लॉकडाऊन : अकरावा दिवस .
काय चुकले ...व आता पुढे काय .......?
नमस्कार मिपाकर , काय घरीच बसून आहात ना... की बाहेर उगीच कोणी फिरताहेत हे पाहाण्यासाठी तुम्ही देखील उगीच बाहेर पडत आहात? काय आहे नदीला पूर आला तरी रंजन म्हणून " पाणी बघायला " येता का असे विचारणारा " मानव" हा मोठा विचारी पण विचित्र प्राणी पृथवीतलावर आहे ! असो. घरातच रहा. कण्टाळा आला तरी जो वर व्हायरस ला कण्टाळा येत नाही अगदी तोवर ! आजचा विचार गाभा म्हणू रोगराई व कायद्याने निर्माण होणार्या समस्या .
१२ मार्च रोजी मी पुण्यास गेलो होतो आकुर्डी वरून . तेन्व्हा पुण्यात बरेच लोक रूमाल ,मास्क जे जमेल ते लावून वावरत होते.
मिसळपाव