Skip to main content

सिग्नल .....!

लेखक फिझा यांनी बुधवार, 05/06/2019 18:13 या दिवशी प्रकाशित केले.
सिग्नल ...... आज लाल दिव्याने नाममात्र थांबलेत काही गोंगाट , नाहीतर कोण इथे थांबतं ...... सगळेच घाईच्या लयीत ! इतक्यात ....... धुळीने माखलेल्या चाळीस वर्षांच्या रखरखीत पायाच्या बोटांवर चार वर्षांच एक डोकं ठेवलं गेलं ..! अन् त्या कोमल गालांचा स्पर्श होताच ...... झटकन पाय मागे घेऊन तो ओरडला " ए हट ...... " त्याच्या डोळ्यातली लाचारी पाहायला वेळ नसेल पण, त्या स्पर्शाने काळीज गलबलले असणार नक्कीच ! तरीपण .... "कालच नवीन चप्पल घेतलीये...." असं म्हणेपर्यंत, दिवा हिरवा झाला ! अन पोर ....... परत लाल सिग्नल ची वाट बघू लागलं ! ------------- फिझा .
लेखनविषय:

वाचने 2584
प्रतिक्रिया 5

प्रतिक्रिया

या अनुभवाला कवितेची साथ , शब्दांची गुंफण नसती तरी ऊर भरून आला असता आणि पापणी ओलावली असती या कविता वाचनानंतर , मलापण ते बाळ आठवलं ज्याच्या आईला ( ? ) मी ओरडलो होतो एक दिवसाचा प्रपंच दान दिला खरा पण पुढचे चार दिवस अक्षरशः रोडावलो होतो ते बाळ अजूनही तसंच आहे आणि त्याची आईही ( ?) मी पण तिथून ये-जा करतो नेहेमी आणि तो सिग्नलही ......

In reply to by खिलजि

अन तितक्याच प्रभावी काव्याला. वाईट वाटतं काही क्षण, मग मी ही पुन्हा रमतो पुढील मन गुंतवणाऱ्या मजकुराच्या शोधात...