फुलझाडे कशी लावावीत?
नर्सरी किंवा बागेची साहित्य (रोपे वगैरे) न आणता कमीत कमी किंमतीत (फुकटातच म्हणा ना)
फुलझाडे वगैरे लावुन बाग कशी सजवावी?

गंध अलौकिक याचा
क्षणभंगूर जीवन जरी
शुभ्र पाकळ्या कोमल
नाजूक नाभी शेंदरी
छंद समर्पाणाचा आगळा
वेड्याने त्या जोपासताना
मातीलाही गंध दिला
फांदीवरूनी ओघळताना
मैत्री व्हावी ऐसी
जिवाला जीव देणारी
जीवन ऐसे सार्थ व्हावे
पारिजात फुला परी...
- प्राजु