Skip to main content

[शशक' १९] - निर्णय

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 08/02/2019 00:46 या दिवशी प्रकाशित केले.
" आता २७ दिवस ICUत झाले आहेत. गेले ७ दिवस व्हेंटीलेटरवर. तुम्ही आता काहीतरी निर्णय घ्या." "अस कस म्हणतोस तू. परवा किडनी काम करत नाही म्हणालास , आणि सकाळी परत सुरु झाली न." "मी उपचार सुरू ठेवतो, तुम्हीच बघा. घरचाच पेशंट म्हणून सांगतोय. चांगले ९५ वर्षे आयुष्य जगले आहे. " आईची नजर मिटींग सुरू झाल्यापासून शुन्यात. ताईच्या डोळ्यातले पाणी खळत नव्हते. "किती लागले रे आत्ता पर्यंत?" "११ लाख" "बंड्या, स्वतःचे निर्णय स्वतःच घ्यावे लागतात" अण्णांचे नेहमीचे वाक्य आठवले आणि तिरीमिरीतच उठून ICUत त्यांच्या जवळ गेलो. नेहमीसारखा हाक मारुन अण्णांच्या डोक्यावरुन हात फिरवला.

[शशक' १९] - आरसा

लेखक साहित्य संपादक यांनी शुक्रवार, 08/02/2019 00:42 या दिवशी प्रकाशित केले.
कुरूप राणीने देशातले आरसे फोडून टाकले. तळी, विहिरीसुद्धा बंद. पण जसिंताच्या अप्रतिम सौंदर्याचं वर्णन वॅलेंटिन तिला प्रेमभराने सतत ऐकवत असे. एके दिवशी दोघांचं लग्न ठरलं. मग आली थेरडी भिकारीण. राणीने पढवलेलं गरळ ओकून गेली.. "किती ग बाई कुरूप तू! काय ते तिरळे डोळे..काजळासारखा चेहरा..पिवळे फताडे दात..विद्रुप कान.." दुखावून, शरमून जसिंताने लग्नाला नकार दिला. वॅलेंटिन म्हणाला, "च्च! आरसा हवा एखादा...चल राणीकडे." "बापरे, किती भयाण दिसते ही." राणी हसली. "डोकं फिरलंय राणीचं! " वॅलेंटिन भडकला. "उडवा त्याचं डोकं." कुऱ्हाडीचं पातं लख्खकन चमकलं. क्षणभर आरशात एक सुंदर चेहरा..

अरे संसार संसार...

लेखक मनस्विता यांनी गुरुवार, 07/02/2019 22:18 या दिवशी प्रकाशित केले.
अरे संसार संसार, जसा तवा चुल्ह्यावर आधी हाताला चटके, तव्हा मिळते भाकर बहिणाबाईंची ही शाळेत शिकलेली कविता. आज आठवण यायचं कारण काय? तर झालं असं की आज कित्येक दिवसांनी एकावेळी बऱ्याच भाकरी केल्या. त्या करत असताना मला माझा भाकरी करायला कशी शिकले तो प्रवास आठवला. माझ्या माहेरी सकाळी पोळ्या आणि रात्रीच्या जेवणात भाकरी अशी सवय आहे. सकाळचं संध्याकाळी अजिबात चालायचं नाही. अर्थातच हे सर्व काम आईच करत असे. परंतु आईला स्पॉन्डिलायटिसचा खूप त्रास सुरु झाल्यावर पोळ्या करण्यासाठी बाई कामावर ठेवल्या. पण संध्याकाळी आईला ताज्या भाकरी कराव्याच लागत.

[शशक' १९] - उफराटा न्याय

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 07/02/2019 19:50 या दिवशी प्रकाशित केले.
“त्यांच्यात काय बोलणं चाललंय ?” “गपचूप काहीतरी प्लॅन करतायत ! “एकाच घरात राहून समजेना. पत्र आलंय बँकेकडून घरासाठी लोन मंजुरीचं ! परस्पर घर घेतलं, सांगावंसंही वाटलं नाही. ती तर सूनच, पोटच्या मुलाने सांगायला नको ? “तिचीच फूस असणार,मुलगा असा नव्हता लग्नाआधी. लग्नाला इतकी वर्षं झाली, मूलबाळ नाही अजून, नाहीतर त्याचीही जबाबदारी आपल्यावर टाकून हिंडले असते !” “होईल कसं ? देवही बघतोय …संस्कार मात्र फुकट गेले ! हरामखोर आता स्वार्थीपणे वागतायत. पगार किती आहे सांगत नाहीत. मुलाच्या ट्रीटमेंटवर खर्च चालू आहे परस्पर.

[शशक' १९] - शिक्षा

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 07/02/2019 19:47 या दिवशी प्रकाशित केले.
"आई माझ्याकडून कपबशी फुटली. . उठताना चुकून धक्का लागला. मला शिक्षा दे." सात वर्षाचा मोगु आईला सांगत होता. समजूतदार आई मनाशी हसली. " बाळा चूक झालीये ना. त्याची शिक्षा हवीच. तूच ठरव शिक्षा काय घ्यायची ते. तू शहाणा आहेस" " मी दहा मिनीटे कोपर्‍यात अंगठे धरून उभा रहातो" "ठीक आहे. तुला योग्य वाटतय ना " मोगु अंगठे धरुन उभा राहिला. आई अभिमानाने स्वतःशीच हसली. घाईघाईत कपाटात ग्लास ठेवताना तो घरंगळला. ओट्यावर पडून फुटला. समजूतदार आई मोगूला म्हणाली " बाळा आता चूक माझ्याकडून झाली काय शिक्षा देतोस सांग" " अगं आई ते तू चुकून झालं . मुद्दाम होऊन थोडंच केलंस. चुकून झालं त्याला शिक्षा कशाला ?

