Skip to main content

मल्याळम सिनेमाशी माझी ओळख

लेखक केदार भिडे यांनी रविवार, 02/05/2021 21:51 या दिवशी प्रकाशित केले.
पुण्यात NFAI च्या कृपेने अनेक परकीय भाषांतील आणि अनेक देशांतील चित्रपट बघायला मिळाले. अन्य देशांचे दूतावास वैगेरे NFAI येथे २-३ दिवसांचे त्यांच्या देशातील चित्रपटांचे महोत्सव अगदी मोफत आयोजित करत. युरोपिअन चित्रपट महोत्सवही सलग २ वर्षे मला बघायला मिळाला. तिथे महोत्सवाची माहिती देणारी छोटी पुस्तिका किंवा पत्रक मिळायचे. अशी मला मिळालेली पत्रके मी जपून ठेवली आहेत. नंतरही ऑस्करच्या परदेशी भाषेतील चित्रपट या वर्गात नामांकन मिळालेले चित्रपट शोधून शोधून पाहत राहिलो. भारतीय भाषांतील चित्रपटांकडे (हिंदी आणि मराठी सोडून) माझे साफ दुर्लक्ष झाले आहे.

पुस्तक परिचय - फुले आणि मुले

लेखक चांदणे संदीप यांनी रविवार, 02/05/2021 20:02 या दिवशी प्रकाशित केले.
लॉकडाऊनसारख्या नीरस काळात घरात बसून काय करावे हा प्रश्न दर दोन दिवसांनी वळवाच्या पावसासारखा गडगडत धावत येतो. घरातली कामे, पाककृतींचे प्रयोग, मुलांसोबत खेळ-मनोरंजन, चित्रपट या सगळ्यांचाही काही काळानंतर तिटकारा येतो. घरातली पुस्तकेही परत परत वाचून झालेली असल्यामुळे ती हातातही धरवत नाहीत. काय नवीन करायचं हा प्रश्न सतत छळत असतो. माझंही आजच्या रविवारी असंच झालं. अशातच एक पुस्तक हाती आले. आचार्य अत्रे यांचे "फुले आणि मुले." नावावरूनच लक्षात येतं की हे पुस्तक लहान मुलांसाठी आहे. आधी कित्येक वेळा वाचलं असलं तरी आता मुलांना वाचून दाखवायच ह्या हेतूने वाचायला घेतलं तर शेवटचं पान वाचूनच खाली ठेवलं.

धारूर, धर्मापुरी आणि अंबेजोगाई - २ (अंतिम)

लेखक एक_वात्रट यांनी रविवार, 02/05/2021 18:56 या दिवशी प्रकाशित केले.
अंबेजोगाई - धर्मापुरी रस्ता सिमेंटचा बनत असला तरी रस्त्याचे काम ब-यापैकी झालेले आहे. एका तासात आम्ही धर्मापुरीला पोहोचलो. किल्ला गावाच्या मध्यभागी, थोड्या उंचीवर आहे. खरंतर याला किल्ला न म्हणता गढीच म्हणणं योग्य ठरेल. मी आत्तापर्यंत पाहिलेल्या किल्ल्यांपैकी हा सगळ्यात छोटा किल्ला असावा. प्रत्यक्ष किल्ला ब-या स्थितीत असला तरी किल्ल्याला लागून असलेला परिसर आणि किल्ल्यात शिरण्याच्या वाटेवर मात्र काटेरी झुडुपे उगवलेली आहेत. अस्वच्छता अर्थातच आहे. शिवाय काही गावकरी किल्ल्याचा वापर हागनदारी म्हणूनही करत असावेत.

आभार

लेखक विनायक प्रभू यांनी रविवार, 02/05/2021 11:30 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार, सतत दर ३०सेकंदाला कानावर पडणार्‍या 'ब्रेकींग न्यूज' ने सुन्न झालेल्या मनाला काहीतरी दुसरा विषय द्यावा म्हणून अमेरिकन राष्ट्राध्यक्षांनी अमेरिकन काँग्रेस समोर दिलेल्या भाषणाची प्रत काल वाचायला सुरुवात केली. ते त्यांच्या राष्ट्रीय नेत्यानी दिलेले भाषण अशीच भूमिका मनात असल्याने वाचताना थोडा सैलावून वाचत होतो. अचानक एक ओळखीची वाचावी अशी फ्रेज 'a once-in-a-generation investment' डोळ्यासमोर आली आणि मी भारतात परत आलो. आरोग्य -शिक्षण -रोजगार या क्षेत्रातल्या येऊ घातलेल्या काही बदलांबद्दल पुढे बरेच काही लिहिले होते पण मला हे नक्कीच जाणवले की हे आपल्याला काही नवे नाही.

प्रमाद

लेखक चंद्रकांत यांनी रविवार, 02/05/2021 11:21 या दिवशी प्रकाशित केले.
वर्तमानाला फक्त प्रयासांच्या परिभाषा अवगत असतात. प्रयत्नांच्या वाटेवर पडलेल्या पावलांच्या पदरवास तो प्रतिसाद देतो. असं असलं तरी सगळ्यांनाच त्याला साद घालणे जमते असे नाही. काळाचे हात धरून चालणे जमले, तरी जुळवून घेणे जमेलच याची शाश्वती नसते. कळत-नकळत काहीतरी घडतं-बिघडतं अन् मांडलेला खेळ मोडतो. उन्हाच्या झळांनी माळाचं हिरवंपण हरवून जावं अन् बहरलेलं झाड डोळ्यादेखत वठून जावं, तसं सगळं शुष्क होत जातं. दिसामासांनी काया करपून जाताना विसकटत जातात डवरलेल्या झाडाचे सगळे संभार. एकेक करून पानं डहाळीवरून निरोप घेतात अन् भरकटत राहतात दिशाहीन, वारा नेईल तिकडे. मागे उरतात श्रीमंती हरवलेल्या डहाळ्या.

