"कसला ह्यो च्या म्हणायचा?? दे वोतुन मोरीत...!!!" आबा कडाडले.. ..
नवीनच लग्न होऊन आलेल्या आबांच्या सुनेचे डोळे भरून आले ... तरीही मन घट्ट करून तिने विचारलेच, "आबाजी, काय झाल जी? चहा गुळमाट झाला व्हय? पर दिसायस तरी बेस दिसतोया... "
"अग बाय, दिसण्यात आणि असण्यात वाईच तरी फरक अस्तो का न्हाय?? तूच पिऊन बघ ह्यो च्या, म्हंजी समजल तुला बी...."
"आता उरला नाय, व्ह्ता नव्हता त्यो समदा तुम्हासणीच दिला नव्हं...." सुनेने उत्तर दिले.
" सक्काळच्या पारीचा "च्या" कसा पाइजी ठाव हाय का तुला?" आणि आबा चहाच्या वर्णात बुडाले...