कॅलिफोर्निया स्पेशल!!
आपली स्वतःची ओळख करून देणार्या धाग्यामध्ये आम्ही कॅलिफोर्नियाचे रहिवासी असल्याचे म्हटल्यावर आम्हाला नंदन आणि बेसनलाडू यांचे उत्तर आले की ते सुद्धा तिथेच रहातात. तेंव्हा एक कल्पना सुचली की कॅलिफोर्नियात रहाणारे किती मि.पा मेंबर आहेत त्याचा अंदाज घ्यावा...
तर मि. पा. करांनो, जर तुम्ही सध्या कॅलिफोर्नियात वास्तव्य करीत असाल तर कृपया प्रतिसाद द्या...
पुरेसे मेंबर जमले तर आपण मि. पा.
शिळा सप्तमी
आमच्याकडे एकत्र मोठ्या कुटुंबामुळे सुरुवातीला शिळं उरणे हा प्रश्न नव्हता तसेच अ-तिथी (तिथी न ठरवून अचानक येणार्या पाहुण्यांची) कमी नव्हती पण कालौघात कुटुंबाचे विघटन झाले आणि शिळ्याचा प्रश्न उभा राहिला.
शिळ्या भाताचा शक्यतो लसणाच्या फोडणीचा किंवा कांद्याच्या फोडणीचा भात व्हायचा
पण सर्वांत जास्त वेळा व्हायचा तेल, तिखट, मीठ भात.
कृति - भातात सढळ हाताने तेल घालावे. त्यात लाल तिखट भुकटी / उसळी मिरची (ताजी, ठसका लावणारी असेल तर प्राधान्य), मीठ, पावभाजीसाठी करतो तसा बारीक चिरलेला कांदा आणि दाण्याचे कुट आवडीनुसार घालून भात नीट मिसळून घ्यावा आणि वेळ न घालवता खावा.
तोंड लोकांचे
प्रसाद यांच्या गुंड लोकांचे या सुंदर कवितेपासून स्फुर्ती घेऊन हा प्रयत्न.
तहानेने सुकत गेले तोंड लोकांचे
भाषणाने फक्त चाले तोंड लोकांचे
चतकोर भाकरी हि गुंतवी आशा
आश्वासने केवळ पुसती तोंड लोकांचे!
दुथडी भरून वाहे येथली कृष्णा
कोरडेच उरले मराठी तोंड लोकांचे...
दंगल बाहेर नि असती घरात हत्यारे
दत्त आडनावच उजळी तोंड लोकांचे
जरी मंचावर घालती गळ्यात हे गळे
मुखवट्या आड दडले तोंड लोकांचे
दोस्तहो तलवार नाही, लेखण्या परजा
लेखणी नक्कीच फोडे तोंड लोकांचे...
-ऋषिकेश
Taxonomy upgrade extras
माकडाची जात याची, मूढ कुठला केशवा
आमची प्रेरणा प्रसाद यांची अप्रतिम गझल नोकरांना जात कुठली, धर्म कुठला शेटजी
आणि खोडसाळ यांचे तितकेच अप्रतिम विडंबन नोकरांना खाज सुटली, घर्म फुटला शेटजी
माकडाची जात याची, मूढ कुठला केशवा
जो तुम्हाला वाटला तो हा न इथला केशवा!
जुनी व दुर्मिळ हिंदी चित्रपट गीते (दुवा)
मित्रहो,
जुन्या व दुर्मिळ गाण्यांसाठी सापडलेला एक दुवा
http://www.indianscreen.com/songs.htm
संजय अभ्यंकर
श्रद्धांजली!
कविराज वसंत बापट गेले तेव्हा या ओळी लिहिल्या होत्या.
Taxonomy upgrade extras
शब्देविण संवादिजे...
सोंग झोपेचे घेऊन
स्वप्न सुंदर पडेना
देह-भूमिती जाणून
मन-गणित सुटेना
पडे पैशाचा पाऊस
सूर कोरडा राहिला
घाट बांधायाची हौस
देव दगड जाहला
भरी रांजण स्वार्थाचे
घुसे मग तो दिंडीत
टाकी रुपये चोरीचे
वारकर्याच्या झोळीत
पापपुण्याचा करावा
हिशेब ना कधी कोणी
गणिकेच्या गळ्यातून
येती गंधर्वाची गाणी
डोके चालविण्या आधी
भिंत चालवावी लागे
हीच ग्यानबाची मेख
करी झोपलेल्या जागे
शब्देविण संवादिजे
असा अधिकार त्यांचा
बाकी सार्यांनी आणिला
आव श्रवणभक्तीचा
--अशोक गोडबोले, पनवेल.
Taxonomy upgrade extras
मानिनीस (पूर्ण कविता आठवतेय का?)
नमस्कार,
एक कविता आठवण्याचा प्रयत्न करतोय... बहुधा बा.भ.बोरकरांची आहे.
शीर्षक 'मानिनीस' (असेच आहे बहुधा :)
आज तुझ्या नयनात मानिनी, शरणागती अनुताप
हास्यविनोदांमध्ये तुझ्या अन सलज्ज मूक विलाप
व्यथा परि तव आज मानिनी ...................
नव्या .... मध्ये अन जूना तुझा अभिमान
अशी काही ती कविता आहे. आपल्या पैकी कुणाला ती पूर्ण आठवत असल्यास येथे द्याल का?
आभारी,
--लिखाळ.
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