[शशक' १९] - PhD

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 07/02/2019 19:05 या दिवशी प्रकाशित केले.
"phd झाली. आता नो अमेरिका. आधी लग्न.आता चर्चा नाही" वैशाली हिरमुसली. दुसऱ्या दिवसापासून ती हसतमुखाने घरच्या रेस्टॉरंटमध्ये लक्ष घालू लागली. बाबा खुश. तिने आलेल्या गिऱ्हाईकांसाठी स्वतः बनवलेले सूप द्यायला सुरुवात केली. ह्या ऑफरमुळे गर्दी वाढली. अचानक 2 दिवसानंतर तक्रारी सुरू झाल्या. काहीही खाल्लं तरी एकच चव लागत होती. कधी कॉफी तर कधी उसाचा रस. बाबा वैतागले. काहीच समजत नव्हतं. सगळं तपासून झालं. त्यांनी चाखून बघितलं, सगळं तर ओके होतं. त्यांनी वैशालीला सूप आणायला सांगितलं ते पिलं आणि बिर्याणी खाल्ली, चक्क कॉफी. बाबा हसले. ते म्हणाले,"चल मी पण येतो तुला सोडायला अमेरिकेला, मलाही कंटाळा आलाय".

[शशक' १९] - वस्तरा

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 07/02/2019 18:36 या दिवशी प्रकाशित केले.
रणरणत्या दुपारी, उन्हाच्या झळा बसत होत्या. फुफाटा आसमंतात उडाला होता. "सुन्या अरे ये सुन्या चल लवकर, शाली वरल्या माळाकड चाललीये. आज नक्की गठल बघ" ब्रश खाली ठेऊन सुनील वस्तराच हातात घेणार होता इतक्यात दिपकच्या हाळीने तो चमकला "आँ " "अरे आँ काय करतोय चल लवकर, काय फटाकडी दिसून ऱ्हायली आज शाली, कहरच " "अरे संपत" सुनील चाचरत बोलला. " कोण संप्या, त्यो शालीचा भाऊ? त्याला काय घाबरतोय? मी बघून घेईन त्याला. तू आटप " इतक्यात छातीवर अंथरलेल्या कळकट्या रुमालाने गिऱ्हाईकाने दाढीचा फेस पुसला.

हारासाठी काही पण ........... ( शशक २)

लेखक खिलजि यांनी गुरुवार, 07/02/2019 17:26 या दिवशी प्रकाशित केले.
ती : दोघांसाठी वर्षाला तीन लाख , म्हणजे जर अतीच होतंय . तो : हो ग , पण सुविधा एकदम मस्त आहेत . जरा बरे वाटेल नि आपल्यालाही काळजी नसेल . ती : मी मागे हार मोडून दुसरा बनवते बोलले तर तुम्ही केव्हढं बोलला होता . तो : तुला योग्य वाटतं ते कर. एक मात्र नक्की पैसे दिल्यावाचून आपली यातून सुटका नाही . अगं वेडे चोवीस तास सुरक्षा आहे तिथे. आपलं काय , दोघेही कामावर आणि मुलं शाळेत . कोण आहे इथे ? ती : परवा कळेल तुम्हाला. ठळक बातम्या : क्रूरकर्मा सासूसासऱ्याना पोस्कोअंतर्गत अटक . न्यायालयीन चौकशी सुरु आहे . सिद्धेश्वर विलास पाटणकर

सहप्रवासी

लेखक kool.amol यांनी गुरुवार, 07/02/2019 13:39 या दिवशी प्रकाशित केले.
समर्थ म्हणूनच गेले आहेत की देशाटन केल्याने ज्ञानात वृद्धी होते. त्यांच्यासारख्या अवतारी पुरुषाच्या अफाट ज्ञानात प्रवासामुळे मिळालेल्या ज्ञानाचा भाग मोठा आहे. पण आपण पडलो पामर, त्यामुळे आपण प्रवासाला निघतो तेव्हा ज्ञानप्राप्ती कितपत होते ही शंकाच आहे पण गंमती, मनोरंजन, मनस्ताप आणि डोकेदुखी यांची प्राप्ती नक्कीच होते हे मी सांगू शकतो. आपल्या सगळ्यांचा सतत काही ना काही कारणाने प्रवास होत असतो. आजकाल आपण सगळं नियोजनाने करतो पण एक गोष्ट शेवटच्या क्षणांपर्यंत अनाभिज्ञ असते ती म्हणजे आपले सहप्रवासी! ह्यांच्या बाबतीत काही लय भारी किस्से आहेत आपल्याकडे. सगळ्यात भारी म्हणजे बसच्या प्रवासातील.

[शशक' १९] - स्वप्न

लेखक साहित्य संपादक यांनी गुरुवार, 07/02/2019 12:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज महाराष्ट्राची नॅशनल अंडर १९ मधील शेवटची T२० मॅच तीही पुण्यात आपल्या होम ग्राउंड वर. आजपण ५० १०० केले की पुढच्या महिन्यात IPL ऑक्शनमध्ये आपण नक्की सिलेक्ट काही वादच नाही त्यात. विचारांच्या त्याच धुंदीत स्वतःचं नवीन घर, आई बाबांना छान ट्रिप, ही खटारा कायनेटिक च्या बदली मस्त कार असे कल्पनाविलास रंगवत रंगवत आपण समोरचा रेड सिग्नल तोडून भरधाव वेगाने जात आहोत हे लक्षात यायच्या आधीच ट्रकने उडवलं आणि मी हेल्मेट सक्ती विरुद्ध निघालेल्या मोर्चाच्या मधोमध जाऊन आदळलो.