Skip to main content

शिक्षा.....

लेखक विजुभाऊ यांनी गुरुवार, 11/09/2025 16:24 या दिवशी प्रकाशित केले.
टप्पी टप्पी टप्पी.... छोटा मन चेंडू खेळण्यात मग्न होता. खेळता खेळता त्याच्या हातून चेंडू निसटला आणि आईने कट्ट्यावर मांडून ठेवलेल्या काचेच्या कपला धडकला. कप खाली पडला आणि फुटला. सुमित्रा हे डोळ्याच्या कोपर्‍यातून पहात होती. तीला पहायचे होते की आता मन काय करतो. एक समजूतदार पालक म्हणून तीने यावर लगेच व्यक्त व्हायचे मुद्दामुनच टाळले. "मम्मा माझ्या कडून कप फुटला. मला शिक्षा सांग" . मनच्या वाक्याची सुमित्राला गम्मत वाटली. आणि मन खोटे बोलला नाही याचे बरेही वाटले. " कप फुटला ना मग शिक्षा ही हवीच.

द्रष्टादृश्यदर्शन

लेखक प्रसाद गोडबोले यांनी गुरुवार, 11/09/2025 00:01 या दिवशी प्रकाशित केले.
द्रष्टादृश्यदर्शन ________________________ #सनातनी मनुवादी लेखन अर्थात ज्या सनातन ज्ञानाच्या, आकलनाच्या रक्षणाकरिता , जतन करण्याकरिता वर्णाश्रम धर्माची व्यवस्था भगवंताने घडवली त्या विषयाशी संबंधित. # स्वान्तःसुखाय अर्थात इथे कोणालाही काहीही पटवुन देण्याचा उद्देश नाही. हे केवळ स्वतःच्या सुखाकरिता आहे , मजेकरिता आहे , आनंदाकरिता आहे. ________________________ साधारण संध्याकाळची सात साडेसातची वेळ असावी. सप्तर्षीगडावरुन खाली उतरत होतो . आज कसे कोण जाणे ध्यानाला बसलो ते इतके खोल गेलो कि स्थलकालाचे भानच राहिले नाही. आता मात्र अंधार पडायला लागला होता. काहीही स्पष्ट दिसेनासे झालेले होते.

भिक

लेखक बिपीन सुरेश सांगळे यांनी बुधवार, 10/09/2025 15:52 या दिवशी प्रकाशित केले.
भिक - शशक गणपती विसर्जनाचा दिवस. डीजेचा दणदणाट आसमंताला भिडलेला. एका मंडळापुढे पोरं तर्राट नाचत होती. एकजण खेळण्यातला हाडाचा सापळा घेऊन नाचत होता. बेभानपणे ! तशा गर्दीत एक लहान मुलगी घुसली. भिक मागायला. सापळावाला तिच्याकडे बघून हसला. त्याने तिला तो सापळा देऊन टाकला. भिक म्हणून . वारे औदार्य! ती घाबरली ; पण ते एक खेळणंच तर होतं. तो घेऊन ती एका मांडवाच्या मागे गेली. आडोशाला. तिथे तिची आई होती. झोपलेली. तिने आईकडे पाहिलं. मग त्या सापळयाकडे पाहिलं. आणि तिला एकदम हुंदकाच फुटला.

हिंदुत्ववादी आणि उजवे

लेखक उपयोजक यांनी बुधवार, 10/09/2025 12:24 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच भारतीय हे हिंदुत्ववादी लोक आणि उजव्या विचारांचे लोक यामध्ये गल्लत करतात. आधी बघू की हिंदुत्ववादी म्हणजे काय? १) त्यांना हिंदू धर्मातले देव ही संकल्पना मान्य असते. ते राम , कृष्ण , शंकर , हनुमान असे जे जे हिंदू धर्मातले देव आहेत ते त्यांना मान्य असतात. ते त्यांच्या अस्तित्वाबद्दल चिकित्सा करत नाहीत. हे काहीसे आक्रमक असतात. २) ते हिंदू धर्माबद्दल चुकीच्या शब्दात केलेली टीका , निर्भत्सना यांना कडाडून विरोध करतात. ३) त्यांना हिंदू धर्मातल्या बऱ्याचशा परंपरा , हिंदू धार्मिक ग्रंथ हे मान्य असतात. ते त्यांची चिकित्सा करत बसत नाहीत.

नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र

लेखक युयुत्सु यांनी बुधवार, 10/09/2025 08:43 या दिवशी प्रकाशित केले.
नग्नता- सवस्त्र आणि विवस्त्र ================ -- राजीव उपाध्ये डॉ० बर्नाड बेल या फ्रेंच विद्वान-मित्राने मला मानववंशशास्त्राची गोडी लावली (माझ्या लग्नात त्याने माझ्या बाजूने साक्षीदार म्हणून सही केली होती). मानववंशशास्त्राच्या परिचयाने जगभरच्या मानवीसंस्कृतींकडे बघायचा निकोप दृष्टीकोन प्राप्त झाला तर "सर्व काही भारतीय ते सर्वश्रेष्ठ" हा (सनातनी) दुरभिमान गळून पडला. खरं तर याची बीजं मुंबईला शिकत असताना पेरली गेली होती. आमच्याकडे चित्रपट बघण्यासाठी फिल्मक्लब आणि फिल्म सोसायटी असे दोन क्लब होते.

