Skip to main content

ह्या लाजिरवाण्या घरात....

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 25/11/2008 14:47 या दिवशी प्रकाशित केले.
२/३ दिवस घरी काही कारणामुळे लवकर जात होतो रात्रीचा, त्यामुळे टि.व्हि. नावाच्या आचरट प्राण्याचा असह्य त्रास हि सहन करावा लागला हो ! परमेश्वरा, अरे काय अर्थहीन आणी महामुर्ख मालीका असतात हो ह्या टि.व्हि. वर. एक मुलगा अपंग, एका मुलाची बायको माहेरच्या श्रीमंतीचा प्रचंड माज असलेली आणी त्याला कयम चुकीचे सल्ले देणारी, मुलगी वेडी आणी हरवलेली, वडिलांना अर्धांगवायुचा झटका आलेला आहे आणी ते कमी कि काय म्हणुन ते तुरुंगवारी सुद्धा करुन आले आहेत येव्हड्यातच. आणी मालीकेचे नाव काय तर म्हणे 'ह्या गोजिरवाण्या घरात'. डोंबलाचे गोजिरवाणे ?

निरभ्र

लेखक श्रावण मोडक यांनी मंगळवार, 25/11/2008 12:52 या दिवशी प्रकाशित केले.
झाकोळल्या सावल्यांनी हुंकार असा का द्यावा डोळ्यांतला तुझा तो मज मारवा स्मरावा
कागदावर झरझर अक्षरं उमटत जातात... दिवसही एखादा असा येतो की आठवणी दाटून येतातच. सकाळच्या वेळी तर हमखास. दाटून येतात त्याही संध्याकाळच्याच आठवणी... 'काय करते आहेस?' आधी 'तू नभातले तारे...'ची गुंजारव. त्याच्या कॉलसाठी आपण लावून ठेवलेली. आणि त्यापाठोपाठ त्याचा प्रश्न. नेहमीचाच. वेळही नेहमीचीच. पश्चिमेला गुलाबी छटा येतात तीच. एक छोटासा संवाद आणि नदीकाठी पुलावरची भेट. नदीही साथ देणारीच. पूर्व-पश्चिम. त्यामुळे पुलाचे दोन्ही कठडे त्या दिशांना. आपण बसायचो तो पश्चिमेचाच.

ना.सी. फडके यांनी शृंगारिक लिखाणाने समाज बिघडवला काय ?

लेखक सागरलहरी यांनी मंगळवार, 25/11/2008 12:48 या दिवशी प्रकाशित केले.
ना.सी. फडके यांनी शृंगारिक लिखाणाने समाज बिघडवला काय ? आपणा सर्वांचे विचार आमंत्रित...

हे नाक तुंबलेले (विडंबन)

लेखक सागरलहरी यांनी मंगळवार, 25/11/2008 12:41 या दिवशी प्रकाशित केले.
माझा हा विडंबनाचा पहिलाच प्रयत्न आहे. आभाळ थांबलेले..... कवि : चारुदत्त दिवाण प्रतिभा आभाळ थांबलेले, मातीही थांबलेली; तेजाचे गर्भ सभोती तेजात ओढलेले. . ध्रु. येते अशी घडी की ध्यानात रानवारा; तू भरिशी चित्र असे की तेजाचे किरण नहाले. . १. जाऊ नकोस आता, सोडू नकोस हाता; नुकतेच साधनेचे ते दीप चेतलेले. . २. तू असता असा सभोती.. मातीची तुटती नाती; श्वासांचे बंध गळोनी प्राणांचे प्राण मिळाले. . ३.
Taxonomy upgrade extras

चटणी रोल

लेखक जागु यांनी मंगळवार, 25/11/2008 11:58 या दिवशी प्रकाशित केले.
अर्धा किलो बटाटे उकडुन पाव वाटी कणिक किंवा ब्रेड कुस्करुन मिठ चविपुरते. चटणी साठी अर्धा नारळ खवुन ४ मिरच्या, तिखट आवडत असेल तर जास्त घ्याव्या अर्धे लिंबु चविपुरते मिठ तळण्यासाठी तेल. क्रमवार पाककृती: उकडलेले बटाटे स्मॅश करावेत. मग त्यात पाव वाटी कणिक किंवा ब्रेड क्रम्स आणि चविपुरते मिठ मिसळुन एकजिव करावे. वरील चटणीचे सर्व साहित्य एकत्र करुन मिक्सरमध्ये चटणी करावी. आता बटाट्याच्या तयार केलेल्या मिश्रवाची चपातीपेक्षा थोडा मोठा गोळा घेउन पोळी लाटावी.

