Skip to main content

चाळ ही हदरून जाते

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 17/03/2008 19:40 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा राजा बढे यांची अप्रतिम रचना चांदणे शिंपित जाशी चाळ ही हदरून जाते चालता तू चंचले देह हा हलवीत जाशी हालती पाळेमुळे वाटते पाहून तिजला ही कटी की कंबरा काल थोडीशी पळाली दार अमुचे मोडिले वाढविले सर्व हे जीने पहा पायी तुझ्या जे तुझ्या चालीपरी, घेरापरी रुंदावले गे विशालांगी कशाने झाकशी काया तुझी ? लागले तागे किती मग सौंदर्य हे मावले

पांढरा रस्सा

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 17/03/2008 18:26 या दिवशी प्रकाशित केले.
काही गोष्टींचे उल्लेख जरी आले तरी काही पुस्तके आठवतात्.किंवा काही लेखकांचे उल्लेख आले तरी काही आठ्वणी ताज्या होतात्.काही उत्सुकता चाळवल्या जातात... उदा: त्याने घोडा झाडाला बांधला आणि दश्म्या सोडल्या हे वाक्य हम्खास गुरुनाथ नाइकांच्या गोलंदाज कथे मधे यायच्या. तसेच बाबा कदमांच्या कादंबरीत " पांढरा रस्सा " हा हमखास असतोच.त्यांच्या कोणत्याही कादंबरीचा तो अपरीहार्य भागच जणू. दश्म्या माहीत होत्या पण अस्सल पांढरा रस्सा मी कोल्हापूर ला जाउन चाखला. मला "पांढरा रस्सा" ची पाक क्रुती हवी आहे.
Taxonomy upgrade extras

महत्वाचे..मदत हवी आहे

लेखक माझी दुनिया यांनी सोमवार, 17/03/2008 16:53 या दिवशी प्रकाशित केले.
मला माझ्या एच.डी.एफ.सी बँकेकडून आत्ताच एक विरोप आला. तो विरोप जसाच्या तसा खाली देत आहे. इंग्रजीत आहे पण कृपया मह्त्वाचा आहे म्हणून तसदीबदल क्षमस्व.
Important Notice : In the last few weeks, our Online Banking Security team has observed multiple logons on your Internet Banking Account, from different Blacklisted IP's, therefore been blocked, to prevent further unauthorized access for your safety.

घटका, पळें...यक्षप्रश्न...झिरो पॅडिंग...असंबद्ध

लेखक नंदन यांनी सोमवार, 17/03/2008 15:30 या दिवशी प्रकाशित केले.
एक चिवित्र घड्याळ. वेळ, जगाची लोकसंख्या, जन्म, मृत्यू...एवढंच नाही तर पृथ्वीचं वाढतं तपमान, घटणारी जंगले, वापरलं जाणारं खनिज तेल इ. दाखवणारे. दर सेकंदाला एक लग्न, एक गर्भपात आणि एक पंचमांश घटस्फोट होतो, ही माहिती(!) देणारं. http://www.poodwaddle.com/clocks2.htm हे लिहायला जेवढं वेळ लागला तेवढ्यात पन्नासेक जन्म, वीस-बावीस मृत्यू, थोडे अपघात, डझनावारी लग्नं, चार-पाच घटस्फोट,एक कॅन्सरग्रस्त, एखाद-दुसरी आत्महत्या इ. झाल्यात ही डिप्रेसिंग बातमी देणारा एक अजून 'नाऊ' लिहिलेला टॅब.

मराठी माणूस (शिळ्या कढीला ऊत!)

लेखक दिनेश५७ यांनी सोमवार, 17/03/2008 11:26 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी माणूस `मराठी माणूस', `मराठीची अस्मिता' असे शब्द आजकाल हरेक मराठी माणसाच्या तोंडावर आहेत. मराठीच्या भवितव्याची चिंता तर राज्यकर्त्यांपासून सामान्य मराठी माणसाला छळते आहे. गेल्या वर्षी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांनी अमेरिकेत मराठी जपण्यासाठी ५० लाखांचे (अनु)दानही दिले. मराठी जपण्यासाठी मराठी माध्यमाच्या शाळा हव्यात, इ़ग्रजीचे आक्रमण थोपवावे, वगैरे चिंताग्रस्त विचारही उमटत असतात. पण मराठी माणसाचं पहिलं लक्षण कोणतं? घरात एक मूल जन्माला आलं की थोरामोठ्यांच्या गर्दीनं भरलेलं घर खऱ्या अर्थानं भरून जातं.. प्रत्येक घरात मुलाच्या आगमनाचा आनंद अवर्णनीयच असतो...

(वाट)

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 17/03/2008 10:32 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा सारंग यांची सुरेख कविता वाट सांज किंचित किर्र काळोखात जाता कोण घाली या मनाला साद आता? दूर गुत्यातून येते हाक आता पावले जाती कुणाच्या मागुनी ही? की सुरांचा माग घेती जागुनी ही? वाजते हे काय या रंध्रात आता? पाय ही पडती जरा वेगात आता चाललेली आत ही उन्मत्त गाणी! गात असते सावळी ठेक्यात राणी! त्या तिच्या त्या जीवघेण्या हालचाली! त्या नशेने भरून जाते सर्व खोली भास-सत्याची अनोखी पुसट रेषा जाणुनी घ्यावी अशी संकेतभाषा ती हवीशी वाटते अंधारबोली अन मनाशी जागते तुषार्त ओली सांज आता पूर्ण अंधारात गेली एकट्याने चालण्याची वेळ झाली शुद

मदतीचे आवाहन / कळकळीची विनन्ती

लेखक उदय सप्रे यांनी सोमवार, 17/03/2008 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
मी सध्ध्या छत्रपती शिवाजी महाराजान्ची माणसे यावर क्रमशः लिहितो आहे - यातील "बाजी पासलकर" लिहून तयार आहे ३० पानी, मला ते छापण्यासाठी "प्रायोजक" हवा आहे, दुसरे पुस्तक " कान्होजी जेधे" ८५% लिहून झाले आहे.तसेच "झन्झावात" (सम्भाजी महाराजान्च्या जीवनावरील ऐतिहासिक कादम्बरी) साठी पण प्रायोजक हवा आहे मुद्रकासह , यावर कुणी काही करु शकेल काय , तर करावे आणि मल कळवावे ही विनन्ती. आपला विनम्र, उदय सप्रे, ठाणे

निसर्गाची किमया

लेखक धनाधीश यांनी रविवार, 16/03/2008 21:25 या दिवशी प्रकाशित केले.
owl!!!! असे डोळे इंद्राकडेही नसतील. waah!! popat बघत राहावंसं वाटतं. kaay garudin aahe!! आपण प्रत्यक्षात तेथे असत

विडंबन - तोच नौरोबा घरात, स्थूल आणि स्वस्थ ही

लेखक अविनाश ओगले यांनी रविवार, 16/03/2008 21:04 या दिवशी प्रकाशित केले.
आमच्या प्रेरणा - १. शांता शेळके यांची कविता तोच चंद्रमा नभात २. बॅंकेतून स्वेच्छानिवृत्ती घेतलेले आमचे काही नशीबवान सहकारी ३. त्याच सुमारास कर्नाटक सरकारने एक्साइज ड्यूटी कमी करुन मद्य स्वस्त केल्याची आनंद वार्ता (हुश्श......