लेखकवडापावयांनी बुधवार, 05/11/2008 22:26 या दिवशी प्रकाशित केले.
जयते या शब्दाचा मूळ धातू 'जय' हा धातू परस्मैपदी आहे.
थोडक्यात, सत्यमेव जयति हे व्याकरणदृष्ट्या योग्य आहे.
(माझ्या माहितीप्रमाणे)
जय हा धातू उभयपदी असल्यास जाणकारांनी मार्गदर्शन करावे ही विनंती !!
लेखककपिल काळेयांनी बुधवार, 05/11/2008 22:14 या दिवशी प्रकाशित केले.
ह्या सटायर ची मूळ प्रेरणा "दिवाळीतले चमत्कार" असून, फक्त संवादांमधून चित्र उभे करण्याची खुमखुमी ( बराच डायल्यूट शब्द वापरला) सुद्धा एक प्रेरणा स्त्रोत आहे. सहज बसल्या बसल्या चकाट्या पिटताना सुचली कल्पना आणि मग मिपावर टाकेपर्यन्त धीर नाही निघाला...
“ हॅलो, केन आइ स्पीक टू ओबामाजी?”
“ह्हे, व्हूज दॅट?”
“आई येम सतीश मिश्रा, मायावतीज एड फ्राम इंडिया”
“मा या वा ठी , व्हाट्स दॅट?
लेखकसंताजी धनाजीयांनी बुधवार, 05/11/2008 19:53 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार मंडळी,
एक दीड आठवडयापूर्वी तात्यांनी "आजची खादडी" मध्ये एक मस्त माश्यांच्या थाळीचे चित्र [म्हणजे फिश बरं का ;) ] टाकले होते. आणि खाली ब्लॉगचा दुवा होता. तो वाचुन झाल्यावर समर्थ भोजनालयाला भेट देण्याची तीव्र इच्छा निर्माण झाली. पाणी सुटले होते हो तोंडाला!
आणि दिवाळीत सासुरवाडीला [दादर] चाललोच होतो तर म्हटले जावूनच येवूयात.
म्हणुन शुक्रवारी सकाळी ११:३० ला हिंदमाता वरुन ६६ पकडली. तसे बसने फिरणे कमीच. बस वाहकाला सांगितले की बाबा कांदेवाडी आली की सांग. तो काहीतरी बडबडला.
लेखकराघवयांनी बुधवार, 05/11/2008 17:52 या दिवशी प्रकाशित केले.
आज सकाळ पासूनच सतत विठ्ठलाची मुर्ती डोळ्यांपुढे येत होती. म्हटले आज आपल्या हातून माय काहीतरी लिहून घेणार.. नक्की!
तशा २-३ ओळी काल-परवा कडेच मला सुचल्या होत्या पण लिहून काढल्या नव्हत्या! आज मात्र दिवसभरात येवढे लिहून झाले माझ्याकडून.. भगवंताचीच कृपा.. नाही?
लेखकसातारकरयांनी बुधवार, 05/11/2008 15:44 या दिवशी प्रकाशित केले.
Wikipedia वरती, अनेक ठीकाणी मुंबई (Mumbai) ऐवजी Bombay असा शब्द वापरलेला आहे.
कोणी माहीती देता का.. या सदरात मी स्वातंत्र्यवीरांवरील माहीतीची वानवा आहे हे सांगितलेच आहे, तिथेच हेदेखील लिहीले आहे. फक्त तिथे ह्याविषयी सविस्तर लिहायच राहून गेल म्हणून ईथे परत लिहीत आहे.
जर मिपावरील प्रत्येकानी थोडे जरी बदलले तरी सगळ्या Wikipedia वरील बदलाला वेळ लागणार नाही.
हे करण्यासाठी Wikipedia वर आपल्याला पुढील गोष्टी कराव्या लागतील.
१. Wikipedia वर खाते तयार करा (ह्याची सक्ती नाही, ह्याशिवायदेखील काम होत. पण त्या वेळेला आपल्या संगणकाच्या IP ची तिथे नोंद होते)
२.
लेखकचाफायांनी बुधवार, 05/11/2008 15:35 या दिवशी प्रकाशित केले.
त्या दिवशी ऑफ़ीस मधुन घरी आल्यावर घरातली शांतता पाहून जरा दचकलोच. म्हणजे असं की सौ. काहीही कटकट न करता चहा घेउन येतायत, चिरंजीव रोजच्या प्रमाणे घराचा अफ़गाणीस्थान कींवा मालेगाव न करता मनापासुन अभ्यास करतायत. ही असली चित्रं पहायची मनाची तयारी नसताना जरा दचकायला होणारच की हो!!
साधारण आमच्या घरात हे असं गांधीवादी वातावरण बहुधा दिवाळीच्या आसपास आढळून येतं. आणी त्यामुळेच छातीत आणी पोटात अनुक्रमे धस्सऽऽ आणी गोळा आला. त्यातुन सौ.
लेखकघाशीराम कोतवाल १.२यांनी बुधवार, 05/11/2008 13:31 या दिवशी प्रकाशित केले.
बॉलिवूडमधील प्रतिष्ठित निर्माते - दिग्दर्शक आणि छोट्या पडद्यावर महाकाव्य ' महाभारत ' साकारणारे बलदेव राज चोप्रा, उर्फ बी.आर.चोप्रा यांचं आज प्रदीर्घ आजारानं निधन झालं. ते ९५ वर्षांचे होते.
आज सकाळी जुहू येथे राहत्या घरी त्यांची प्राणज्योत मालवली. संध्याकाळी त्यांच्यावर अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. बी. आर. चोप्रा यांच्या निधनानं संपूर्ण सिनेसृष्टी हळहळली. चोप्रा यांच्या मागे, मुलगा निर्माते रवी चोप्रा आणि दोन मुली शशी आणि नीना असा परिवार आहे. सध्याचे आघाडीचे निर्माते यश चोप्रा हे बी. आर. चोप्रा यांचे भाऊ आहेत.
लेखकअरुण मनोहरयांनी बुधवार, 05/11/2008 10:45 या दिवशी प्रकाशित केले.
कळीने कधी विचारला
अर्थ उमलण्याचा?
फ़ुलाने कधी दाखवला
स्वार्थ जपणुकीचा?
उषा पुन्हा निघून गेली
पुसून लाली रंगांची
नाही क्षणही थबकली
वाट पहात टाळ्यांची
निर्झरांना कधी मिळाला
आस्वाद मधु जलाचा?
पाखरांना कधी समजला
आवेग तृप्त करण्याचा?
आईने कधी का केला
कंटाळा भरवण्याचा?
अर्थ कधी ना पुसला
बाळाच्या लाथांचा.