Skip to main content

राजाची सभा

लेखक वन यांनी मंगळवार, 20/11/2018 11:25 या दिवशी प्रकाशित केले.
राजा येतो सगळे उठतात राजा बसतो सगळे बसतात राजाचे स्वागत होते सगळे टाळ्या पिटतात राजा सभोवार बघतो सगळे नजर फिरवतात राजाची बडबड सुरू होते सगळे शून्यात बघू लागतात राजा मधूनच जोरात बरळतो सगळयांच्या मुद्रा त्रासिक होतात राजा विजयी मुद्रेने सभोवार पाहतो सगळे सुटका होण्याची वाट बघतात राजाने अधिकार प्रदर्शित केलेला असतो सगळ्यांच्या सहनशक्तीचा अंत झाला असतो. ----------------------------–--------
काव्यरस

क्राईम डायरीज : एक शापित नातं: भाग ८

लेखक कलम यांनी सोमवार, 19/11/2018 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
अत्यंत सफाईदार वळणे घेत इन्स्पेक्टर पाटलांची पोलीस व्हॅन 'ग्रीन वाइल्ड रेसोर्ट' मध्ये शिरली तेव्हा इन्स्पेक्टर पाटील सकाळपासून घडलेल्या घटना आठवत होते. आज सकाळी सहा वाजता जेव्हा इन्स्पेक्टरांना फोन आला तेव्हा ते मॉर्निंग वॉक करून नुकतेच घरी पोचलेले होते. रिसॉर्ट मध्ये खुनाची केस हि फार गंभीर बाब होती. एक तर ग्रीन वाईल्ड हे फार मोठं आणि नावाजलेलं रिसॉर्ट होतं आणि दुसरं म्हणजे खुनाच्या बातमीनं रिसॉर्ट मध्ये वास्तव्यास असलेल्या इतर लोकांमध्ये असुरक्षिततेची भावना निर्माण होण्याची दाट शक्यता होती. सकाळच्या नाश्त्यासाठी पण न थांबता पाटील सगळ्यात आधी खून झालेल्या स्थळी पोहोचले.

जाणीव

लेखक अबोलघेवडा यांनी सोमवार, 19/11/2018 12:16 या दिवशी प्रकाशित केले.
जाणवे मज आज जेव्हा काहीच नसे इथे आपुले, सांगू कुणा ही व्यथाच माझी शोधूनी आता मन हे थकले ||१|| अथांग या दुनियेमधला जणू उपरा मी भाडेकरू, स्वकेंद्री अशा अवनीवरती कुणालाच मी माझे म्हणू? ||२|| मी यावे अथवा जावे लोचनी न कुणाच्या आसवे, कुणा न वाटे हृदयामधूनी मन मोकळे करावे मजसवे ||३|| धावतो मी रोज आहे काहीतरी मिळवावया, सिनेमाच तो पडदा नुसता वेळ लागला मज कळावया ||४|| कशापरी तू धाडीलेस मज सुटेल का कधी कोडे देवा? गतजन्मींच्या पापांचा वा पुण्याईचा म्हणू हा ठेवा?

माझं पहिलं ई - पुस्तक

लेखक नूतन यांनी सोमवार, 19/11/2018 11:52 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी, माझं पहिलं ई-पुस्तक 'अरण्यबंध'काल बुकगंगा.कॉम वर प्रकाशित झालं. हे पुस्तक म्हणजे प्रसिद्ध बंगाली पुस्तक "आरण्यक"( लेखक श्री बिभूतीभूषण बंदोपाध्याय) चा मराठी अनुवाद आहे. पुस्तकाविषयी थोडक्यात : कोलकात्यासारख्या महानगरात वाढलेला सत्यचरण एका जमिनदाराच्या मालकीच्या जंगल महालाचा इस्टेट मॅनेजर म्हणून रुजू होतो. पण त्या निर्जन अरण्यात आल्यानंतर आल्यापावली परत जाण्याचा विचार ते त्या अरण्याच्या प्रेमात पडणं, या परिवर्तनाचा आलेखं मांडणारं हे पुस्तक..... या सोबत ओघाने येणारी निसर्गवर्णनं, भेटलेली माणसं...

खरा इतिहास : वाल्मिकी/महार समुदाय हा पूर्वीचा क्षत्रिय

लेखक विवेकपटाईत यांनी सोमवार, 19/11/2018 11:37 या दिवशी प्रकाशित केले.
(भारतीय समाजात जातीभेदाचे विष पसरविण्यासाठी मूळ निवासी युरेशिअन इत्यादी थोतांड इतिहासाच्या नावावर पसरविले जातात. हे पसरविणारे स्वत:ला इतिहासकार इत्यादी म्हणवितात. खर म्हणाल तर आजच्या लोकांचे अध्ययन केले तरी खरा इतिहास कळू शकतो). हिमाचल प्रदेश येथील मंडी जिल्ह्यात लेकीच्या सासरी एक लग्नाला गेलो होतो. त्यावेळी राज्यात निवडणुकीचे दिवस होते. साहजिकच होते गप्पा मारताना राजनीती जातीपातीचा विषय निघणारच. हिमाचल प्रदेशात २७ टक्के अनुसूचित जातीचे लोक आहे, पण वाल्मिकी समुदाय २०११ जनसंख्यानुसार अर्ध्या टक्क्याहून कमी याचे कारण काय, हा प्रश्न आला.

