Skip to main content

भुलण्याचे वय तुझे... सावर सावर

लेखक धोंडोपंत यांनी मंगळवार, 04/11/2008 02:11 या दिवशी प्रकाशित केले.
लोकहो, आज अशी एक घटना घडली की हातून एक ’उपदेशात्मक’ कविता लिहून झाली. ही कविता आमच्या अत्यंत आवडत्या छंदात ८/६/८/६ मध्ये लिहिलेली आहे. या छंदाची लय आम्हाला फार फार आवडते. पहा तुम्हाला आवडते का? (लयीत वाचणे सुलभ जाऊन काव्याचा चांगला आस्वाद घेता यावा, म्हणून जिथे पॉझ घ्यायचा तिथे स्वल्पविराम दिला आहे.
Taxonomy upgrade extras

विशेष सूचना..

लेखक प्राजु यांनी मंगळवार, 04/11/2008 00:23 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या "मी आणि माझा संत ज्ञानेश्वर" या लेखानंतर बर्‍याच जणांनी विचारलं होतं की, हा कार्यक्रम पुन्हा कधी ऐकायला मिळेल. त्या सर्वांसाठी हा कार्यक्रम इप्रसारण ने या आठवड्यात पुन्हा प्रसारीत केला आहे. आज (सोमवार) पासून येत्या रवीवार पर्यंत कधीही हा कार्यक्रम आपण इप्रसारण वर ऐकू शकाल. - प्राजु

लफंगा भूंगा

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी सोमवार, 03/11/2008 23:34 या दिवशी प्रकाशित केले.
रोज रोज ह्या फूलावरून त्या फूलावर गुणगुण गुंजन करणार्‍या भुंग्याला पाहून मनात आलं की एखाद्या लफंग्या व्यक्तिला जसं ह्या गल्लीतून त्या गल्लीत जाण्याची मौज वाटत असते तसंच ह्या भुंग्याला पण एका फूलावरून दुसर्‍या फूलावर जाऊन गुंजन करावं असं वाटत असणार. रोज रोज ह्या फूलावरून त्या फूलावर फिरे हा लबाड भूंगा गुंजन करुनी काय सांगे कळ्याना हा निर्लज्य लफंगा देइ का हा कुणाचा निरोप का उघड करी अपुले स्वरूप गुंजन करूनी काय सांगे कळ्याना हा लबाड भूंगा देई का हा गतऋतुची स्मृति का सांगे काही पुराणी किर्ती असेल कसली रचलेली कथा का दूसरी कसली व्यथा गुंजन करुनी काय सांगे कळ्याना हा लबाड भूंगा आठवे हा कसले प

भिती !

लेखक चाफा यांनी सोमवार, 03/11/2008 22:15 या दिवशी प्रकाशित केले.
ट्रिंग ट्रींग फ़ोनने आपण जिवंत असल्याची घोषणा केली आणि वैतागत हातातले मासिक टाकत निशांतने फ़ोनला हात घातला. " कोण"? त्याच्या आवाजातला वैताग जाणवत होता. " मी स्वप्ना बोलतेय". पलिकडून उत्तर आले. " कोण स्वप्ना" " अरे स्वप्ना, स्वप्नाली तुझी मैत्रिण"! " अरे स्वप्ना तु? इतक्या दिवसांनी नाही वर्षांनी फ़ोन करतेयस? कुठे होतीस इतके दिवस विसरलीस की काय मला?" अरे हो! हो! किती प्रश्न एकदम विचारतोस, तुला माहिताय ना माझ्या पपांच्या बदलीनंतर आम्ही सगळेजण बंगलोरला गेलो". " ते माहीताय गं मला पण त्या नंतर तु माझ्याशी संपर्कच ठेवला नाहीस ईतक्या दिवसांची दोस्ती एकदम कचरापेटीत टाकलीस" "चिडतो काय रे?

