Skip to main content

पश्चात्य प्रसार मध्यमांचा निषेध

लेखक भास्कर केन्डे यांनी गुरुवार, 27/11/2008 19:30 या दिवशी प्रकाशित केले.
मुंबईवरच्या नीच हल्ल्याच्या बातम्या आम्ही सीएनएन वरुन बघत होतो. अशा दु:खद वेळेला आणखी एक क्लेशदायक बाब पहायला मिळत होती. या वाहिनीवर (तसेच त्यांच्या संकेत स्थळावर) भारताच्या नकाशात कश्मिर दाखवतच नव्हते! जागतीक प्रसार मध्यमांनी युनो ने संमत केलेले नकाशे दाखवावेत असा संकेत आहे. युनो ने संमत केलेल्या नकाशात पाकव्याप्त व चीनने गिळंकृत केलेले भाग वगळून काश्मिर भारताच्या नकाशातच दाखवला जातो. अशा संकंट समयी भारतीयांच्या जखमेवर मीठ चोळणार्‍या सीएनएनच्या या मूर्खपणाचा त्रिवार निषेध! या सारख्या प्रसार माध्यमांचा निषेध करण्यासाठी आपण त्यांच्यावर निषेधपत्रकांचा भडिमार करावा असे वाटते.

पोटाची भूक मरणावर मात करते हीच वस्तुस्थीती आहे.

लेखक आम्हाघरीधन यांनी गुरुवार, 27/11/2008 18:27 या दिवशी प्रकाशित केले.
एक बातमी नेहमीच्या सदरातील. भ्याड हल्ल्यांना न घाबरता मुंबईकर पुन्हा सावरले मुंबई - बुधवारी रात्री दक्षिण मुंबईच्या विविध भागात झालेल्या दहशतवादी हल्ल्यांच्या पार्श्‍वभूमीवर मनात भीतीची सावलीही उमटू न देता सामान्य मुंबईकराने गुरुवारी सकाळी पुन्हा एकदा आपल्या दैनंदिन कामाला सुरवात केली आहे. शहरातील सामान्य जनजीवन आता हळूहळू पूर्वपदावर येऊ लागले आहे. "ताज' आणि "ओबेरॉय' हॉटेलमध्ये लपलेल्या दहशतवाद्यांचा खातमा करण्यासाठी लष्कराची कारवाई अजून सुरू असली, तरी छत्रपती शिवाजी टर्मिनस परिसरातील दैनंदिन व्यवहार सुरळीत झाल्याचे चित्र आहे.

अप्रकाशित...

लेखक सरपंच यांनी गुरुवार, 27/11/2008 18:24 या दिवशी प्रकाशित केले.
राम राम, कायदे तज्ञांच्या सल्लामसलतीनुसार काही सुरक्षिततेच्या कारणांकरता सध्या सुरू असलेल्या मुंबईच्या हल्ल्याशी निगडीत सर्व धागे व प्रतिसाद अप्रकाशित करण्यात येत आहेत... आत्तापर्यंत ज्यांनी ज्यांनी या चर्चेत गांभिर्याने भाग घेऊन आपापली मते मांडली त्या सर्वांचे मन:पूर्वक आभार... कृपया सहकार्य करावे... तात्या.

कृती करूया!

लेखक अनंत छंदी यांनी गुरुवार, 27/11/2008 15:57 या दिवशी प्रकाशित केले.
माझ्या मनात एक विचार आला आहे तो मी आपणा सर्वांसमोर मांडत आहे. अतिरेक्यांच्या हल्ल्यात शहीद झालेल्या सर्वांबद्दल आपल्या मनात आदराची भावना आहे. मात्र आता वेळ आहे ती प्रत्यक्ष कृती करण्याची, या हल्ल्यात शहीद झालेले पोलीस वा अन्य खात्यातील कर्मचारी असोत की निरपराध नागरिक त्यांच्या कुटुंबियांना आणि जखमींच्या कुटुंबियांना अशावेळी कोरड्या सहानुभूतीपेक्षा प्रत्यक्ष मदतीची गरज असते त्या करिता आपण सर्व मिसळपाववरील सदस्यांनी यथाशक्ती एक निधी जमवावा व त्या गरजूंना शक्य असेल ती मदत करावी. आपण आपल्या मित्रमंडळींनाही या निधी संकलनात सहभागी करून घ्यावे.

