Skip to main content

स्वतःसाठी जगू नका

लेखक नायकुडे महेश यांनी शुक्रवार, 22/02/2019 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
मातीसाठी प्राण वेचतो आम्ही जातीसाठी लढू नका । तिरंग्याची शान राखतो आम्ही स्वतःसाठी जगू नका ।। कितीही येवो वादळे मोठी आम्ही त्यांना घाबरत नाही, आपलेच खेचतात आपले पाय ते आम्हाला पाहवत नाही, तुमच्यासाठी लढतो आम्ही कुणापुढे झुकू नका। तिरंग्याची शान राखतो आम्ही स्वतःसाठी जगू नका ।। हसत असें तेव्हासुद्धा जेव्हा मरण समोर येईल, भ्याड हल्ले करणाऱ्यांच्या यम होऊन समोर येईन, मेल्यानंतर आमच्या देहाचे राजकारण करू नका । तिरंग्याची शान राखतो आम्ही स्वतःसाठी जगू नका ।।

सीता रागाने हनुमंताला "तुझ्या आईची छूत्री " म्हणाली

लेखक खिलजि यांनी शुक्रवार, 22/02/2019 16:55 या दिवशी प्रकाशित केले.
चावडीवर बसून बसून टपोरी टाळकी वैतागली इतक्यात बंड्याच्या डोक्यात नामी कल्पना आली नेहेमी का म्हणून हिणवून घ्यायचे स्वतःला एकदा तरी दाखवून द्यायचे आपण कोण आहोत ?
काव्यरस

पशु पक्षांसाठी श्री. किरण पुरंदरे (पक्षीतज्ञ) यांनी केला नैसर्गिक अधिवासात कृत्रिम पाणवठा

लेखक नानुअण्णा यांनी शुक्रवार, 22/02/2019 14:23 या दिवशी प्रकाशित केले.
गेल्या काही दिवसांपासून मी श्री. किरण पुरंदरे (पक्षीतज्ञ) यांच्याबरोबर पक्षी निरीक्षणासाठी जात आहे. खालील माहिती त्यांनी व्हाट्स अप वरती पाठवलेली आहे, अनेक वर्ष ते पशु पक्षांसाठी तसेच निसर्ग संरक्षण याबद्दल जनजागृती आहेत. सध्या होत असलेल्या हवामान बदलामुळे ऋतुबदल होत आहेत, त्याचा परिणाम पशु पक्षी यांच्या जीवनावर सुद्धा पडत आहे, तीव्र उन्ह्याळ्यात व पाणी टंचाईत, पशु पक्षी यांना पिण्यास पाणी नैसर्गिक अधिवासाप्रमाणे मिळावे यासाठी ते कार्य करीत आहेत.

तिसरी इनिंग

लेखक स्वीट टॉकर यांनी शुक्रवार, 22/02/2019 12:23 या दिवशी प्रकाशित केले.
मी ज्याच्याबद्दल सांगणार आहे त्याला 'तिसरी इनिंग' म्हणणं धाडसाचं होईल पण तरी म्हणतोच. माझी पहिली इनिंग झाली बोटीवर. त्याबद्दल तुम्ही सविस्तर वाचलं आहेच. दुसरी चालू आहे ती प्रोफेसरीची, ज्याबद्दल थोडंफार वाचलं आहेत. त्यातून एखादेवेळेस तिसरी निर्माण होण्याची शक्यता आहे. ती होईल किंवा नाही, मात्र आत्ताच त्यात मला मजेदार अनुभव आले ते शेअर करणं जरूर आहे. आमच्या रिसर्च विभागाच्या प्रमुखाची हॉबी आहे डॉक्युमेंटरी फिल्म्स बनवणे.

[श श क स्पर्धे बाहेरचे] - मॅच

लेखक टिल्लू यांनी शुक्रवार, 22/02/2019 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
पटापट दोन घास गिळून कुलदीप खेळायला पळाला. आज परत कुल्याची आणि शिऱ्याची मॅच होती. कालच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिऱ्या आज मैदानात उतरला. टॉस झाला, कुल्याच्या गोलंदाजांचे पिसे काढत, शिऱ्याच्या फलंदाजानी १० षटकात १२० धावा कुटल्या. कुल्याचे सलामीचे फलंदाज आणि मधली फळी धावसंख्या ६ षटकात ६० नेऊन परतली. केदयाच्या बरोबरीने त्याने धावसंख्या ९८ केली. शेवटचे षटक, जिंकायाला २३ धाव शिल्लक, मॅच अटीतटीची झाली. तीन चेंडुवर कुल्याने तडाखेबाज षटकार लावत शिऱ्याच्या तोंडचे हसू पळवले.

