छंद पाककलेचा
भातूकली खेळता खेळता अलगद कधी मला पाककलेची आवड निर्माण झाली ते कळलेच नाही. भातूकलीत अंगणातल्या झाडपाल्यांची भाजी करता करता हळू हळू आजी आणि आईकडे खर्या भाज्या मागून छोटीशी चुल लावून भातुकलीतले खरे जेवण बनवू लागले. दोघींनीही कधी भाज्या फुकट जातात किंवा इतर गोष्टींमुळे मनाई केली नाही व घरातील सगळेच माझ्या भातुकलीतल्या जेवणाची (माझ्या समोर) नाके न मुरडता, खोटी का होईना वाहवा करत आले त्यामुळे माझी आवड कले कलेने वाढत गेली. शालेय जीवनातील आठवी-नववी पासून विविध पुस्तकांमध्ये लिहीलेल्या रेसिपी वाचून नविन नविन पदार्थ बनविणे हा माझा रोजच्या दिनक्रमातील रिकाम्या वेळातील आवडता छंद झाला.
मिसळपाव