Skip to main content

(गणित)-१

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 06/03/2008 18:08 या दिवशी प्रकाशित केले.
बरेच दिवस जालावर कच्या मालाचा तुटवडा होता आणि काल अजानक आभाळ फाटले..दोन तीन कविता हतावेगळ्या केल्या नंतर गणित ही मृण्मयीताईंची अप्रतिम गझल वाचून आम्ही आता याची काय 'मोडतोड' करावी ह्या विचारतच होतो तेव्हढात अदितीताईंनी त्यांच्या अल्पमतीप्रमाणे केलेली एकदम अप्रतिम मोडतोड (गणित) वाचनात आली विडंबनाचा च्या त्या 'मोडकातोड'का प्रयत्नाची आम्ही केलीली ही मोडतोड गोड मानून घ्यावा ही विनंती --केशवसुमार तुझे नाव कैसे करावे वजा तुझे काव्य म्हणजे आम्हाला मजा कशाला पुन्हा काव्य हाराकिरी? जुन्या 'मोडतोडी' पुन्

(गझल)

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 06/03/2008 16:35 या दिवशी प्रकाशित केले.
अजून आहे ठरायचे, उठायचे की 'बसायचे' इथे न ओठांस ओलही, कसे कुणी आज़ प्यायचे ? ओळओळ इकडेतिकडे पाडायाचा सोस जुना! आयत्याच या कविता घ्या, स्वत: कशाला लिहायचे ? प्रिये तुझ्या त्या बापाचे हात नव्हेतच नाजुकसे! (गालांवर कडकडलेल्या विज़ांस कैसे स्मरायचे ?) वेगवेगळ्या कवितांचे मिळत ज़ात आंदण आहे अंतर दोनच मिनिटांचे, मागे कां मी पडायचे ? कां पेल्यातून शेवटच्या करावीस मैफल हळवी ? पेय अनावर झाले तर, पोट दाबुनी धरायचे आमची प्रेरणा: फिनिक्स यांची गझल

जेथे बघेन तेथे... (विडंबन)

लेखक बेसनलाडू यांनी गुरुवार, 06/03/2008 16:00 या दिवशी प्रकाशित केले.
जेथे बघेन तेथे डोळ्यांस स्वप्न दिसते फटकावले मला की भार्या प्रसन्न दिसते... आहे खरी अवदसा ही वेगळीच दृष्टी ! का लागलीच कविता मज मात्र भिन्न दिसते...? जेव्हा लिहून बघतो, जग हासतेच वेडे जेव्हा पडीक असतो, जग खिन्न-खिन्न दिसते... मी गुत्त्यामध्येच इतकाइतका रमून जातो; उधळीत रंग माझे, मज सर्व नग्न दिसते... "हणतोच", तो म्हणाला, मी ऐकलेच नाही मी एकटाच आता, अन सर्व सुन्न दिसते... मी लेखनास आता पेल्यात बंद केले कोणी किती म्हणू दे "मडकेच भग्न दिसते"... आमची प्रेरणा: अजबरावांची मस्त गझल - पाणावले तरीही

सुरापुराण - प्रथम अध्याय..

लेखक अनिकेत यांनी गुरुवार, 06/03/2008 13:17 या दिवशी प्रकाशित केले.
ॐ नमो सुरादेवते | क्लेशहारिणी जगन्माते | जी आम्हा नशेप्रत नेते | अखंड नमन करितो तिज ||१|| जे तुझे परमभक्त | मूढ ज्यांस बेवडे म्हणत | मद्यपी ते सदोदित | तव स्तुती करती अहर्निशी ||२|| जरी त्यांनी अनेक लिहिली | स्तुतिपर काव्ये तुजप्रती भली | ना तुझी पोथी लिहिली | म्हणून हा ग्रंथप्रपंच ||३|| जरी हा अनिकेत मूढमती | काव्यात मुळीच नाही गती | खरीच जी तुजवर भक्ती | ग्रंथ तडीस नेईल हा ||४|| म्हणोन मी ऐसे म्हणतो | तुझे चरणतीर्थ आधी प्राशितो | त्यावरीच हा ग्रंथ लिहितो | सुरेख होईल नि:संशय ||५|| तेव्हा आता माते | तूच माझिया हस्ते | लिहावेस ह्या ग्रंथाते | कृपा करावी भक्तांवर ||६|| ह्या ग्रंथाचे करोनि

या गो दांड्यावरनं

लेखक आनंद घारे यांनी गुरुवार, 06/03/2008 11:57 या दिवशी प्रकाशित केले.
या गो दांड्यावरनं नवरा कुनाचा येतो हे एक अत्यंत लोकप्रिय गाणे आहे. पण सुरुवातीच्या तीन चार ओळीनंतरचे शब्द मला माहीत नाहीत. ते पूर्ण कोणाला ठाऊक आहे कां किंवा ते कोठे मिळेल?

"केस कापणे : एक (दुर्दैवी) अनुभव........"