घालमेल

लेखक लौंगी मिरची यांनी सोमवार, 19/11/2018 11:14 या दिवशी प्रकाशित केले.
“कबूल का करत नाहीस ? एकदाचं मान्य करुन मोकळी हो . रोजचं तीळ तीळ मरणं . त्यापेक्षा, एकदाच हो, आहे माझं तुझ्यावर प्रेम, तुझ्याशिवाय़ काहीच सुचत नाही, म्हण आणि मोकळी हो .” तो आज फार बोलत होता, माझी घुसमट पाहवत नव्हती त्याला. पण, मी एकटी ने मान्य करुन काय होणार होतं? जो मला हे मान्य करायला सांगतोय तो मात्र कुणा दुसरीतच अडकलाय आणि हो प्रामाणिकपणे हे पहिल्याच भेटीत सांगितलं. मग तरीही मी त्याच्यात का अडकली असेन? गुंतणं आपल्या हातात नसतं, हेच खरं. “मला समजून का घेत नाहीस? प्रेमाच्या भावना बदलता येत नसतात..

अतृप्त आत्मा -10

लेखक प्रमोद पानसे यांनी रविवार, 18/11/2018 15:19 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्याकडे बघताना नानाची नजर आजीबात स्थिर नव्हती.भयचकीत नजरेने आणी विदीर्ण चेहऱ्याने बघत नाना किंचाळला. "बाप्या भडव्या ! हा काय चावटपणा लावलायस " " हॕ हँ !! मालक माझा बोनस आणी मागच्या महिन्याचा पगार राहिलाय तो घ्यायला आलोय. देताय ना ?" आम्ही विचारलं "पण तु इथं कसा आला परत ? तु तर मेलायस ?? आत्ताचा तर तुला पेटवुन आलो आम्ही " नाना गोंधळल्या घाबरल्या आवाजात बोलला. " नाना ! तु आणी तो म्हातारा गोखल्या जो पर्यंत जिवंत आहात ना तो पर्यंत या बापु जोश्याला मुक्ती नाही. तुझं आणी आप्प्याचं सगळं बोलणं ऐकलय मी " आम्ही जरा जरबेतच बोललो. "म्ह..म्हणजे तु भु..भुत " नाना तातरायला लागला होय !

कल्ला

लेखक शिवोऽहम् यांनी रविवार, 18/11/2018 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईतनं आलेलो इथे. सगळे बोललेले की लहान गावात कशाला जाताय तुम्ही म्हणून. पण हे काय लहान गाव नाही, आणि मोठं शहरपण नाय वाटत. मालाडला स्टेशनजवळ घर होतं आपलं मस्त. पोरं जास्तकरुन गुजराती. मेहुल, राजेश, निलेश अशी. थोडी आपल्यासारखी. मराठी. परब, कांबळी, करमरकर वगैरे. पण इथे सगळेच मराठी. आणि बोलायला भेंडी एका वाक्यात १-२ शिव्या तर येणार म्हणजे येणारच! शिवाय इथलं घर मोठं आहे. ४ खोल्या आहेत. मस्त एरिया आहे, झाडीबिडी आहे आजुबाजुला. शाळा आहे जरा लांब पण काय फरक पडत नाही. इथे कोणाला क्रिकेटमधलं काय माहितीच नाही. रिचर्डसनी लिलीची धुलाई केली म्हटलं तर विचारतात त्यो कोण?

ॲडमिशन Engineeringची : एक नाट्यछटा

लेखक चिगो यांनी शनिवार, 17/11/2018 23:24 या दिवशी प्रकाशित केले.
लेखक : कोणी का असेना. स्थळ : इशान्य भारतातील एक राज्याचे उच्च शिक्षण विभागाचे कार्यालय पात्र : सरकारी बाबू ( श्री. ना.पा. सघोडे) पिता ( श्री. फा.र. चतापलेले) पुत्र ( संदर्भास) इतर सोयीनुसार पार्श्वभुमी : अभियांत्रिकी शिक्षणासाठीच्या जागांचे सुयोग्य आणि यथार्थ वाटप व्हावे, म्हणून केंद्र सरकारने CSAB - NEUT ( Central Seat Allotment Board - North East & Union Territories) ची निर्मिती केली आहे. सदर प्रक्रियेनुसार जागांचे वाटप व भरती होऊन आता जवळपास दोन महीने लोटले आहेत. ( पडदा वर जातो. सरकारी बाबू कार्यसिद्धी करताहेतसे दाखवून समयप्रलाप करीत आहेत.