Skip to main content

भाग ९ अंधारछाया प्रकरण ८. समजा मीच या फुल्या काढायचे ठरवले, घरात कोणी नसताना! तर मी काय करेन? ठीक आहे, काजळाची डबी घेतली. कशाने काढेन मी अशा फुल्या? काहीतरी काडी बिडी हवी! येस काड्यांची पेटी हवी!

लेखक शशिकांत ओक यांनी मंगळवार, 21/01/2020 23:37 या दिवशी प्रकाशित केले.
अंधारछाया भाग ९ - प्रकरण ८

अंधारछाया

आठ मंगला कॅलेंडरचा नोव्हेंबर महिना फाडला. बेबीला येऊन आता दोन आठवडे झाले. डिसेंबरचे एकतीस दिवस. डिसेबर महिन्याचे पान फाडून नवे कॅलेंडर लावीन तेंव्हा काय झाले असेल? करायला घेतलंय हे आपण, पण निभेल ना असे मनात सारखे वाटे! मग ह्यांनी सांगितल्याचे आठवे. ‘मंगला, एक लक्षांत ठेव आपण तिच्या चांगल्यासाठीच करायला जातोय ना मग होऊ दे काहीही. तू सर्व भार स्वामींच्यावर सोपव. जपावर विश्वास ठेव.

वणवा

लेखक चांदणशेला यांनी मंगळवार, 21/01/2020 22:10 या दिवशी प्रकाशित केले.
गाव माझं सारं पेटलं फुलांचं रान होरपळून गेलं कुणी घातला हा विषारी विळखा सोडूनी गेला कुठे दूर सखा पापण्यांकाठी दु:ख ओलं थरथरलं सुना झाला हा हिरवा मळा जाळला कुणी माझा सुर्य कोवळा डोळ्यांत आभाळ निळं गहिवरलं केला तुझ्यासाठी प्राणाचा आडोसा उरात भडकलेला वणवा विझवू कसा देहात साऱ्या आठवणींचं जहर पांगलं
काव्यरस

देश

लेखक तेजस आठवले यांनी मंगळवार, 21/01/2020 18:00 या दिवशी प्रकाशित केले.
शुक्रवार.अण्णांचं सगळंच वेगळं होतं. इतकी वर्षं त्यांच्या बरोबर काम करणाऱ्या लोकांनाही त्यांच्या मनात काय चाललंय त्याचा अंदाज येत नसे. अण्णांनी दंडावर बसलेल्या डासाला शांतपणे रक्त पिऊ दिलं आणि मग उडून जाण्याच्या बेतात असताना चिरडलं. बोटाला लागलेलं रक्त संपादकाच्या हाताला पुसून टाकायला ते विसरले नाहीत. अण्णा म्हणजे त्याच्यासाठी जणू देवच. ते म्हणतील ती पूर्व. "एक काम करा, आजच्या फ्रंटपेज हेडलाईनला त्याचं नाव ___ ऐवजी ___ छापा. मंगळवारी आतल्या पानात एका ओळीची दिलगिरी व्यक्त करून टाका."

सुखी झोपेचा साथी

लेखक हेमंतकुमार यांनी मंगळवार, 21/01/2020 11:19 या दिवशी प्रकाशित केले.
शरीरातील विविध इंद्रियांच्या पेशींना एकमेकांच्या संपर्कात राहण्यासाठी ज्या काही संवाद-यंत्रणा आहेत त्यापैकी हॉर्मोन्सचे स्थान महत्वाचे आहे. ही हॉर्मोन्स विशिष्ट ग्रंथीमध्ये (endocrine glands) तयार होतात आणि मग रक्तातून शरीरात सर्वदूर पसरतात. या विशिष्ट ग्रंथी आपल्या मेंदूपासून ते थेट जननेंद्रियापर्यंत विविध ठिकाणी विखुरल्या आहेत. त्या सर्व मिळून पन्नासहून अधिक हॉर्मोन्सची निर्मिती करतात. त्यापैकी थायरॉइड, इन्सुलिन, अ‍ॅड्रिनल आणि जननेन्द्रीयांची हॉर्मोन्स ही सर्वपरिचित आहेत. याव्यतिरिक्त अन्य काही हॉर्मोन्स शरीरात अल्प प्रमाणात तयार होतात आणि त्यांचेही कार्य महत्वाचे असते.

कुणी स्पेस देता का रे स्पेस?

लेखक अबोलघेवडा यांनी मंगळवार, 21/01/2020 09:49 या दिवशी प्रकाशित केले.
(वैयक्तिक सुखांपुढे इतर सगळं तुच्छ वाटणाऱ्या जोडप्यांना समर्पित) सुखांची बिलकुल कमी नाही, मस्तच चाललंय आमचं स्पेस मात्र मिळत नाही, काय बरं आता करायचं येता जाता सिनेमे बघून, खुशालचेंडू जिणं जगतोय महिन्याकाठी पोशाखांवर भरमसाठ खर्च करतोय चंगळवादी मन झालंय, आयुष्य झालाय बाजार स्पेस मात्र मिळत नाही, दाखल करू का तक्रार? स्मार्टफोन हाती नसला की, जीव होतोय कासावीस विकत घ्यायला जातो तेव्हा, करत नाही घासाघीस ऐषारामात जगतोय आम्ही, माहीत नाही माघार स्पेस मात्र मिळत नाही, दाखल करू का तक्रार? शब्दांचा झालाय तुटवडा, सगळंच झालंय डिजिटल ईमोजींचं झालं आक्रमण, अन प्रेमही झालंय व्हर्चुअल औषधाला देखील उरले ना