मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

करोणागीत..

माम्लेदारचा पन्खा · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
दहा दिशांनी, दहा मुखांनी. आता फोडिला टाहो, आसवांत या भिजलेली कथा, श्रोते एका हो..... सगळ्यांच्या आयुष्याची पार वाट लागली कशी कोरोनाने परिस्थिती आणली ! गंगेवानी गढुळला होता, असा एक देश सुखी समाधानी नाही कोणी, करायचे द्वेष विचित्र उद्योगांनी त्याची कीर्ती वाढली कशी कोरोनाने परिस्थिती आणली ! अशा देशाचा होता एक प्रधान पंत कुणी शेठ म्हणती त्याला, कुणी म्हणे संत त्यांनी नवनवीन घोषणांची सवय लावली कशी कोरोनाने परिस्थिती आणली ! कोट्यवधी भारतीयांची चलबिचल झाली आवाहनापायी घरातच थाळी आरती केली विरोधक आणि भक्तांचीही सुडानेच पेटली कशी कोरोनाने परिस्थिती आणली ! पिसळलेल्या तब्लिगांनीही थयथयाट केला बाहेर उंडारण्यासाठी सारा देश येडा झाला त्यांनी लाज भीड नीती सारी सोडली कशी कोरोनाने परिस्थिती आणली ! जाब विचारया पोलिस गेले ,घातला कोणी घाव दगडफेकीत डाॕक्टरच जखमी, कुणाचे घेऊ नाव सगळ्या अर्थव्यवस्थेचीही तिरडी बांधली कशी कोरोनाने परिस्थिती आणली ! घरातल्या जीवा कळला नाही,बाहेरचा हा खेळ भाजी आणू म्हणती कोणी कोण शोधे भेळ दारू सिगरेटीपायी कुत्र्याची दशा आणली कशी कोरोनाने परिस्थिती आणली ! सगळ्यांची फसगत झाली तिचा हा तमाशा विरुनिया गेली आता जगायची आशा आता लाॕकडाऊननं वेडेपणाची वेळ आणली कशी कोरोनाने परिस्थिती आणली ! याची देही याची डोळा पाहतो इतर देशांचे मरण चिन्यांनीच आणली वेळ, खाऊनी वटवाघळाचे मटण भारताच्या नुकसानाची कशी नेमकी वेळ साधली कशी कोरोनाने परिस्थिती आणली !

वाचन 2768 प्रतिक्रिया 0