Skip to main content

जाने तु या जाने ना....

लेखक सौरभ वैशंपायन यांनी रविवार, 24/08/2008 22:08 या दिवशी प्रकाशित केले.
एप्रिल मध्ये हा लेख मला सुचला होता. तसं याला काय नाव द्यावं ते सुचत नव्हतं, आधी याचं नाव "दिल हि दिल मै!" असं होतं. मात्र सध्या "जाने तू..." गाजतोय, आणि त्याची थीम दे़खिल याला साजेशीच निघाली हा योगायोग आहे. हि २ जणांची पत्र आहेत. दुसरं पत्र उत्तर म्हणुन लिहिलय. काय आहे ते वाचुनच बघा आवडतं का ते! कदाचित एखाद्याच्या आयुष्यात असं झालहि असेल.....किंवा होईल हि. ---------------------------------------------------------------------------------------------- १. Hi Dear!!!!!! कशी आहेस? काय चालु आहे सध्या? अभ्यास कसा चालंलाय? नीट अभ्यास कर! सहा महिन्यांनी M.B.A. ची परीक्षा असेल ना?

आई..! तुझी, आ..ठ..व..ण येते...!

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी रविवार, 24/08/2008 21:49 या दिवशी प्रकाशित केले.
आई ह्या एका शब्दाचे किती म्हणून अर्थ काढावे बरं.आईला किती नावांनी ओळखलं जावं. मॉं (ऊली) याने आई म्हणजे सबकुछ माऊली! "आई, आई .... (मै आई,बेटा मै आई)" म्हणजेच, "अगं मी येते!, अरे मी येते! " असं जी आपल्या मुलांना ओरडून सतत म्हणत असते ती "आई" तिच माऊली, तिच मॉं, तिच माय, म्हणजेच "my"- माय- माझी, MOM म्हणजेच My Own Mother तिच शब्दशः आई. नुसता "आई" हा शब्द्च पहाना, पहिलं अक्षर, "आ" म्हणजे आकाशा एव्हडी प्रचंड मन असलेली. दुसरं अक्षर "ई" म्हणजेच जी ईश्वरा एव्हडी देवतुल्य.

एक प्रश्न....

लेखक विसोबा खेचर यांनी रविवार, 24/08/2008 12:47 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम मंडळी, आपल्या सगळ्यांनाच माहीत आहे की महाभारताच्या युद्धात श्रीकृष्णाने पांडवांची बाजू घेतली आणि त्यांचे सारथ्यही केले. कारण काय तर पांडवांची बाजू धर्माची होती. कौरवांची बाजू अधर्माची होती. परंतु जुगारात स्वत:च्या पत्नीलादेखील दावणीला दावावर लावण्याचा निर्ल्लज्जपणा करणार्‍या पांडवांची बाजू ही धर्माची कशी काय? कुणी खुलासा करेल काय? भर दरबारात एका स्त्रीची विटंबना करणारे कौरव तर अधर्मी होतेच परंतु त्या क्षणीच रक्त उसळून कडवा प्रतिकार न करता तो तमाशा चुपचाप बघणार्‍या पांडवांकडे धर्माची बाजू कशी काय येते?

गाणी : खणखणीत नाणी

लेखक आपला अभिजित यांनी रविवार, 24/08/2008 00:27 या दिवशी प्रकाशित केले.
काही गाणी हृदयाचा ठाव घेतात. काही सतत गुणगुणावीशी वाटतात. काही नकळत पाठ होतात. काहींचा ठेका आपल्याला भारून टाकतो. काय असतं त्यामागचं गौडबंगाल? का करतात ही गाणी मनावर गारूड? पूर्वी नव्या सिनेमांतली गाणी सिनेमा आल्यानंतरच ऐकायला मिळायची. किंवा आकाशवाणीवरून. नंतर "छायागीत' वगैरे प्रकार सुरू झाले. त्यानंतर बऱ्याच वर्षांनी "झी'वर "टॉप टेन' आलं. नवीन गाणी ऐकण्यासाठी मी अक्षरशः अशा कार्यक्रमांवर झडप घालायचो. "छायागीत'मध्ये आता कुठलं गाणं लागणार, याची कोण उत्सुकता असायची! "मटा'वगैरे मधल्या जाहिरातींतून "आज या चित्रपटातील गाणे "छायागीत'मध्ये पाहा' असा उल्लेख असायचा.

मिपा - अभिरूची कट्टा....

लेखक प्रभाकर पेठकर यांनी रविवार, 24/08/2008 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळी ११ वाजता सिंहगड रस्त्यावर (नरवीर तानाजी मार्ग) 'अभिरुची बागेत' भेटायचे ठरले होते. धमाल्याचा तसा ऑफिशियल फोनच आला होता. मी तर जाम उत्सुक होतो. ठीक ११ वाजता 'अभिरूची'ला धडकलो. सामसूम. ठार शांतता. ठरल्यावेळी ठरल्या ठिकाणी जाणं आणि इतर सदस्य न आल्याने अर्धा-एक तास लटकणे हे नेहमीचेच. माझे आणि बायकोचे ह्यावरून अनेकदा 'सुखसंवाद' झाले आहेत. (म्हणजे 'सुख' तीला मिळते, मी नुसता वादाचा धनी). तर तिथे कोणीही (मिपाकर) न आल्याने वातावरण तापू लागले होतेच. तेवढ्यात एक जण कोणाशी तरी फोनवर बोलताना दिसला/ऐकला. 'हॅलो! अरे मी मनोबा बोलतोय्... हो मी पोहोचलोय्....बरं! बरं...' फोन बंद.

