रिक्त
रिक्त
=========================
.
.
काही शब्द.. नुसते,
आतल्या आत उकळत राहतात..
उतूच जात नाहीत.
रटरटत्या पाण्यासारखे..
नुसती वाफ होत राहते..
साठलेल्या भावांची..
चरचरत..
शेवटचा थेंब उडून जाई पर्यंत.
पात्राला फक्त जाणवत राहत..
रिक्त होण्या आधीच..
वाफाळ रटरटणं..!
.
.
=========================
स्वाती फडणीस ..... ११-०१-२००९
मिसळपाव
काचेचं फुलपाखरु करण्याचा प्रयत्न आहे.
जमलय का?
सुचनांचे स्वागत आहे.