मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

निगेटिव्ह थिंकिंग - प्रचंड मोठा अडथळा, उपाय ?

यशोदेचा घनश्याम · · काथ्याकूट
आई वडिलांच्या छत्रछायेखाली असताना, सामाजिक जीवन, मित्र, नातेवाईक, स्पर्धा, यश - अपयश... ह्या, आणि यासारख्या संज्ञा, फक्त अभ्यास, खेळ आणि कलागुण यांतील उल्लेखनिय प्रगतिच्या भोवतिच रेंगाळत असतात. पण शिक्षण पूर्ण करून, अर्थार्जनाची सुरुवात केल्यावर या संज्ञांची अंधारातली बाजू समोर यायला लागते. कदाचित, शाळा - कॉलेजात मिळणारे यश हे, सर्टिफिकेट, मेडल आणि मार्कलिस्ट मिळवून देते, तर नंतर मिळणारे यश हे, सॅलरी इंक्रिमेंट, प्रमोशन, बिझ्नेस ग्रोथ, सुखसोयी (बंगला, गाडि, नोकर्-चाकर) मिळवून देते, त्यामूळे या संज्ञांकडे पाहण्याचा आपलाच द्रुष्टिकोण बदलतो. आपलेच जिवाभावाचे मित्र - नातेवाईक मुद्दामहून किंवा नकळत आपल्याला त्रास होईल असे वागतात... नोकरि - व्यवसायात आपण कुठेतरि अडखळतो, आणि इतरवेळी नाहक सल्ला देणारे, अशावेळी मदत / मार्गदर्शन करायचे सोडून आपल्याकडे पाठ फिरवतात... अशा बर्याच घटना सांगता येतील, कि ज्यामुळे समाजाबद्दल एक कटुता मनात निर्माण होते. अशा परिस्थितीत दोन प्रकारे मनुष्य घडू शकतो. एक म्हणजे, या सर्वांवर उपाय काढून प्रचंड यश मिळवलेला, किंवा हतबल, निराश आणि कष्टी जीवन जगणारा. खरेतर समोर येणारे अडथळेच प्रगति करून देण्यास कारणीभूत ठरू शकतात. म्हणतात ना, 'जहाज हे किनार्यावर सुरक्षित असते, पण त्याचा निर्माण किनार्यावर राहण्यासाठी झालेला नसतो!'. संदिप - सलील (वर्तमान मराठी युवांचे प्रचंड आवडते संगीतकार) या प्रसिद्ध जोडिची कविताहि हेच सांगते - "जपत किनारा शीड सोडणे... नामंजूर!". अशा अडचणींवर मात करून यश मिळवणे यातच खरी कसोटि असते. किंबहूना, ज्याला या अडचणींना सामोरे जावे लागत नाहि, तो/ ती अतिशय निरस जीवन जगतो आहे असे म्हणावे लागेल. पण या अडचणींशी लढताना सामोर येणारी सर्वात मोठि अडचण म्हणजे, निगेटिव्ह थिंकिंग! आपण स्वतःच स्वतःशी शत्रुत्व ओढवून घेतो. आणि या शत्रुशी लढणे प्रचंड अवघड होउन बसते. निगेटिव्ह थिंकिंग हे एक जाग्रुतावस्थेत पडणारे भयस्वप्न आहे. मला यश कधीच मिळणार नाहि... माझे मित्र नातेवाईक यांना स्वतःच्या स्वार्थाशिवाय काहि दिसत नाहि... माझ्या वाईटातच त्यांचा आनंद आहे... असेच दु:खी जीवन जगण्यासाठी माझा जन्म झाला आहे... असे विचार करत आपण आपली स्वप्ने, ईच्छा - आकांक्षा पूर्ण करण्यासाठी झगडा करणेच थांबवतो. आणि ईथे आपली खरी हार होते. आणि पेराल तसे उगवेल या नियमाप्रमाणे, जितके जास्त निगेटिव्ह विचार होत राहतात तितक्या अधिकाधिक निगेटिव्ह घटना घडतही जातात. जी नाती खरेतर ईतकी कडवी मुळिच नाहित, त्यांत आपण स्वतःच विष ओतू लागतो... जे यश सहज मिळाले असते ते घालवून बसतो.... स्वतःशीच कसे लढावे !? यावरचे काही उपाय मी ऍकले आहेत... योगासने... साधना - ध्यान... निसर्गसानिध्य... उत्तम छंद... वगॅरे... अँटी डिप्रेशन टॅबलेट्स हि मी ऍकल्या आहेत (या काम कशा करतात माहित नाहि). पण मी माझ्या आईने केलेल्या संस्कराप्रमाणे, असे विचार माझा कब्जा करायला लागले कि, नामस्मरण वाढवतो (कुलदॅवतेचे). माझी श्रद्धा असल्याकारणाने मला योग्य परिणामहि मिळतो. कधीकधी नवनव्या रहस्यमय कथा कादंबर्या वाचायला घेतो (माझी आवड). ईथे झणझणीत मिसळ खायला येणार्या सदस्यांच्यासमोर हा विचार मांड्ल्या बद्दल दिलगिरी व्यक्त करतो, पण आपण, कसे स्वतःशी लढलात... कोणते उपाय अवलंबलेत... कसे अनुभव आले... याबद्दल ईथे लिहावे. कारण आज ना उद्या प्रत्येकाला स्वतःशी युद्ध करावे लागतेच!

वाचन 15975 प्रतिक्रिया 0