वाचु आनंदे!

लेखक सौरभ वैशंपायन यांनी शनिवार, 23/08/2008 23:51 या दिवशी प्रकाशित केले.
वाचन, माझ्या सर्वात आवडिच्या छंदांपैकी एक. तसे म्हणाल तर ट्रेकिंग, पेन्सिल स्केचेस, लिखाण हे माझे सर्वात आवडते छंद आहेत, खालोखाल टपाल तिकीटे गोळा करणे, संगीत ऐकणे, फोटोग्राफि, नाणी-नोटा जमवणे हे आणि असे अनेक छंद मला आहेत. एकेका छंदा बाबत थोडं थोडं लिहिन म्हणतोय. तर वाचन माझा आवडता छंद! किती वाचले या पेक्षा काय वाचले हे जास्त महत्वाचं असतं असं मला वाटतं. मुळात आपल्याला वाचता येतं हि भावनाच किती छान आहे?? मराठी-हिंदि-इंग्रजी तर आहेच पण तोडकं-मोडंक गुजराती पण मला वाचता येतं. कदाचित तुम्हाला वाटेल, वाचता येतं! यात काय विशेष? तर मग जे निरक्षर आहेत त्यांचा विचार करा. आणि मग त्यांनी कधी पु.ल.

आता दोषारोपाना जागा नाही आता फक्त प्रेम.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी शनिवार, 23/08/2008 23:48 या दिवशी प्रकाशित केले.
जाता जाता मी शिलाला म्हणालो, "म्हणूनच मी प्रार्थाना करीत असतो,की मला रोज एक नवी चूक करू दे.त्या चुकेतूनच मी काही तरी नवीन शिकेन.आणि म्हणूनच मी मला माणूस समजेन.मात्र तिच चूक परत परत करणारा माणूस होऊच शकत नाही." हा पण एक योगायोगच होता.मी माझ्या पुतणीच्या मुलीच्या लग्नाला जातो काय आणि जवळ जवळ चाळीस वर्षानी मला त्या समारंभात शिलाची भेट होते काय.शिला अमेरिका सोडून कायमची इकडे राहयाला आली होती,हे तेव्हाच मला तिच्याशी बोलताना कळलं.प्रथम मी तिला ओळखलंच नाही.सहाजीकच आहे इतक्या वर्षानी पाहिल्यावर माणसाच्या चेहर्‍यात राहणीत जो बदल होतो तो पटकन लक्षात येत नाही.पण बोलण्याची ढब,हंसतानाची स्टाईल,चेहर्‍या

नाहि चिरा...नाहि पणती....

लेखक सौरभ वैशंपायन यांनी शनिवार, 23/08/2008 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
सैनिक स्वत: स्वतंत्र विचार करत नाहि. त्याने तो करावा अशी अपेक्षाहि नसते. तो शिस्त पाळतो, सज्ज राहतो. काहि ठराविक शब्दांचा उच्चार झाला कि तो यंत्रवत काम करतो. पण त्याचे मन सुद्धा यंत्राप्रमाणेच निर्विकार असेल का? नक्किच नाहि! युद्धाच्यावेळी त्याचा विचारांवर ताबा नसतो, शत्रुला मारायचे या एकाच विचाराने तो पिसाट झाला असतो. पण शीतयुद्धासारख्या परीस्थितीत वर्षानुवर्षे सतत दक्ष अवस्थेत त्याला ’तिष्ठत’ रहावे लागते. कधी आसामच्या किर्र जंगलात, कधी चटके लावणार्‍या थर किंवा कच्छच्या वाळवंटात आणि कधी-कधी सियाचीनसारख्या जगातल्या सर्वात उंच रणभूमीवर हाडं गोठवणार्‍या बर्फाळ थंडीत, तो सज्ज असतो.

फोड रे मटका...

लेखक ऋषिकेश यांनी शनिवार, 23/08/2008 20:44 या दिवशी प्रकाशित केले.
धुंद हे काश्मिर सगळे, एकमेकां मारिती प्रश्न विसरूनी जनांचा, फोड रे मटका धुंद त्या पदकांत सगळे, सुवर्ण कवटाळती प्रश्न हरलेल्या क्षणांचा, फोड रे मटका धुंद त्या खुर्चीत सगळे, राजिनामा खेळती प्रश्न मॅडमच्या खुणांचा, फोड रे मटका धुंद त्या नोटांत सगळे, राज-का-रण आहुती प्रश्न विकलेल्या मतांचा, फोड रे मटका धुंद ते मुंबईत सगळे, वीजपाणी सांडती प्रश्न विझलेल्या दिव्यांचा, फोड रे मटका धुंद अभिषेकांत सगळे, दुधदही अर्पिती प्रश्न सुकलेल्या घशांचा, फोड रे मटका धुंद त्या माडीत सगळे, साकीपेले रिचवीती प्रश्न चुरलेल्या कळ्यांचा, फोड रे मटका धुंद ते तंत्रात सगळे, दो करांनी उपसती प्रश्न वितळत्या हिमाचा, फोड
Taxonomy upgrade extras