Skip to main content

[श श क स्पर्धे बाहेरचे] - मॅच

लेखक टिल्लू यांनी शुक्रवार, 22/02/2019 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
पटापट दोन घास गिळून कुलदीप खेळायला पळाला. आज परत कुल्याची आणि शिऱ्याची मॅच होती. कालच्या पराभवाचा वचपा काढण्यासाठी शिऱ्या आज मैदानात उतरला. टॉस झाला, कुल्याच्या गोलंदाजांचे पिसे काढत, शिऱ्याच्या फलंदाजानी १० षटकात १२० धावा कुटल्या. कुल्याचे सलामीचे फलंदाज आणि मधली फळी धावसंख्या ६ षटकात ६० नेऊन परतली. केदयाच्या बरोबरीने त्याने धावसंख्या ९८ केली. शेवटचे षटक, जिंकायाला २३ धाव शिल्लक, मॅच अटीतटीची झाली. तीन चेंडुवर कुल्याने तडाखेबाज षटकार लावत शिऱ्याच्या तोंडचे हसू पळवले. चौथा बाउन्सर हुकला. पाचाव्या चेंडुवरची एकेरी धाव नाकारली. शेवटचा चेंडू आणि पाच धावा. आणि हे काय… " शीटSS शीटSS " कुल्या किंचाळला . ... ... "काय झालं कुलदीप ... " बाहेर आई दार ठोठावत होती.
लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 3081
प्रतिक्रिया 8

प्रतिक्रिया

कार्तिक झाला कुल्याचा पैजारबुवा,

" शीटSS शीटSS " हा .... हा ....

=)) =)) =))

थोडी आधी द्यायची ना स्पर्धेत.