Skip to main content

निमंत्रण----"श्यामरंग...त्या त्यांचे प्रश्न आणि कृष्ण!"

लेखक प्राची अश्विनी यांनी शुक्रवार, 10/08/2018 12:51 या दिवशी प्रकाशित केले.
सस्नेह नमस्कार! आम्ही सादर करत असलेल्या "श्यामरंग.....त्या, त्यांचे प्रश्न.. आणि कृष्ण" या नाट्य- संगीत-नृत्याविष्काराच्या प्रयोगासाठी आग्रहाचं निमंत्रण! शुक्रवार दिनांक ३१ ऑगस्ट २०१८. रात्रौ ८.३०ते ११ काशिनाथ घाणेकर नाट्यगृह, वसंत विहार, ठाणे येथे अंतर्नाद, ठाणे निर्मित, अपूर्व प्राॅडक्शन प्रस्तुत श्यामरंग सादर होतोय. कृष्ण आणि त्याच्या आयुष्यातील स्त्रियांच्या नात्यातील काही अनवट पैलूंवर, प्रश्नांवर, त्यातील रंगांवर आधारित ही कलाकृती आहे. अभ्यासपूर्ण निवेदन, नाट्य, संपूर्णपणे नवीन संगीत, त्यावर आधारित नृत्य असा एकूण थाट आहे. नाट्यक्षेत्राशी काहीही संबंध नसतानाही एक धाडस करतोय.

अनवट किल्ले ३७ : जंजाळा उर्फ वैशागड ( Janjala / Vaishagad )

लेखक दुर्गविहारी यांनी शुक्रवार, 10/08/2018 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
महाराष्ट्राची पर्यटन राजधानी म्हणून औरंगाबादची ओळख आहे. या पर्यटन राजधानीच्या जिल्ह्यातच जंजाळा किल्ला वसला असुन हि तो फारसा कोणाला माहिती नाही. याच गडाला वैशागड किंवा तलतमचा किल्ला म्हणुनही ओळखला जातो. स्थानिक लोक त्याला "सोनकिल्ला" किंवा "लालकिल्ला" या नावानेही ओळखतात. हा किल्ला कधी आणि कुणी बांधला या बाबत इतिहासकारांत मतभेद आहेत. इ.स. पाचव्या शतकातील वाकाटक काळापासून शेकडो वर्षांचा साक्षीदार असलेला हा किल्ला आजही दुर्लक्षित आहे. जंजाळा गावाचे पूरातन नाव जिंजाला होते. घटोत्कच लेण्यातील शिलालेखात अश्मकच्या राजकन्येचा उल्लेख आहे. वाकटाक नरेशाचा मंत्री वराहदेव याने ही लेणी इ.स.

पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग ३: एक सुंदर ट्रेक: ध्वज मन्दीर

लेखक मार्गी यांनी गुरुवार, 09/08/2018 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
भाग ३: एक सुंदर ट्रेक: ध्वज मन्दीर पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग १: प्रस्तावना पिथौरागढ़मध्ये भ्रमण भाग २: पर्वतात वसलेलं एक गांव- सद्गड २९ नोव्हेंबर २०१७ ची थंड सकाळ आणि हिमालयाच्या कुशीत वसलेलं सद्गड गांव! रात्री थंडी खूप होती. रात्री एकदा जाग आली तेव्हा चांगलीच थंडी होती. घर अगदी डोंगरात आणि रानाच्या जवळ वसलेलं आहे. इथले लोक सांगतात की, रात्री वन्य प्राणी इथे फिरतात. त्यांनी शेताला नुकसान पोहचवू नये म्हणून लोक शेतात इलेक्ट्रिक ताराही बसवतात.

बॅचलर लोकांचा आख्खा मसूर

लेखक मीता यांनी गुरुवार, 09/08/2018 22:20 या दिवशी प्रकाशित केले.
ढगाळ वातावरण आणि वातावरणात भरून राहिलेला आळस.. रविवार आरामात चालला होता..पोटातले कावळे हळू हळू आवाज देत होते ..त्यांना तेवढ्यापुरतं चाऊ माऊ देऊन गप्प केलं .. इतक्यात आईचा कॉल आला.. इकडचं तिकडंच बोलून अंदाज घेत विचारलं ..आज काय केलं होतं जेवायला .. आम्ही काही चहा बिस्किटांवर नाही दिवस काढत .. मसूर केला होता आज .. इति मातोश्री मसूर ऐकल्यावर पोटातल्या कावळ्यांनी लिटरभर लाळ गाळली .. डोक्यात चक्र फिरली.. आणि परिस्थिती , उपलब्ध साधन सामुग्रीचा विचार करता आज मसूरची भाजी करणे शक्य आहे असं conclusion निघालं . रूमीला विचारलं तर तिला १००० प्रश्न पडले ..