अमेरिकेत मराठी बाणा

लेखक आनंद घारे यांनी सोमवार, 03/11/2008 20:07 या दिवशी प्रकाशित केले.
बघता बघता मला अमेरिकेत येऊन एक महिना उलटूनसुध्दा गेला. एवढ्या काळात मी कितीसा अमेरिकाळलो आहे याचा विचार करीत बसलो होतो. इथे आल्यानंतर रोजच्या बोलण्यात आणि लिहिण्यावाचण्यात मी सत्तर पंच्याहत्तर टक्के मराठी भाषेचा उपयोग करतो आहे. मुंबईत हा आकडा कधी पन्नासावर गेला नव्हता. जेवणाखाण्यात आमटी, भात, पोळी, भाजी, शेव, चिवडा, पोहे, शिरा इत्यादी ऐंशी पंच्याऐंशी टक्के मराठी पदार्थच असतात. ते सुध्दा मुंबईपेक्षा जास्त झाले. अंगावरचे शंभर टक्के कपडे मुंबईहूनच आणलेले आहेत. घरातले सामान सुमान, अडगळ आणि पसारा इथे कांकणभर जास्तच आहे. कारण आम्हाला इकडच्या वस्तूही हव्यात आणि तिकडच्याही लागतात.

ज्याचं त्याचं स्वातंत्र्य

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी सोमवार, 03/11/2008 19:01 या दिवशी प्रकाशित केले.
"तुझा देवावर विश्वास नाही हे बरोबर नाही!", "तू मंगळसूत्रसुद्धा का घालत नाहीस?", "तू तरी त्याला सांग जरा मोठ्या माणसांचं ऐकायला!" अशी वाक्य अगदी रोज कानावर आली नाहीत तरी क्वचितच कानावर येतात असंही नाही. दोन्ही बाजूंच्या व्यक्ती बदलतात पण प्रवृत्ती एकच असते; 'जे वर्षानुवर्ष चालत आलं आहे तेच बरोबर आहे', या तत्त्वावर गाढ आणि आंधळा विश्वास असणे! आणि या प्रवृत्तीची रुपं अनेक असतात, काही लोक दुसर्‍यावर आपली मतं लादणार काही स्वतःलाच बंदी बनवणार. देव असो वा कैदी, दु:ख एकच असतं; दोघंही बंदीवान असतात, देवळात असोत वा पिंजर्‍यात!

सेनापती कापशी

लेखक रम्या यांनी सोमवार, 03/11/2008 14:52 या दिवशी प्रकाशित केले.
यावर्षीच्या दिवाळीत काही कामानिमित्त कोल्हापूरला जाणं झालं. कोल्हापूर स्थानकावर पुढारी वर्तमानपत्र घेतलं. पहिल्याच पानावर बातमी होती "सेनापती कापशीत अमूक अमूक घडले". बातमीत "सेनापती" या शब्दाचा काही अर्थ लागेना. थोडा विचार केला नि सोडून दिलं. सी.बी.एस. ला गारगोटी बस पकडून गावी आलो.
दिवसभराची कामं उरकून रात्री आनंदा वारके यांच्याकडे गप्पा हाणायला आलो. नात्यानुसार हे माझे मामा. पण मी त्यांना दादा म्हणतो. व्यवसायाने मराठीचे प्रोफेसर. फार गप्पिष्ट माणूस. बंगल्याच्या दारातली लाईट मुद्दाम घालावली. गावरस्त्यावरील विजेच्या दिव्याच्या अंधूक प्रकाशात संगीत, लेझीम याच्या गप्पा रंगल्या.

दिल्लीतील महाराष्ट्र सदनावर बिहारींचा भ्याड हल्ला

लेखक अनामिका यांनी सोमवार, 03/11/2008 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
आत्ताच समजलेल्या वृत्तानुसार दिल्लीतील "महाराष्ट्र सदनावर" राष्ट्रवादी सेनेच्या बिहारी कार्यकर्त्यांनी भ्याड हल्ला केला आहे. "अति झाले आणि हसु आले "म्हणायची वेळ आली आहे. आता गप्प बसलो तर कायम गप्पच बसावे लागेल. पिसाट सुटलेल्या बिहारींना आणि त्यांच्या लालुसारख्या पुचाट नेत्यांना एकदाच महाराष्ट्राचे पाणी दाखवायलाच हवे.जेणे करुन कायमचे फिरलेले डोके ताळयावर येईल. ही विषवल्ली वेळिच ठेचायला हवी नाही तर उभ्या महाराष्ट्रावर आणि मराठी जनतेवर पश्चाताप करण्याची वेळ येइल हे निश्चित. आता तरी दिल्लीत बसुन खुर्च्या उबवणारे महाराष्ट्राचे प्रतिनिधी काही करणार आहेत?