नशा!
आमच्या असे लक्षांत आले आहे की नशा या विषयावर मि. पा. वर बरेच लिहिले जाते. त्यातील बहुतेक लाईट, थट्टामस्करीच्या स्वरूपातील असते. काही जि़ज्ञासू लोकांनी ज्ञानसंपादनाच्या दृष्टीने विचारलेले प्रश्न असतात, तर काही अज्ञ कॉमेंन्टस ही असतात. परंतु प्रस्तुत प्रयत्न मात्र या विषयावर काही गंभीर विचार मांडण्याचा आहे.
नशा म्हणजे काय हे प्रथम निश्चित केले पाहिजे. मटेरिया मेडिकाच्या व्याख्येनुसार (मराठीत अनुवादित) जेंव्हा मेंदू व इतर मज्जासंस्था शिथील अवस्थेत असते त्या अवस्थेला नशा असे म्हणतात. लक्षात घ्या, "शांत" किंवा "आनंदी" अवस्था नव्हे, तर "शिथील" अवस्था!