दोसतार- ३६
शाळेच्या चालू दिवशी नेहमीच्या गणवेशाच्या ऐवजी इतर वेगळे कपडे घातले की आपण तसेही वेगळे दिसतो. इथे तर दिवस भर मिरवायला मिळणार होते.
तयारी करायला बरोब्बर तीन दिवस उरले . मंगळवारी शिक्षक दिन.
मागील दुवा : http://misalpav.com/node/46058
मंगळवारची तयारी शनिवारपासूनच चालू झाली. शनिवारी शिक्षकांकडून त्या त्या विषयाची पुस्तके घेणे आणि काय शिकवायचे आहे हे समजून घेणे ही पहिली पायरी. प्रत्येकानेच पार पाडली. मी ऑफ तास घेणार होतो. ऑफ तास म्हनजे कोणी शिक्षक रजेवर असतील किंवा आजारी असतील शाळेत आलेले नसतील त्यांच्या ऐवजी वर्गावर जाऊन बसायचे.
मिसळपाव