सूर जाणिले कोणी
खाली दिलेल्या लिंकवर जे गाणे आहे त्यावर काहीतरी खरडलंय.
https://youtu.be/kWOXZmIIrSo
२ दिवसांपूर्वी ९ वीच्या अभ्यासक्रमातील 'मेंदू'शी झटापट सुरू होती. उजवा बाजूला कुठली केंद्र व डाव्या बाजूला कसले हिशोब असं काय काय चर्वीचरण चालू होतं. "संगीत, नृत्य अशा कलांची जबाबदारी उजवा भाग घेतो." वाक्य वाचून झालं. आता हे शिकवायचं कसं ? का घेतो? कशी घेतो? कोण व कधी ठरवतं? जन्मतः घेऊन येतो हे सेटिंग का समाज व परिस्थितीनुसार बदलतं? हा माणूस अरसिक / रसिक असणार हे उजवा किंवा डावा भाग छापून आणत असतील तर बरंच आहे.
मिसळपाव