कार्यकारणभाव (लघुकथा)
वैताग नुसता वैताग.. घरातल्यांनी नुसता वैताग आणला आहे.
माणसाने बुद्धीने चालावे की अंधश्रद्धेने ?
आयुष्याची तिशी ओलांडल्यावर पहिली कार घेणार आहे तर घरच्यांनी हे तारे तोडावेत ?
बायको म्हणतेय "अहो.. माझ्या बाबांनी सुचवलं आहे, गाडीच्या क्रमांकाची बेरीज ७ यायला हवी. ७ अंक आपल्या दोघांकरिताही शुभ आहे"
इकडे बाबा म्हणतायत "अरे गाडी घ्यायचीच तर किमान दोन महिने थांब. सध्याची ग्रहस्थिती तुला अनुकुल नाही"..
निवृत्तीनंतर बाबांना ज्योतिषशास्त्राने तर सासर्यांना न्युमरोलोजीने पछाडले.
तर आईची अजूनच वेगळी तर्हा "अरे आपल्या कुटूंबात कुणाला चार चाकी वाहन लाभत नाही रे.
मिसळपाव