नार्को चाचणी:एक नैतिक प्रश्न.
नमस्कार,
अलीकडेच मालेगाव प्रकरणात नार्को चाचणीचा वापर करण्यात आला. तेलगी प्रकरण, किंवा निठारी प्रकरण ही ह्या चाचणीच्या वापराची काही ठळक उदाहरणे आहेत. ह्या चाचणीच्या वैधतेबद्दल अनेक कायदेतज्ञांनी, तसेच न्यायालयांनी विविध मते प्रदर्शित केली आहेत. मात्र त्याचे इथे प्रयोजन नाही. हा मुद्दा इथे मांडून आपली मते जाणून घ्यायची आहेत.
आपण सर्वांनीच नागरिकशास्त्रात भारतीय नागरिकांच्या मूलभूत कर्तव्यांचा अभ्यास केला असेल. अत्यंत पवित्र अशा ह्या संविधानाच्या कलमांमध्ये एक मूलभूत अधिकार नमूद केला आहे - एखाद्या गुन्ह्याचा आरोप झालेल्या व्यक्तीस स्वत:विरूद्ध साक्ष देण्यास भाग पाडता येणार नाही.
मिसळपाव