प्रजासत्ताक दिन
उद्या प्रजासत्ताक दिन आहे.
बहुतेक सर्व सोसायट्या कॉलन्या आपापल्या आवारात ध्वजवंदन करतील.
ठराविक गाणी म्हणतील. ठराविक छापाची भाषणे करतील.
यातल्या बहुतेकांना स्वातंत्र्य दिन आणि प्रजासत्ताक दिन दोन्हीतील फरक माहित नसेल.
बहुतेकांच्या लेखी दोन्ही दिवस सारखेच. शर्टावर टाचणीने झेंडा लावून फिरण्याचा.
स्वातंत्र्यदिनी आपण ब्रिटिशांपासून स्वतंत्र झालो. तो एक टप्पा होता.
प्रजासत्ताक दिनी 'आपण' आपला देश कशा पद्धतीने चालवणार आहोत हे ठरवले. यादिवशी 'आपण' लोकशाहीची स्थापना केली.
ही लोकशाही अजून आपल्याला समजली आहे का?
आपणच आपला देश (चांगल्या किंवा वाईट रीतीने) चालवीत आहोत अशी भावना दिसत नाही.
मिसळपाव