हॅरी पॉटर - भाग सहा

लेखक nishapari यांनी शुक्रवार, 22/02/2019 01:02 या दिवशी प्रकाशित केले.
जेम्स आणि लिलीची हत्या झाली तेव्हा पीटरने विश्वासघात केला ही गोष्ट सिरियसच्या लक्षात आली . जेम्सवर त्याचं भावापेक्षाही अधिक प्रेम होतं . तो संतप्त अवस्थेत पीटरला ठार मारण्याच्या हेतूने त्याच्यामागे गेला . त्यांची गाठ अनेक मगल लोक असलेल्या रस्त्यावर पडली . मात्र सिरियसपेक्षा पीटर चपळ ठरला . " तू लिली आणि जेम्सचा विश्वासघात केलास " असं मोठ्याने ओरडून पीटरने एक मोठा जादुई स्फोट घडवून आणला , या स्फोटात 12 मगल लोक मृत्युमुखी पडले . याचवेळी आपलं एक बोट पीटरने कापलं आणि क्षणार्धात उंदराच्या रुपात परिवर्तीत होऊन तिथून पळून गेला .

शशक - वैकुंठ एकादशी

लेखक bhagwatblog यांनी गुरुवार, 21/02/2019 23:32 या दिवशी प्रकाशित केले.
वैकुंठ एकादशी देविकाच्या एका डोळ्यात अश्रु आणि दुसर्‍या डोळ्यात आनंदाश्रू होते. तिच्या डोळ्या समोरून तिचे आयुष्य झरकन तरळून गेले. तिला वडीलांनी कुठल्याही प्रसंगात ठाम राहायला शिकवले होते. देविका साठी अंतिम निर्णायक स्थिती आलीच होती कारण सहा महिन्या पासून तिच्या वडीलांची तब्बेत खराब होती. डॉक्टरांनी बरेच प्रयत्न करून सुद्धा पदरात काहीच यश पडत नव्हते. मग डॉक्टरांनी तिला अंतिम निर्णय विचारला? तिने दोलायमान स्थितीत एक कठीण पण ठाम निर्णय घेतला. वैकुंठ एकादशीच्या दिवशीच ठीक रात्री बारा वाजताच वडीलांचा व्हेंटिलेटर काढायचे ठरले. अंतिम वेळ जवळ येऊन ठेपली. देविकाने वडीलांचा हसत-हसत कायमचा निरोप दिला.

पुणे ते कन्याकुमारी (सायकल सायकल)

लेखक किरण कुमार यांनी गुरुवार, 21/02/2019 19:26 या दिवशी प्रकाशित केले.
२७ डिसेंबरची ती संध्याकाळ आम्हा चौघांच्या आयुष्यातील संस्मरणीय सोनेरी किरणांनी सजली , 'वेलकम टू कन्याकुमारी या अक्षरांची कमान पाहताना गेल्या तेरा दिवसाचा सायकल प्रवास नकळत डोळ्यासमोर ओझरता वाहू लागला गेली दोन आठवडे या ठिकाणाची अनामिक ओढ लागली होती , त्या ओढीनेच पॅडेलवर फिरणारे पाय थकले नव्हते कि चार राज्याच्या प्रवासातून शरिर थकले नव्हते , निसर्गाच्या सानिध्यात आधीच ताजेतवाने झालेले मन आता जल्लोष करण्यासाठी आतूर झाले होते .

कायदा

लेखक anandkale यांनी गुरुवार, 21/02/2019 19:07 या दिवशी प्रकाशित केले.
तो दिवस मी कधी विसरणार नाही. त्या दिवशी खंड्या शाळेत जरा ऊशीराच आला, कपडे सुध्दा चुरगाळलेले होते. मागच्या बाकावर जाऊन एकटाच बसला, कुणाशी काही बोललासुध्दा नाही. मधल्या सुट्टीत पोरांचा गराडा खंड्याभोवती पडला. सगळे नेहमीप्रमाणे खंड्याची टवाळी करू लागले. सुताराचा सुशील त्यात नेहमीप्रमाणे पुढे होता. " काय बाप मेल्यासारखा तोंड करून बसलाय बघा" बाप हा खंड्याचा वीक पाॅईट. खंड्याचा बाप मिलेट्रीत होता. कुठेतरी काश्मीरमधे अतिरेक्यांशी लढत होता. काही शौर्यपदकेही खंड्याच्या बापाच्या नावावर होती. गावातल्या ज्या काही थोड्या लोकांचा पेपरात फोटो आला होता त्यात खंड्याचा बाप एकदम नामचिन होता.

WordPress वर असा बनवा स्वतःचा Blog

लेखक Ramesh Patil यांनी गुरुवार, 21/02/2019 17:00 या दिवशी प्रकाशित केले.
blogging साठी खुपसारे Platforms उपलब्ध आहेत. पण या सर्वांमध्ये सगळ्यात चांगले कोणते असा प्रश्न जेव्हा समोर उभा राहतो तेव्हा blogger किंवा WordPress ही दोनच नावे डोळ्यासमोर येतात. अर्थात गेल्या काही दिवसात tumbler सुद्धा खूप लोकप्रिय झालेय. पण अजूनतरी tumbler हे Blogger अन WordPress च्या पंक्तीत बसलेले नाहीये.