दी टायगर्स असोसिएशन - रहस्यकथा भाग ५ (अंतिम भाग)
शेवटी ब-याच दिवसानंतर ही लेखमाला पुर्ण झालेली आहे. रसिक दाद देतील ही अपेक्षा
–-------
पहाटेची वेळ असल्याने रस्त्यावर कोणीच नव्हते. बाजूच्या झाडावर बसलेले पक्षी तेव्हढे किलबिलाटाने शांततेचा भंग करत होते. हा भाग माझ्या घराच्या शेजारचाच होता. मात्र घरी जाण्याचा आत्ता काहीच फायदा नव्हता कारण आता ते साखरझोपेत असणार होते. वेळ जावा म्हणून मी आजूबाजूला फिरत वेळ घालावला. फिरता फिरता आमच्या नेहमीचे सलूनचे दुकान लागले. तोही नुकताच आला होता. दुकान उघडून दुकानाच्या बाहेरची बाजू तो झाडून काढत होता. मी सहज आत गेलो आणि कॅलेंडर बघितले तर कॅलेंडरवर मागचा महिना दिसत होता.
मिसळपाव