पहिले महायुद्ध! प्रकरण १ भाग३

लेखक आदित्य कोरडे यांनी गुरुवार, 09/08/2018 21:48 या दिवशी प्रकाशित केले.
आधीच्या भागांची लिंक https://www.misalpav.com/node/43088 https://www.misalpav.com/node/43118 मागील प्रकरणात आपण बिस्मार्क, जर्मनीचे एकीकरण, जर्मन राष्ट्र उभारणी, कैसर विल्हेल्म दुसरा ह्याचे जर्मनीच्या राजकीय क्षितिजावर आगमन एवढा भाग पाहिला. इथून पुढे घडत जाणाऱ्या घटना ह्या युरोपियन राष्ट्र आणि सत्ताधार्यांची मानसिकता कशी होती आणि ती कशी बनत/ बदलत गेली त्यावर प्रकाश टाकतात ....

भारांच्या जगात... ३

लेखक अजिंक्य विश्वास यांनी गुरुवार, 09/08/2018 00:18 या दिवशी प्रकाशित केले.
भारांच्या जगात... ३ मुक्काम शेंडेनक्षत्र- भा. रा. भागवत मुक्काम शेंडेनक्षत्र ज्यूल्स व्हर्नच्या ' ऑफ ऑन अ कॉमेट' (Off on a comet) या कादंबरीचा हा दुसरा रोमांचकारी भाग!.

पनीरमटर सासावडी,पराठा पुनवडी! ;)

लेखक अत्रुप्त आत्मा यांनी बुधवार, 08/08/2018 16:47 या दिवशी प्रकाशित केले.
अंक पहिला:- तर काय झालं म्हैत्ये का...काल सक्काळी सक्काळी बायकू म्हनली आज मी आजेबात सैपाक करनार नाय..नाष्टा जोरात करायचा आणि सगळ्या अस्ताव्यस्त पडलेल्या वस्तू आनि सामान णवीण केलेल्या फर्निचर मदी लावायचं!(कुणी???हा प्रश्न टाळून!

अज्ञानात सुख आहे

लेखक मीउमेश यांनी बुधवार, 08/08/2018 13:21 या दिवशी प्रकाशित केले.
काही दिवसांपूर्वी एका वृत्तपत्रात माझी आजी या विषयावर एका टीव्ही कलाकारानं खूप छान लेख लिहिला होता. तो लेख वाचल्यावर आमचे एक नातेवाईक खूप प्रभावित झाले त्यांनी त्या लेखकाला ( टीव्ही कलाकाराला ) भेटण्याची इच्छा केली आणि मी ती भेट घडवून आणली. जेव्हा त्या कलाकाराला त्या लेखा विषयी प्रश्न विचारले तेव्हा तो खूप बिचकाला , त्याच्या शारीरिक हालचाली वरून त्याने तो लेख लिहिला नव्हता असा माझ्या ध्यानात आले ( बॉडी लँग्वेज, संभाषण यांवरून लोकांना ओळखणं त्यांचं मूल्यमापन करणं हेच माझं काम असल्याने ) . त्या लेखाबद्दल चर्चा करताना त्या कलाकाराला सहज उत्तर देता येत नव्हती .

उलूक परिवार कथा

लेखक विवेकपटाईत यांनी बुधवार, 08/08/2018 09:30 या दिवशी प्रकाशित केले.
बालीत कपडे स्वस्त मिळतात. सरकारी कामातूनवेळ काढून खरीदारी करायला गेलो. मालमध्ये फिरताना, लाकडाचे आई, बाबा आणि बाळ या उलूक परिवाराने ध्यान आकर्षित केले. खरीदारी पूर्ण झाली, तरीही सारखे-सारखे लक्ष त्या उलूक परिवाराकडे जायचे, जणू ते म्हणत होते, आम्हाला हि तुझ्या सोबत यायचे आहे. अखेर राहवले नाही, भारतीय मुद्रेत फक्त ८० रुपये देऊन उलूक परिवार खरेदी केला. काही सहकार्यांनी माझ्याकडे विचित्र नजरेने पाहिले. एक दुसर्याच्या कानात, मला ऐकू येईल एवढ्या जोरात म्हणाला, "शायद दिल के साथ दिमाग भी खराब हो जाता है" दुसरा उद्गरला "नहीं यार, पटाईतजी पठिया (सठिया) गए है".

राजयोग - १६

लेखक रातराणी यांनी बुधवार, 08/08/2018 04:13 या दिवशी प्रकाशित केले.
शेवटी एकदाचे रघुपती आणि नक्षत्रराय राजमहलला पोचले. पराजित होऊन पळून आल्यावर शुजा नवीन सैन्याची जमवाजमव करण्याचा प्रयत्न करीत होता, पण राजकोष रिकामा झाला होता. प्रजा कराच्या ओझ्याने त्रस्त होती. याच दरम्यान दाराचा पराजय आणि नंतर त्याची हत्या करून औरंगजेब दिल्लीच्या सिंहासनावर बसला. ही बातमी शुजाला मिळताच तो अस्वस्थ झाला. पण सैन्याची तयारी झाली नव्हती, काहीतरी करून अजून वेळ काढता यावा म्हणून त्यानं एक दूत औरंगजेबाकडे पाठवला.