Skip to main content

हे नाक तुंबलेले (विडंबन)

लेखक सागरलहरी यांनी मंगळवार, 25/11/2008 12:41 या दिवशी प्रकाशित केले.

माझा हा विडंबनाचा पहिलाच प्रयत्न आहे.

आभाळ थांबलेले.....
कवि : चारुदत्त दिवाण
प्रतिभा आभाळ थांबलेले, मातीही थांबलेली;
तेजाचे गर्भ सभोती तेजात ओढलेले. . ध्रु.
येते अशी घडी की ध्यानात रानवारा;
तू भरिशी चित्र असे की तेजाचे किरण नहाले. . १.
जाऊ नकोस आता, सोडू नकोस हाता;
नुकतेच साधनेचे ते दीप चेतलेले. . २.
तू असता असा सभोती.. मातीची तुटती नाती;
श्वासांचे बंध गळोनी प्राणांचे प्राण मिळाले. . ३.

कवि : चारुदत्त दिवाण यांची क्षमा मागून .....
ओम नमो सरपंचाय धोंडोपंताय |
ओम नमो विसोबा खेचराय |
ओम नमो तात्या चेंगटाय|
ओम नमो केशव कुमाराय | ओम नमो केशव सुमाराय |
ओम नमो बेचव सुमाराय | ओम नमो केशव टुकाराय |

हे नाक तुंबलेले
हे नाक तुंबलेले, सर्दिहि थांबलेली;
कंठात घट्ट अगदी, बडकेच साचलेले .ध्रु.
केव्हातरी घुसावा नाकात स्वच्छ वारा;
तपकीर ही भरी तू, नाकात काय हाले. .१.
खाउ नकोस आता, सोडून दूध भाता;
नुकतेच हे गव्हाचे ते पीठ संपलेले. .२.
डोकेदु़खी सभोती . कफात तट्ट छाती;
श्वासांचे बंध गळोनी प्राणांचे प्राण मिळाले. . ३.

लेखनविषय:
लेखनप्रकार

वाचने 1484
प्रतिक्रिया 1

प्रतिक्रिया

११७ वाचनांवर आमचे विडंबन प्रतिसादाच्या लायकीचे (आणि सुधारणा सुचवायच्या दे़खील ) लायकी चे नाही हे उमजले. सर्व वाचकांचे आभार !