राजच्या अटकेमागील 'राज'कारण
मनसे नेते राज ठाकरे यांच्या अटकेच्या फार्सवर सतत दोन दिवस चाललेल्या घडामोडींनंतर आता पडदा पडला आहे. या घडामोडींवर आता पडदा पडला असला तरीही गेल्या दोन दिवसांपासून पडद्यामागे चाललेल्या घडामोडींची चर्चा मात्र राजकीय वर्तुळातून रंगणे साहजिकच आहे. या चर्चेचे गु-हाळ फिरणार आहे, ते राज यांच्या अटकेमुळे नेमका फायदा कुणाचा या मुद्याभोवती.
ठाकरी शैलीतून आणि शिवसेनेच्या आक्रमक मुशीतून तयार झालेल्या राज यांच्यासाठी अशा प्रकारची अटक तशी फारशी नवी नाहीच. यापूर्वीही त्यांनी अनेक आंदोलने केले आहेत. आणि त्यांनाच काय खुद्द बाळासाहेबांनाही अटकेला सामोरे जावे लागले आहे.
मिसळपाव