मी डेटिंग केले नाही..!
मी डेटिंग केले नाही, मी सेटिंग केले नाही.
मी निरोप सुद्धा साधा कधी पाठवलेला नाही.
भवताली चॅटिंग चाले, ते विस्फारुन बघताना,
कुणी दोस्ती वाढवताना, कुणी गर्लफ्रेंड मिळवताना.
मी लॉग इन होऊन बसलो मेसेंजरवरती जेव्हा.
मज हाय करायला देखिल कुणीही पिंग केले नाही.
मी डेटिंग केले नाही..
बुजलेला यांत्रिक चेहरा, सुटलेली घाबरगुंडी.
सुंदर पोरी बघताना भर उन्हात वाजे थंडी
त्यांच्या बापाला भ्यालो अन भावालाही भ्यालो.
मी स्वप्नात सुद्धा माझ्या कधी "लफडा" केला नाही.
मी डेटिंग केले नाही
अव्यक्त फार मी आहे मूळ मुद्द जिथल्या तेथे.
Taxonomy upgrade extras
मिसळपाव
२. पक्ष्याच्या डोळ्यातून (bird's eye view :) )
.
.
(फिरता प्राणी) बबलु-अमेरिकन...