मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

कणकेचा केक :पौश्टिक झट्पट

स्मार्ट बनी · · पाककृती
१ वाटि कणिक १ वाटि पाणी २ चमचे बेकीन्ग पावडर अर्धि वाटि गूळ गूळ ,कणीक ,पाणी एकत्र करावेत बेकिन्ग पावडर मिक्स करावि आणी अर्धा तास ओव्हन मधे १५० (से ) डीग्रीज ला ठेवावे ...(३५० फ). मस्त पौष्टिक केक तयार.... स्मार्ट बनी

वाचने 6325 वाचनखूण प्रतिक्रिया 9

३_१४ विक्षिप्त अदिती 06/08/2008 - 10:01
वाचून तरी पौष्टीक आणि चवीष्ट वाटत आहेच! पण तेल/लोण्याऐवजी तूप वापरलं तर?

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्नेहश्री 06/08/2008 - 10:03
खुपच सोप्पा आहे हा...!!! पण सध्या श्रावण आहे ना....मग नंतर करुन बघु नक्की. --@-- स्नेहश्री रहाळ्कर.--@-- आनंदाचे क्षण असतातच जगण्यासाठी दुःखाचे क्षण असतातच विसरण्यासाठी पण खुप काही देउन जातात हे आयुष्यात पुढे जाण्यासाठी

In reply to by ३_१४ विक्षिप्त अदिती

स्मार्ट बनी 06/08/2008 - 10:08
तूप वापरऊन चालेल कदचित ..मी अजून करून नाहि बघितले :)

विसोबा खेचर 08/08/2008 - 11:26
छ्या! कैच्या कैच लागेल हा केक! असो... आपला, (मेरवानच्या केकचा प्रेमी) तात्या. हे पाहा आमच्या ग्रँटरोडावरचे मेरवानचे दुकान. उत्तम मावा केक, ब्रुममस्का, बनमस्का, पावमस्का, स्क्रँबल्ड अंडी, उत्तम आम्लेट, कडकमिठी चाय! क्या बात है... आपला, (मुंबईतल्या इराणी हॉटेलांचा प्रेमी) तात्या.

चित्रा 11/08/2008 - 23:48
दिव्यांच्या अमावस्येला करण्याचे कणकेचे दिवे कणकेत गूळ घालून उकडून काढतात, त्यासारखेच चवीला लागणार हे बहुदा. केक म्हणूनही चांगले लागेल बहुतेक..

In reply to by चित्रा

चतुरंग 12/08/2008 - 00:03
दिव्याच्या अवसेचे कणकेचे दिवेच लागणार हे मिक्श्चर! तरीही करुन बघायला हरकत नाही. कारण मला दिवे आवडतात, खायला आणि लावायलाही! :D चतुरंग