चंद्रग्रहण अनुभूती: हा खेळ सावल्यांचा!

लेखक मार्गी यांनी सोमवार, 08/09/2025 17:59 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार! काल रात्रीच्या चंद्रग्रहणाचा अनुभव अविस्मरणीय होता. सुरूवातीला ढग आणि पाऊस! त्यामुळे "संपेल ना कधी हा खेळ (ढगांच्या) सावल्यांचा" असं वाटत होतं. चंद्राला आधी ढगांचं ग्रहण लागलं होतं. दोन टेलिस्कोप व बायनॅक्युलरसह आम्ही मित्र तयार होतो. पण ढग होते. ढगात असतानाच चंद्र पृथ्वीच्या उपछायेत जाऊन ग्रहणाची सुरूवात झाली. पण सूर्य इतका तेजस्वी आहे की, तो अंशत: झाकला गेला तरी चंद्राच्या तेजात लक्षात येईल असा फरक पडत नाही. नंतर जेव्हा चंद्राने पृथ्वीच्या मुख्य सावलीत प्रवेश केला (सूर्य पूर्णपणे पृथ्वीच्या आड गेला) तेव्हा मात्र चंद्राची कडा काळी झालेली दिसली. पण सतत ढग होते.

कल्पका:

लेखक युयुत्सु यांनी सोमवार, 08/09/2025 12:10 या दिवशी प्रकाशित केले.
नास्ति भारत: देश: यत्र कल्पका: सन्ति दुर्लभा:। अपमानिता: यदा नित्यं प्रगतीस्तत्र कथं भवेत्॥ --राजीव उपाध्ये
काव्यरस

सोबत. . . अखेरच्या क्षणांची

लेखक हेमंतकुमार यांनी सोमवार, 08/09/2025 08:58 या दिवशी प्रकाशित केले.
दीर्घकालीन दुर्धर आजार अनेकांच्या वाट्याला येतात. संबंधित आजाराचे सर्व उपचार करून डॉक्टर्स थकले की शेवटी रुग्णाच्या नातेवाईकांना अंतिम सल्ला दिला जातो तो म्हणजे, “आता मृत्यूची वाट पाहण्याखेरीज आपल्या हातात काही नाही”. खरंय, अशा केसेसमध्ये मृत्यू हा अंतिम आणि नैसर्गिक ‘उपाय’ ठरतो. अशा तऱ्हेने त्या रुग्णाचे आयुष्यातील अखेरचे पर्व चालू होते आणि ते किती काळ चालेल हे अनिश्चित असते. आपल्या जिवलग अथवा कुटुंबीयांच्या मृत्यूची चाहूल लागणे हा कुतुहलमिश्रित दुःखद विषय असतो. प्रत्यक्ष मृत्यू होईपर्यंत कुटुंबीय अथवा सेवक अशा कोणाला ना कोणाला तरी रुग्णाची सोबत करावी लागते.

कवितेच्या गणिताची कविता + - x ÷

लेखक अनन्त्_यात्री यांनी रविवार, 07/09/2025 13:07 या दिवशी प्रकाशित केले.
कविता-रतीचे | विभ्रम अनंत तयांचे गणित | कैसे करू? तरीही करितो | वेडे हे धाडस माझ्या अक्षरांस | हासू नये :) ~~~~~~~~~~~ कधी बेरीज बेचैनीची कधी वास्तव वजावटीस कधी गुणाकार गहनाचा कधी भागे कवी शून्यास कवितेचे गणित कसे हे उत्तर ना त्याचे कळते ओळींच्या मधली जागा गणिताला डिवचून जाते गणिताच्या मर्यादांचा ज्या कुणी(@) लाविला शोध तो कवी नसावा हृदयी याचा नच उरतो खेद ~~~~~~~~~~~ @ Kurt Gödel is well-known for his incompleteness theorems, which showed inherent limitations of formal mathematical systems.
काव्यरस

संकेत

लेखक शेखर काळे यांनी रविवार, 07/09/2025 12:02 या दिवशी प्रकाशित केले.
सुकेतूचा हात मध्येच थांबला. त्याच्या स्क्रीनवर उजवीकडे खाली कोपऱ्या एक निळा गोलाकार ठिपका हळूहळू रंग बदलत होता. निळा रंगाचा ठिपका हळूहळू लाल होत होता सुकेतुचे डोळे मोठे झाले. त्याने आपल्या माऊसचा फोकस त्या लाल होणाऱ्या ठिपक्यावर केला. त्याबरोबर एक विंडो उघडली. त्या विंडोत वाक्य होते - मित्र संख्या २८ , वेळ उद्या सकाळी पहिली घटिका. सुकेतूने भराभर विंडो मधल्या इतर ओळी वाचायला सुरुवात केली. त्याचा श्वास वाढू लागला. त्याने कपाळावरचा घाम पुसला आणि म्हणाला, “ अरे या प्रोजेक्टची वेळ झालेली आहे”. बाजूलाच अंबुज बसला होता. तो म्हणाला, “ कसली वेळ?