लेखकमालविकायांनी गुरुवार, 17/01/2019 09:05 या दिवशी प्रकाशित केले.
फेसबुक वर सायक्लोप नावाचा ग्रुप आहे. या ग्रुपवर माझा नवरा श्रीनिवास बऱ्यापैकी ऍक्टिव्ह असतो. सायकल ऍडिक्ट तर तो आहेच. त्यात या ग्रुप मधून आणखी ओळखी होऊन नवीन नवीन आयडिया त्याला मिळत असतात. याच ग्रुप वर एक कपल आहे. त्यांचं नाव आहे सनथ रथ आणि प्रतिमा मिश्रा. या दोघांनी टँडेम सायकल घेऊन त्याचे फोटो ग्रुप वर टाकले नि आमच्या साहेबाच्या डोक्यात पण किडा वळवळला. थोड्याच दिवसात प्रॅक्टिसने त्या दोघांनी २०० किमी ची BRM पूर्ण केली. मग तर आमचे साहेब आणखीनच अस्वस्थ झाले. हळूहळू मनातली वाक्य ओठावर यायला लागली. सनथशी श्रीनिवास पूर्वीपासूनच कॉन्टॅक्टमध्ये होता.
लेखकmukund sarnaikयांनी बुधवार, 16/01/2019 20:15 या दिवशी प्रकाशित केले.
३१ डिसेंबर ची पार्टी. तिघे जण मित्र असतात व ते ३१ डिसेंबर ची पार्टी करायचे ठरवतात व त्यानुसार ते सर्व जण रात्री १०:३० वाजता ठरल्याप्रमाणे बाहेर पडतात.बाहेर पडल्यानंतर रोड वर धमाल मस्ती करत चालेले असतात कारण बाहेर माहोलच नविन वर्षाचे स्वागत करण्यासाठी जल्लोश चाललेला असतो.कारण थोड्याच वेळात नवीन वर्ष चालु होणार असते.पण ते ज्या रोड वरून जाणार असतात त्या रोडवर एक पिझ्झा खाण्याचे स्वस्त व मस्त हॉटेल आहे.असे त्या तिघांपैकी एक मित्र त्या दोघांना सांगतो कि आपण( ४०₹ ला एक आहे असे पण सांगतो.
लेखकmukund sarnaikयांनी बुधवार, 16/01/2019 20:13 या दिवशी प्रकाशित केले.
वर्ष २०१५ जानेवारी ०९ वेळ रात्री ११ वाजता भेटलो ते थंडीचे दिवस होते .व अचानक दुसर्या दिवशी शिर्डीला बाईक वर जायचे ठरले.त्यानुसार आम्ही सर्वजण ( ४ मित्र) १० तारखेला दुपारी १:३० मिनी.मोटारसायकलवर शिर्डीला जाण्यास सज्ज झालो व बांबांचे नाव घेऊन मोटारसायकल सुरु करुन आम्ही निघालो.जाताना रुबी हॉल (पुणे स्टेशन ) इथे नाष्टा करुन मग पुढे निघालो वाघोली नगर रोड मार्गे.मजल दर मजल करीत गप्पाटप्पा करित कधी आम्ही संध्या.५:०० ते ५:३० च्या सुमारास नगरमध्ये पोहचलो ते कळले पण नाही.मग नगरला चहापाण्यासाठी थांबुन आम्हीमग शनीशिगंणापुर मार्गे शिर्डीला जाण्याच नगरवरुन निघालो.शनीशिगंणापुरला संध्याकाळी ७:०० ते ७:३
लेखकयुयुत्सुयांनी बुधवार, 16/01/2019 17:15 या दिवशी प्रकाशित केले.
प्राणायामात काय शिकायचे ? नवीन काय?
भाग ३/३
डॉ. जगन्नाथ दीक्षित ( एम० डी०), डीरिडर, लुईझियाना आणि राजीव उपाध्ये, पुणे.
या पूर्वीचे भाग
https://www.misalpav.com/node/43889https://www.misalpav.com/node/43920 (12) प्राणायामाचा नित्यक्रम लहानपणापासून का करावा ?
गाई म्हशींची वासरे जन्माबरोबर लगेच चालू लागतात, परंतु जेव्हा एखादे मानवी बालक जन्माला येते, तेव्हा ते चालू शकत नाही.
लेखकहेमंतकुमारयांनी बुधवार, 16/01/2019 14:50 या दिवशी प्रकाशित केले.
रविवारचा दिवस होता आणि सवयीप्रमाणे इंग्लिश पेपरातले मेगॅ-क्रॉसवर्ड सोडवत बसलो होतो. हे सोडवणे म्हणजे डोक्याचा भुगा होतो. सगळे कोडे कधी सुटत नाही पण निम्मे सुटले तरी मी आनंद मानतो. या कोडयातले एक शोधसूत्र लक्षवेधी होते. ते असे:
‘ओलीस व्यक्तीस तिच्या अपहरणकर्त्याबद्दल वाटणारे प्रेम’
ओळखायचा शब्दसमूह तब्बल १७ अक्षरी (९+८) होता. अन्य उभ्या-आडव्या शब्दांच्या मदतीने त्यातला दुसरा शब्द Syndrome असा सुटला. पण पहिल्यातले फक्त पहिलेच अक्षर S एवढेच कळत होते. खूप वेळ जाम डोके खाजवले पण शेवटी थकलो. पण डोक्यात किडा वळवळत होता आणि जाम अवस्थ होतो. मग गेलो गुगलराजाला शरण.