लेखक छोटा डॉन यांनी गुरुवार, 06/03/2008 10:23 या दिवशी प्रकाशित केले.
अशी शक्यता आहे की तुम्ही लोक लेखाचे शिर्षक "केस कापणे : एक (दुर्दैवी) अनुभव" वाचूनच गोंधळात पडला असाल! बरोबर आहे ना , त्यात असा मोठा तीर मारला मी "केस कापून" ? त्यात काय नविन ? का आपलं आम्ही वाचतो म्हणून काही पण लिहाल ? तुमचं हे तर 'सुभाष घाई, रामु आणि करन जोहर सारख्या मंडळींच्या वर झाले , कारण त्यांचा असा विश्वास आहे की आपण काही पण दाखवले तरी लोक बघतातच ना, मग नंतर घालेनात का शिव्या आपले तर तुंबडी भरायचे काम झाले आहे... असो.

झेप

लेखक अर्चना देशमुख यांनी गुरुवार, 06/03/2008 08:56 या दिवशी प्रकाशित केले.
एकदा सहज TV समोर बसून कार्यक्रम बघत होती. आणि केव्हा लक्ष दुसरी कडे केंद्रित झाले समजलेच नाही .आणि मी त्या विचार मधे गुरफ़टून गेले. अमेरिकेत आल्यावर मला एकच प्रश्न नेहमी असायचा की इथे आल्या नंतर मुलींच्या अभ्यासचे कसे व्हायचे? मी ठाण्याला होते तेव्हा ही जबाबदारी बिनदिक्कत निभवायची मला कधीही ह्या गोष्टींची चिंता नसायची. मी दिवसभर साँस बहुच्या सीरियल आणि माज्या कीटी पार्ट्या पण एन्जॉय करायची. मुलिंचा अभ्यास तर माझ्या डाव्या हाताचा खेळ असायचा. अमेरिकन स्कुल च्या अँड़्मिशनचे दिव्य पार पाड्ल्यानन्तर मी जेव्हा तिचा अभ्यासक्रम बघितला तेव्हा मलाच जास्त टेंशन आले आणि मी चिंताग्रस्त झाली.

(दृष्टी भ्रम)

लेखक केशवसुमार यांनी गुरुवार, 06/03/2008 08:29 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा श्वास स्वतीचा यांची कवितादृष्टी भ्रम (दृष्टी भ्रम) . गेले कित्येक दिवस मला मी .... जरा बरा वाटत होतो. मग गुत्यात चमकणारे दिवे. आता पाहतो तर, वाढलेले कान. उद्या कदाचित!! शेपटी ही दिसेल. आणि पुढे, खूर आलेले हात. किंवा मग आणखीन काही... अस्पष्टसं..... ढोस केशवसुमार ................ ०६-०३-२००८

दडपे पोहे

लेखक सृष्टीलावण्या यांनी गुरुवार, 06/03/2008 07:38 या दिवशी प्रकाशित केले.
हा पदार्थ केवळ चांगली फोडणी करण्यावर अवलंबून असतो. फोडणी काजळीपूर्वक केली की पहिल्या घासातच मन तृप्त होते. फोडणी करण्याची पद्धत - १) फोडणीचे साहित्य नेहेमी तयार ठेवावे मगच तेल गरम करायला घ्यावे. २) सुरवातीला पोह्याच्या हिशोबाने तेल घ्यावे (साधारण अर्ध्या किलो पातळ पोह्याला ३ टेबलस्पून तेल) आणि कढल्यात मध्यम आचेवर गरम करायला ठेवावे. ते जरा कोमट झाले की हाताने अर्धा चमचा मोहोरी घालावी. ३) ती तडतडायला लागली की हातात अर्धा चमचा उडिदाची डाळ तयार ठेवावी. वाट पाहावी. मोहोरीच्या तडतडण्याचा आवाज बंद झाल्याक्षणी उडिदाची डाळ घालावी.

माझेही....

लेखक प्राजु यांनी गुरुवार, 06/03/2008 06:01 या दिवशी प्रकाशित केले.
संदीप खरे यांच्या काव्यांवर सध्या तलवार चालवली जाते आहे. केशवसुमार, धनंजय, सर्किट, ओगले साहेब यांच्या खमंग भाजलेल्या खार्‍या शेंगदाण्याच्या पुडित माझा हा खवट, कुसका शेंगदाणा खपवून घ्यावा ही विनंती. चाल : मन तळ्यात मळ्यात, जाईच्या कळ्यांत.... खर गव्हातं, तांदळातं, गूळाच्या शिर्‍यातं.. खर नाजूकशी एक गार, माझ्या वरण आणि भातात.. घरी चाळणींची चळचळ वाढे खरखरं उगी तशात इथे वाण्याला सांगतो आणि अरे वाणी.. असे भेसळ तुझ्या मालात.. भिडू लागे राख दातालाही माझ्या दातांची धार घशात... माझ्या नयनी लक्ष त्या धारा आणि राग तुझ्या डोळ्यांत... - प्राजु