रक्षाबंधन - भाग १
' रक्षाबंधन '
भाग १
भारतीय समाज केव्हा बरं अडचणीत सापडतो, असा विचार केल्यावर काय काय सुचेल? आकाशात जेवढे ग्रह तारे एवढी उत्तरे आठवली तरी एक उत्तर नक्कीच ध्रुव ताऱ्यासारखे असणार.
'सण आले की..'हेच ते तेजस्वी उत्तर असे वाटते. वरवर पाहता हे पटणार नाही किंवा लिहिणारा गोंधळात पडलेला आहे असे वाटेल कदाचित, पण आता असे वाटतंय तर लिहून तर बघू.
आपल्या देशात महिनाभर सुट्ट्या सणांमुळे असतात, त्यामुळे मुख्य पंचाईत अशी की कोणत्या सणाचा गोंधळ साजरा करायचा?
मिसळपाव