पेन्सिल रेखाटन

लेखक वर्षा यांनी गुरुवार, 27/11/2008 13:46 या दिवशी प्रकाशित केले.
RAFFINE 2B Graphite pencil, Kneaded eraser, regular eraser वापरुन केलेलं रेखाटन. हिमाचल प्रदेशमधल्या एका मुलीच्या फोटोवरुन केलंय ..मला त्या मुलीचे टपोरे डोळे फार आवडले होते...

इंग्लंड संघाचा भारत दौरा रद्द

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी गुरुवार, 27/11/2008 13:27 या दिवशी प्रकाशित केले.
सुरक्षिततेच्या कारणावरुन इंग्लंड संघाने भारताचा दौरा रद्द केला आहे. आधि गुवाहाटि येथे खेळण्यास नकार देणार्‍या इंग्लंड संघाने आता दौराच रद्द केला आहे. मुंबई मध्ये घडलेल्या व घडत असलेल्या घटनांच्या पार्श्वभुमीवर खेळाडुंच्या सुरक्षेचा प्रश्न गंभीर बनल्याचे त्यांचे मत आहे. आगामी चॅम्पियन ट्रॉफी सुद्धा रद्द होण्याची शक्यता आहे.

(कधीच का नाही?)

लेखक चेतन यांनी गुरुवार, 27/11/2008 12:50 या दिवशी प्रकाशित केले.
जयश्री ताइंची कधीच नाही वाचुन आमची झोप उडाली आणि काय म्हणतात ते एक विडंबन पाडले (एक प्रयत्न) http://misalpav.com/node/4738 का बंध रेशमाशी जुळले कधीच नाही गात्रात कंप माझ्या भरले कधीच नाही त्या सॉवळ्याच होत्या रात्री जागून माझ्या वाह्यात वागणे मज जमले कधीच नाही सलवार ही फुलांची मद झुलवीत येते मज त्या लयीत झुलणे जमले कधीच नाही डोळ्यात मोजलेल्या रात्री कितीक माझ्या सत्यात भेटणे तुज जमले कधीच नाही जखमा दिल्या नखाने, जपल्या बर्‍याच सार्‍या का भाव तू दिलेले वठले कधीच नाही पद सोडले सदा मी, सोडेन मी पुन्हा ते का सोडणे तुला मज जमले क

जीवन त्याना कळले हो

लेखक कवटी यांनी गुरुवार, 27/11/2008 12:14 या दिवशी प्रकाशित केले.
बेलापूरला पामबीच रस्ता जिथे संपतो तिथेच एका व्यवसायीक इमारतीत आमचे कार्यालय आहे. त्या इमारतीत वेगवेगळ्या कंपन्यांची कार्यालये आहेत. आणि तळमजल्यावर एका गाळ्यात बसूचे हॉटेल आहे. बसूचे हॉटेल हे हॉटेल कम खानावळ कम पानटपरी कम कोल्डड्रिंक हाऊस आहे. रोज सकाळी ऑफिसला आलो की गाडी लाउन खाली बसूच्या हॉटेलात वडापाव किंवा भजीपाव खाउन चहा सिगरेट मारून मग वरती ऑफिसात येणे हा आमचा नित्याचा क्रम. सकाळी सकाळी बसूची गडबड पहाण्यासारखी असायची.

शहीद पोलीस अधिकारींना अभिवादन

लेखक अंतरंग.... यांनी गुरुवार, 27/11/2008 11:50 या दिवशी प्रकाशित केले.
नुकत्याच मुंबईत झालेल्या अतिरेकी हल्ल्यात शहीद झालेल्या श्री. करकरे, श्री. कामठे व श्री.साळस्कर यांना नम्र अभिवादन तिघेही जाबाज मराठी अधीकारी, मरणाची पर्वा न करता दहशती गोतात घुसले...... श्री. करकरे यांनी वयाच्या ५४ व्या वर्ष देखिल दाखवलेल्या या पराक्रमाला खरेच प्रतीमा नाही......