वळीव
समजतो वळवाला पावसाळा,
शहराला गावाचे दुःख ठाव नाही
काव्यरस
डोळ्यातल्या पाण्यामुळे आबांना समोरचे धूसर दिसू लागले. समोरचे काही आता पहायचे नव्हतेच मुळी. त्याची गरजही नव्हती. डोळ्यासमोर वेगळेच जग होते. ते जग पहायला या जगातली दृष्टी गरजेची नव्हती. आठवणी अशा एकट्या कधीच येत नाहीत. एक आली की तीचा पदर धरून दुसरी येतेच.या भरजरी आठवणींचा पदर धरून सोबत काही गमती जमतीही आल्या. मानसकन्येचा प्रयोग होता. खानदेशात बहुधा रावेर ला असावा. मध्यंतराला चहावाला पोर्या कुणासाठीतरी विड्या घेवून आला. साने मॅनेजरना ते अजिबात आवडायचं नाही.
भांडे पुन्हा लोट्यावर ठेवताना त्याचा किंचीत आवाज झाला. आबांना तो आवाज नाटकाच्या घंटेसारखा वाटला. त्या आवाजासरशी डोळ्यात एक अनामीक चमक आली. ययाती- देवयानी मधील ययातीचा शर्मिष्टेसोबतचा प्रेमालाप ऐकु यायला लागला.हे प्रिये तुझ्या मुखारविंदाला कमलनयांनी शोभा येते की मग भाळावरच्या कुंकुम तिलकाने पूर्व दिशेला प्रभा फाकते? इंद्रधनुची उपमा मी तुझ्या कमानदार रसशीत ओठांना देवू की मग त्या बाकदार भुवईला?