Skip to main content

(एका माळेचे मणी)

लेखक केशवसुमार यांनी सोमवार, 24/03/2008 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा मिलिंद फणसे यांची अप्रतिम कविता एका माळेचे मणी
 
शेवटी सगळेच जातीचे निघाले
हे समीक्षक सर्वपित्रीचे निघाले

प्रेम, स्वप्ने, दुःख, आसू सर्व त्यांचे
आमचे दिव्वाळखोरीचे निघाले

लाभता संधी किती करतात बडबड
रोग त्याचे सर्व साथीचे निघाले

जे सभा भुंकून गेले आकसाने
श्वान ते भलत्याच, चावीचे निघाले

लायकी त्यांचीच सर्वांना कळाली
सर्व अनुयायी शिखंडीचे निघाले

वॄत्तपत्र नव्हे मित्र?

लेखक प्रशांतकवळे यांनी सोमवार, 24/03/2008 18:28 या दिवशी प्रकाशित केले.
वॄत्तपत्र नव्हे मित्र - कोणाचा? http://maharashtratimes.indiatimes.com/articleshow/2882865.cms ह्यावरून काय वाटते? विशेषतः शेवटचे वाक्य "इतर गावांसाठी दादर एक आदर्श उदाहरण ठरले आहे" प्रशांत.

गणपत पाटील, विनम्र आदरांजली...

लेखक विसोबा खेचर यांनी सोमवार, 24/03/2008 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
मराठी रजतपटावरील गणपत पाटील या ज्येष्ठ कलाकाराला मिसळपाव परिवाराची विनम्र आदरांजली.... लावणीप्रधान मराठी चित्रपटातील त्यांनी रंगवलेला 'नाच्या', हा मराठी चित्रप्रेमींच्या नेहमीच लक्षात राहील! तात्या.

सुपारी आणि नारळ

लेखक विजुभाऊ यांनी सोमवार, 24/03/2008 11:43 या दिवशी प्रकाशित केले.
सुपारी आणि नारळ: आपण एखाद्याला फुटावयाचे असेल त्याचा पत्ता कट करायचा असेल तर त्याला "नारळ देउया" असे म्हणतो एखाद्याला बोलवयचे असेल तर त्याल " सूपारी दीली " असे म्हणतो. नारळआणि सुपारी हे दोन्ही ताड वर्गिय व्रुक्ष आहेत्.दोन्ही कोकणात मुबलक सापडतात हे त्यांच्यात साम्य. पण नारळ हा "तो नारळ "असतो आणि सूपारी ही "ती सूपारी" असते. बायको सोबत नसेल तर कनवटीस सूपारी लावण्याची प्रथा आहे....(काही सुधारलेल्यास्त्रियानी पती सोबत नसेल तर कनवटीस नारळ लाउन पूजा कर्ण्याचा प्रयत्न केला होता.पण ते पती प्रमाणेच अडचणीचे झाल्याने ही प्रथा फार रोजली नाही) तरी मिपा वरच्या ज्ञानीयानी "हाकलण्यासाठी नारळ आणि आमंत्रणासाठी

लोकमित्र मंडळ - शिक्षणात्मक लेख लोकांत पोचवण्याचा प्रकल्प

लेखक धनंजय यांनी सोमवार, 24/03/2008 08:09 या दिवशी प्रकाशित केले.
तीन महिन्यांपूर्वी यनावाला यांनी (अन्यत्र) चालू केलेल्या विषयावर पुढे विचार येथे देत आहे. गेल्या तीन महिन्यात लोकमित्र प्रतिष्ठान नावाची एक विश्वस्त संस्था मी फोंडा, गोवा, येथे पंजीकृत केली आहे. या संस्थेची कागदपत्रे विश्वस्तांच्या हातात रजिस्ट्रार कडून आता प्राप्त झालेली आहेत (विश्वस्त तसेच संस्थेसाठी मी दिलेल्या पैशांचा करण्यास समर्थ म्हणून माझे काही नातेवाईक योजले आहेत. मंडळ कार्यरत झाल्यावर यांच्या हातून जबाबदारी आणि सूत्रे काढून टाकावीत अशी माझी इच्छा आहे.) काम एक कार्यकारी मंडळ करेल.