नुकतीच बातमी आली - म्हणे चलनवाढ, महागाई गेल्या अनेक वर्षांतील निचांकावर! सगळे काही स्वस्तच स्वस्त आणि पुढच्या वर्षी ही वाढ १% वर येणार.
आधीच मालकवर्ग आम्हाला 'मंदी', घटता नफा, घटती उलाढाल, नोकरकपात वगैरेचा बागुलबुवा दाखवुन घाबरवत आहे आणि आता ही बातमी म्हणजे दुष्काळात तेरावा महिना. हातात कोलीत मिळालेल्या माकडागत आता मालक लोक सांगणार, अरे लेको दरवाढ खल्लास, स्वस्ताई येत्त्ये; मग तुम्हाला पगारवाढ सोडाच, पगारकपात करायला हवी!
महागाई घटली म्हणजे नक्की काय झाले? काय स्वस्त झाले? कटिंग, वडापाव, भाज्या, धान्य सगळे आहे तसे आहे.