Skip to main content

भास

लेखक गिरीशमित्र यांनी गुरुवार, 31/01/2008 10:13 या दिवशी प्रकाशित केले.
होतीस तू साथ द्याया हाती होता तुझा हात मोडलास डाव कसा आज हा नुसता भास की आभास ? ----गिरीश __
Taxonomy upgrade extras

पुस्तक परिचय!

लेखक पिवळा डांबिस यांनी गुरुवार, 31/01/2008 07:03 या दिवशी प्रकाशित केले.
मित्रहो, आज एका मराठी कादंबरीच्या विषयी लिहिणार आहे. कादंबरी तशी जुनी आहे पण त्याविषयी कुठे फारसे लिहुन आलेले वाचले नाही. माझ्या एका साहित्यिक मित्राने मला भेट म्हणून दिली होती. "वेगळी आहे, वाच", म्हणाला. म्हटले तर ही एक प्रेमकथा आहे, म्हटले तर एक शोकांतिका! प्रेमकथा म्हटली तरी प्रचलित विवाहसंस्थेत न बसणारी!! विशेष म्हणजे भारताच्या पूर्णपणे बाहेर घडलेली, किंबहुना जगाच्या सगळ्याच किनारयांपासून दूर घडणारी ही कथा. एक विलक्षण पार्श्वभूमी लाभलेली! एका निराळ्याच विश्वात घेऊन जाणारी!! लेखकाची प्रतिभा ज्वलंत आहे आणि शब्दांची निवड अचूक.

तीन पत्तीच्या खेळाची

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 31/01/2008 01:29 या दिवशी प्रकाशित केले.
अविनाश ओगल्यांनी केलेले अप्रतिम विडंबन 'चाळीमधल्या खोलीमधली राजा आणिक राणी ' वाचून आम्हाला ही स्पुरण चढले आणि मग तात्यांच्या विनंतीला मान देऊन आम्ही ही चार ओळी खरडल्या.. आमची प्रेरणा मंगेश पाडगावकर यांची अप्रतिम कविता भातुकलीच्या खेळामधली तीन पत्तीच्या खेळाची ही माझी कर्म कहाणी होते नव्हते सगळे गेले , वरती झाली देणी 'धोंड्या' वदला, बघून काल मज, मम हातीच्या रेषा दारू पत्ते याच्या पासून दूर राहा तू "केश्या" पण मजला हो उशिरा कळली ,गूढ अटळ ती वाणी खूप दिसांनी जमले सगळे, भरला कोरम सारा कुणी म्ह

ट्र्कच्या मागे..

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 31/01/2008 00:35 या दिवशी प्रकाशित केले.
मंडळी, आपण रस्त्यावरून जाता येता ट्रकच्या मागे लिहिलेली वाक्ये वाचतो. कधि कधी खूप गमतीदार असतात तर कधी आशिर्वाद मागणारी असतात. कधी कधी मैत्रीवर असतात. कधि कधी मनाला एकदम भिडतात. इथे तुम्ही वाचलेल्या ओळी इतरांसाठी लिहा.. मी वाचलेली, " मेरा भारत महान" आणि लगेचच खाली होतं "Highly Inflamable" तर , " मेरा भारत महान Highly Inflamable" असं वाचलं गेलं.. आणि हसू आलं. - प्राजु.

आपलं माणूस

लेखक संगीता यांनी बुधवार, 30/01/2008 22:27 या दिवशी प्रकाशित केले.
ही कविता माझ्या मैत्रिणीने लिहिली आहे. आनंदात असताना सुखात भागीदार कुणीही चालतं पण दु:खात रडताना अश्रू पुसायला आपलंच माणूस लागतं घोळक्यात असताना दंगामस्ती करायला कुणीही चालतं पण एकांतात असताना गुपित सांगायला आपलंच माणूस लागतं वरवरच्या जखमांना फुंकर घालायला कुणीही चालतं पण मनात खोलवर रुतलेल्या जखमांना आपलंच माणूस लागतं काळाच्या अंधारात विरणार्‍या आठवणींसाठी कुणीही चालतं पण मनाच्या कप्प्यात घर करण्यासाठी आपलंच माणूस लागतं कायमचंच रुसण्यासाठी अबोला धरण्यासाठी कुणीही चालतं पण आपल्यावर रुसण्यासाठी रुसवा आपला काढण्यासाठी आपलंच माणूस लागतं यशाच्या शिखरावर बेहोश होण्यासाठी कुणी
Taxonomy upgrade extras

मद्यमैफलीस प्रारंभ करण्यापूर्वी म्हणायचा श्लोक.

लेखक अविनाश ओगले यांनी बुधवार, 30/01/2008 21:29 या दिवशी प्रकाशित केले.
मद्यमैफलीस प्रारंभ करण्यापूर्वी म्हणायचा श्लोक. वदनी चषक लावा, जाम प्या परीपरीचे सहज कवन होते, जाम पिता फुकाचे पावन करी जीवा त्वा, मद्य हे पूर्ण ब्रह्म समय हरण नोहे, जाणिजे यज्ञकर्म. -अविनाश ओगले

निगेटिव्ह थिंकिंग - प्रचंड मोठा अडथळा, उपाय ?

लेखक यशोदेचा घनश्याम यांनी बुधवार, 30/01/2008 19:46 या दिवशी प्रकाशित केले.
आई वडिलांच्या छत्रछायेखाली असताना, सामाजिक जीवन, मित्र, नातेवाईक, स्पर्धा, यश - अपयश... ह्या, आणि यासारख्या संज्ञा, फक्त अभ्यास, खेळ आणि कलागुण यांतील उल्लेखनिय प्रगतिच्या भोवतिच रेंगाळत असतात. पण शिक्षण पूर्ण करून, अर्थार्जनाची सुरुवात केल्यावर या संज्ञांची अंधारातली बाजू समोर यायला लागते.

पचका वडा

लेखक आपला अभिजित यांनी बुधवार, 30/01/2008 19:11 या दिवशी प्रकाशित केले.
खरे तर हे साहित्य "पाककृती' या कलमाखालीच प्रसिद्ध व्हायला हवे होते. परंतु, हा प्रकार खाण्या-खिलवण्यापेक्षा अनुभवण्याचा जास्त आहे, असे सांगण्यात आल्याने, पाककृतीच्या गटातून त्याचे हात कलम करण्यात आले. त्यामुळे ते या गटात प्रसिद्ध करीत आहोत. - लेखक. (वरील मताशी मॉडरेटर सहमत नसतीलच, असे नाही.) ---------- मित्रहो, आपण अनेक पदार्थ खातो, पाहतो, अनुभवतो. त्यांची रेसिपीही माहिती करून घेतो. काही घरी बनवायला जमतात, काही जमत नाहीत.

वीरधवलचे लेखक कोण???

लेखक वडापाव यांनी बुधवार, 30/01/2008 18:07 या दिवशी प्रकाशित केले.
वीरधवल हे पुस्तक माझ्याकडे होते, पण २६ जुलैच्या प्रलयात ते खराब झाले. मला ह्या पुस्तकाच्या लेखकाचे नाव आठवत नाही. एखाद्या व्यक्तीला माहिती असल्यास त्यानी जरूर कळवावे.