श्रावणातील सण
लेखनविषय:
Taxonomy upgrade extras
श्रावणातील सण
होता श्रावणाचे आगमनं
सुरू होते सणांची उधळणं
गोड धोड मिळे खायला
आणि सुट्ट्यांना उधाण
प्रथम येते नागपंचमी
फुलोय्रावाचून हिची महती कमी
काढून सर्पनक्षी देवघरा
त्यापुढे सान-थोरही नमीं
मग येते पौर्णिमा नारळी
जमती सारे बांधव कोळी
पूजती त्या सागरदेवतेला
जो त्यांना हो सांभाळी
दिन हा रक्षाबंधनाचा
भावा-बहिणीचं नातं जपण्याचा
वचन बहिणीला देऊन
रक्षण तिचे करण्याचा
साजरा होतो गोपाळकाला
पाळणी घालून श्रीकृष्णाला
गल्लोगल्ली रचती मनोरे
बाळगोपाळ दहीहंड्या फोडाया
वर्षभर नांगरणाय्रा मळा
हा तर बैलांचा सोहळा
बळी होऊन कृतज्ञ
फुटे मैदानी हा पोळा
असा संपे हा श्रावण
मनी पावित्र्य साठवून
वेध लागती गणरायांचे
घरी होण्या विराजमान
-अथांग सागर
वाचने
4014
वाचनखूण
प्रतिक्रिया
5
श्रावण सणांची कविता आवडली.
- (सर्वव्यापी)प्राजु
http://praaju.blogspot.com/
प्राजुच्या मताशी सहमत. :)
In reply to कविता आवडली. by शितल
मनापासून धन्यवाद प्राजु ताई व शितल ताई...
-अथांग सागर
कविता आवडली.
यमकासाठी आणि चुकीचे टंकन / व्याकरण नको म्हणून एक सुचवावेसे वाटते. अर्थ तोच राहील याची काळजी घेतली आहे. राग नसावा.
प्रथम येते नागपंचमी
फुलोर्याविना हिची कमी महती
काढून सर्पनक्षी देवघरा
त्यापुढे सान-थोरही नमती
In reply to कविता by अरुण मनोहर
इथे मला 'मी' साठी यमक हवा होता म्हणून शेवटच्या ओळीत 'नमीं' टाकलयं....तुम्ही सुचवलेला वरील पर्यायसुध्दा सुरेख आहे.
-अथांग सागर
छान आहे..