चादर ट्रेक - २

लेखक जगप्रवासी यांनी शनिवार, 01/05/2021 23:05 या दिवशी प्रकाशित केले.
चादर ट्रेक १ चादर ट्रेक - २ दिवस पहिला लेह विमानतळावरून आम्ही गाडीने आमच्या हॉटेलवर पोहचलो. लेह येथे हिवाळ्यात जनजीवन तसे अत्यंत शांत असते. फार कुठे हालचाल दिसत नाही. त्याच शांततेचा अनुभव आम्ही आमच्या राहत्या हॉटेलात घेत होतो. दूरवर डोंगररांगा आणि पोह्यावर शेव पसरावी तसा पसरलेला बर्फ. बूट आणि मौजे काढून बर्फात अनवाणी चालायचा अनुभव घेतला. आतापर्यंत फ्रिजमधला बर्फ हातात घेतला होता पण या बर्फाचा स्पर्श वेगळाच.

शत शब्द कथा(ज)

लेखक विश्वनिर्माता यांनी शनिवार, 01/05/2021 14:25 या दिवशी प्रकाशित केले.
१. पश्चिमसमुद्रात खलाशी डोळे उघडल्यावर दनिसला पहीला जाणवलं- सर्वांगातली वेदना, त्यानंतर खारट, फेसाळते तुषार. सोर्नसमुद्रात चाच्यांच्या तोफगोळ्याने कप्तान समुद्रात फेकला गेला, त्याच्या रक्ताचे पारदर्शक रिंगण पाहीले आणि होडीत उडी मारली. तिथे शुद्ध हरपली ती आत्ताच परतली. दनिसने आभाळात असंख्य तारकांकडे पाहीले. नाकव्याचा तारा पश्चिमेकडे कललेला दिसत होता. पश्चिम...! सोर्नच्या पश्चिमसमुद्राच्या कथा त्याच्या डोक्यात भणाणू लागल्या. पर्वताएवढ्या अष्टपादांच्या शाईने काळवंडलेले पाणी... हरवलेली जहाजे... अंधार्‍या तळातले विश्वभक्षकाचे घर... त्याने थरथरत पाण्याकडे नजर टाकली.

‘आदिम तालाचं संगीत’ (“Melodies with a Primitive Rhythm”)

लेखक डॉ. सुधीर राजाराम देवरे यांनी शनिवार, 01/05/2021 13:44 या दिवशी प्रकाशित केले.
- डॉ. सुधीर रा. देवरे “Melodies with a Primitive Rhythm” व ‘आदिम तालाचं संगीत’ ही दोन्ही पुस्तके चेन्नईच्या नोशन प्रेस प्रकाशनाकडून नुकतीच प्रकाशित झालीत, त्या निमित्ताने हा लेख: सांगायला आनंद होत आहे, की 2000 साली प्रकाशित झालेल्या ‘आदिम तालनं संगीत’ या माझ्या अहिराणी कवितासंग्रहाचं नुकतंच इंग्रजी भाषांतरातलं पुस्तक “Melodies with a Primitive Rhythm” या नावाने चेन्नईच्या नोशन प्रेस प्रकाशनाकडून प्रकाशित झालं आहे. या पुस्तकाचं इंग्रजी भाषांतर पुण्याच्या (आणि आता दिल्लीत वास्तव्य) प्रा. राजीव कुलकर्णी यांनी केलं आहे. मूळ अहिराणी कवितासंग्रह डॉ.

जपून ठेव!

लेखक अनुस्वार यांनी शनिवार, 01/05/2021 00:08 या दिवशी प्रकाशित केले.
मी जरा बाहेर जातोय माझे शब्द जपून ठेव. काही तुला आवडलेले काही मुद्दाम न वाचलेले. रात्रीचे, पहाटेच्या स्वप्नांतले बोललेले आणि अबोल राहिलेले. अर्थाच्या शोधात पडू नको तो मलाही लागत नाही. आता शब्दही तुझेच आहेत माझा कोरा कागद पतंग व्हायचं म्हणतोय. अलगद हाताळ या शब्दांना मुलायम असले तरी घावही घालतात. दिसत नाहीत नेहमीच पण असतात जरूर अश्वत्थाम्याप्रमाणे शब्दांनाही शाप आहे अमरत्वाचा. तुझ्याशी नीटच वागतील हे शब्द हृदयातली खळबळ त्यांनी जवळून पाहिलीये. परतीचा प्रवास नाहीच शक्य झाला, तर शब्दांसोबत माझी एक आठवण सुद्धा ठेव. स्वतःला जपून ठेव!

सवय

लेखक अनन्त्_यात्री यांनी शुक्रवार, 30/04/2021 20:43 या दिवशी प्रकाशित केले.
साखरझोपेच्या डोळेजड सीमेवरून हाकारणार्‍या अनघड कल्पनांची वास्तवाच्या धगीत कापूरवाफ होताना बघण्याची आता सवय करून घेतोय मास्कावगुंठित श्वासात अवकाळी पावसाचा विषण्ण मृद्गंध ऊरफोड भरून पाऊसगाणे गाण्याची आता सवय करून घेतोय हताशेच्या महासाथीची "न"वी लाट सकारात्मक विचारांच्या प्लासिबोने नेस्तनाबूत होईलच हे स्वत:ला वारंवार पटविण्याची आता सवय करून घेतोय
काव्यरस