये दिवा दिव्यात तेल तेलावर वात वातीचा प्रकाश अन् प्रकाश थेट चेहर्‍यावर . . . प्रकाशाचा वेगच अफाट |- मिसळलेला काव्यप्रेमी -| (२२/०६/२०१८)

डेव्ह फर्नांडिस बुलेटिन - जुन २०१८

लेखक साहना यांनी शनिवार, 23/06/2018 01:42 या दिवशी प्रकाशित केले.
१. महाराष्ट्र शासनाने शनी शिंगणापूर ह्या हिंदू मंदिरावर कब्जा करण्याची प्रक्रिया सुरु केली आहे. [१] हिंदू स्वराज्याच्या स्थापने साठी नवीन राजसत्ता उभी करणाऱ्या शूरांच्या भूमीत सध्या शनिदेव सुद्धा शासनाच्या वक्रदृष्टीपासून वाचू शकत नाहीत. हिंदू भाविकांचा पैसे गिळंकृत करून शासन हा पैसा आपल्यावर आणि बाबू लोकांवर खर्च करणार आहे. (हल्लीच शिर्डी संस्थानचे ७१ कोटी रुपये सरकारी मेडिकल कॉलेजना काढून देण्यात आली) २.

पावसाळी भटकंती: भिवगड / भिमगड (Bhivgad/Bhimgad )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 22/06/2018 17:11 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्रातील "भटक्यांची पंढरी" असा प्रदेश म्हणजे, लोणावळा, कर्जत परिसर. त्यातील कर्जत हा केंद्रबिंदु धरला तर सुप्रसिध्द थंड हवेचे ठिकाण, माथेरान, सह्याद्रीतील कदाचित सर्वात प्राचीन लेणी, कोंढाणे, असंख्य धबधब्यांचे माहेरघर म्हणावे अश्या डोंगररांगा आणि राजमाची, ढाक, कोथळीगड उर्फ पेठचा किल्ला, पदरगड, तुंगी, पेब, सोनगिरी उर्फ पळसदरीचा किल्ला, अपरिचित सोंडाईचा किल्ला अशा असंख्य गडांनी वेढलेले कर्जत गाव भटक्यांचे फेव्हरिट डेस्टिनेशन झाले नसते तर नवलच.

लेखणी का कीबोर्ड ? (उत्तरार्ध)

लेखक हेमंतकुमार यांनी शुक्रवार, 22/06/2018 13:05 या दिवशी प्रकाशित केले.
पूर्वार्ध इथे आहे: https://www.misalpav.com/node/42843 * * * * * * इ-माध्यम सध्या यांत प्रसिद्ध होणारे साहित्य ते साधारण ३ गटांत मोडते: १. वैयक्तिक अनुदिनी: येथे एखादा लेखक त्याचे लेखन स्वतःच जालावर नियमित प्रसिद्ध करतो. या प्रकारे जगातील कोणीही इच्छुक लेखक बनू शकतो आणि मनसोक्त, विनाअडथळा लिहू शकतो. २. संस्थळे: यांना एक प्रकारे जालावरची नियतकालिके म्हणता येईल.

मा.ल.क.-४

लेखक शाली यांनी गुरुवार, 21/06/2018 21:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रवासात रस असल्याने त्याच्या आयुष्यातला बराचसा कालखंड हा प्रवासातच व्यतीत झाला होता. अनेक भुभाग, अनेक देश, त्यांचे रितीरिवाज, संस्कृती, भाषा, कला पहात तो बराच फिरला होता. आज मात्र दिवसभर चालूनही त्याला थकवा आला नव्हता. कारण आजुबाजूचा सधन शेती, निसर्ग असलेला भाग, त्या भागातून जाणारा रस्ता, रस्त्यातील विश्रांती स्थळे, पाणपोया या सगळ्यांची व्यवस्थित काळजी घेतलेली दिसत होती. तो शहराच्या प्रवेशद्वारावर पोहचला तेंव्हा पहारेदारांनी अत्यंत नम्रपणे पण कसोशीने त्याची चौकशी करुन त्याला शहरात प्रवेश दिला होता. “राजधानीचे शहर असल्याने काटेकोर चौकशी करावी लागते” असे सांगत त्यांनी दिलगीरी व्यक्त केली होती.