वी आर नॉट मेड फॉर ईच आदर - ५
लक्ष्मण तुला सोडून आल्या नंतर त्याने तुला कुठे सोडले याची विचारपुसही मी केली नाही. मुद्दाम होऊनच. न जानो तुला भेटायचा मोह व्हायचा आणि आदर्श न्यायप्रिय राजा निश्चय विरघळायचा. माझ्या लौकीकाला बाध येईल असे काहीच करायचे नव्हते . "काल" हा सर्व दु:खांवर औषध ठरतो. मी अहोरात्र कामात बुडवून घेतले. गोशाळा , अश्वशाळा , गजशाळा, पणनव्यवस्था शस्त्रागार अद्ययावत करून घेतले. सुरक्षा दलांना मार्गदर्शन करु लागलो.
मिसळपाव