कष्ट करणार्या " तिला "

लेखक दत्ता काळे यांनी मंगळवार, 25/11/2008 11:51 या दिवशी प्रकाशित केले.
दाटले डोळ्यांत अश्रू, ते ही कां विकणार तू ? कष्टाची ना इथे ग किंमत, कां मरेमरेतो जगणार तू ? कर्तव्याची देऊन दाने, अशी किती उरणार तू ? पुण्यासाठी करुनी पुण्ये, उरता उरता विरणार तू. जागजागुनी असंख्य रात्री, वाढविले जरी तू त्यांना जाण येऊनी उडुनी गेले, सांग किती धरणार तू ? कठोर कर्तव्याची केवळ कांस कां धरणार तू ? ध्यास घेऊनी वसंतऋतूचा सांग कधी झुरणार तू ? मागणारे मागतच असतात, सांग किती पुरणार तू ? याचकांचे विश्व सारे, हात किती देणार तू ?

पुण्याच्या बँकेतील अनुभव

लेखक उदय यांनी मंगळवार, 25/11/2008 11:18 या दिवशी प्रकाशित केले.
माझे शिक्षण पुण्यात झाले तेव्हा आलेला एक अनुभव. मी इंजीनियरिंग कॉलेजच्या होस्टेलमध्ये राहात होतो तेव्हा आमची खानावळ होती, तिचे नाव F Club. तिथे काम करायला विठृ्लराव होते. ते दर महिन्याला आम्हाला बिल द्यायचे आणी ते एका बँकेत भरावे लागायचे. ती बैंक जंगली महाराज रोड वर होती. (आता नाव विसरलो.) तिथे काम करणारा कॅशियर एकदम उद्धट होता, पण महिन्यातून एकदाच त्या बँकेत जाणे होत असे, त्यामुळे मला कधी फारसा त्रास झाला नही. पण एकदा मात्र तशी वेळ आली. एकदा मी घाई-घाईत बँकेत बिलाचे पैसे भरायला गेलो तेव्हा slip च्या मागे १०० च्या किती नोटा, ५० च्या किती नोटा ते लिहायला विसरलो.

ज्यावर तुम्ही प्रेम करता तेच करावं.

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी मंगळवार, 25/11/2008 09:33 या दिवशी प्रकाशित केले.
मी एकदा प्राईव्हेट टॅक्सीने मुंबईहून कोल्हापूरला जायला निघालो होतो.टॅक्सीचा मालक मला म्हणाला, "साहेब तुमच्या बरोबर एक गृहस्थ थेट कोल्हापूरला जाणार आहेत.तुम्ही त्यांना घेऊन गेलात तर तुम्हाला प्रवासात कंपनी मिळेल आणि ते तुमच्याशी जातं भाडं पण शेअर करतील." मी म्हटलं ठीक आहे.जायच्या वेळी ते गृहस्थ आले.पिळदार अंगाचा, डोक्यावर अगदी मुद्दाम तुरळक केस ठेवलेला,अंगात सफेद झब्बा,आणि खाली शुभ्र मसराईझ्ड धोतर, गळ्यात एक भरजरी सोन्याची सांखळी,झब्ब्याचं वरचं बटण बळेच न लावलेलं,पण छाती तुळतुळीत एक ही केस नसलेली,पायात कोल्हापूरी चप्प्ल,निमगोरा, असा असामी खड्याआवाजात मला "जय महारष्ट्र" म्हणत टॅक्सी जवळ येऊन उभ

माशांची आमटी

लेखक शोनू यांनी मंगळवार, 25/11/2008 07:44 या दिवशी प्रकाशित केले.
माशांच्या आमटीचा अगदी साधा प्रकार साहित्य १-२ पापलेट, ( २-३ बांगडे, किंवा सुरमईचे १०-१२ तुकडे ) वाटीभर कोलंबी ऐच्छिक एक वाटी ओलं खोबरं ७-८ ब्याडगी मिरच्या १ टेस्पून धणे, अर्धा टी स्पून हळद मीठ, छोट्या सुपारीएवढी चिंच एक छोटा कांदा ,एक इंच आल्याचा तुकडा, दोन-तीन हिरव्या मिरच्या - तिन्ही अगदी बारीक चिरून . २ चमचे तेल ( खोबरेल चालत असेल तर ते, नाहीतर शेंगांचे किंवा कनोला . तिळाचे, ऑलिव्हचे वापरु नये ) माशांचे तुकडे करूनच आणावेत. घरी आणल्यावर थंड पाण्यातून स्वच्छ धुवून घ्यावेत.

हि कार!

लेखक केसुरंगा यांनी मंगळवार, 25/11/2008 03:41 या दिवशी प्रकाशित केले.
प्रदीप कुलकर्णींची 'शिकार!' बघून आमची कार आम्हाला आठवली नसती तरच नवल! ;) ....................................... हि कार! ............................................... उन्हात या कोवळ्या सकाळीच धार येते नि संपता संपता बघा ही दुपार येते! कधी तरी भेटती जुने मित्र सांजवेळी... नशेत होतात छान गप्पा...