Skip to main content

गजल का सफर. -

लेखक मॅन्ड्रेक यांनी बुधवार, 25/03/2009 13:28 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार. दत्तप्रसाद रानडे आणि स्वरदा गोखले ह्यांच्या 'गजल का सफर' कार्यक्रमाचे महाराष्ट्र मंड्ळ - लंडन व इतर ठिकाणि २७ मार्च ते ८ एप्रिल या कालावधित प्रयोग होणार आहेत.रसिक मिपकरानि अवश्य आनंद घ्यावा.

शाळा

लेखक जागु यांनी बुधवार, 25/03/2009 13:12 या दिवशी प्रकाशित केले.
आठवते मज शाळा शाळेतील फळा पृथ्वीचा तो गोळा अन बेकंबे चा पाढा ! भिंतीवरचे सुविचार घडवित होते आचार मास्तरांची छडी घाली शिस्तीची घडी पुस्तकातील धडा भरे ज्ञानाचा घडा कवितेचे पठण लावे आयुष्याला वळण शाळेची मधली सुट्टी डब्यासंगे जमे गट्टी सर्वत्र आरडा ओरडा शिक्षेसाठी उठा बशा पिटीचा एक तास मैदानाची पाहे वाट कसरत अन कवायती श्रमाचीही कळे मती जन गण मन ची सुरूवात वंदे मातरमने शेवट संस्कारांची ही देवाण जीवनातील ही ठेवण.
Taxonomy upgrade extras

हा प्रसंग कोणता ?

लेखक बामनाचं पोर यांनी बुधवार, 25/03/2009 12:40 या दिवशी प्रकाशित केले.
नक्षत्रांचे देणे - भीमसेन जोशी .. ahonkan च्या कृपेने संपुर्ण कार्यक्रम youtube वर उपल्ब्ध आहे . यामधे भीमसेनजींचे बरेच नवे-जुने दुर्मिळ फोटो आहेत. एका फोटोतर .. बाळासाहेब ठाकरे , पु.ल देशपांडे व भीमसेन जोशी एकत्र !! क्या बात है... ( http://www.youtube.com/watch?v=JVuslTpTmPw २:५० वर पहा ) या दिग्गजांना एकत्र आणणारा असा कोणता प्रसंग असावा ?.. कोणाला माहिती आहे का?

तु नसताना.... !

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी बुधवार, 25/03/2009 12:04 या दिवशी प्रकाशित केले.
तु नसताना..... ! हा चंद्र फ़िका वाटतो.. गूढ भासतो..सखे.. तु नसताना.... विमनस्क नभी हिंड्तो... खुळा हासतो.. सखे.. तु नसताना... हरपला ओठीचा सूर.. धडधडे उर.. मनी काहुर.... डोळ्यात दाटला पूर.. रंग बेनूर... सखे.. तु नसताना.... [१] हा उदास वाहे वारा.. त्यास आवरा.. कुणी सावरा... शोधितो गंध बावरा... होई कावरा.. सखे.. तु नसताना... [२] र्‍ह्दयात कोंडला श्वास.. दीर्घ निश्वास.. स्तब्ध अवकाश... चालला रवि अस्तास... ओठी बिभास... सखे.. तु नसताना... [३] निःशब्द निळ्या अंगणी.. बघ मुकी शुक्र चांदणी .... व्याकुळ चंद्र मीलनी... कशी विरहिणी ... सखे.. तु नसताना...

पोपट झाला रे ..........!

लेखक विशाल कुलकर्णी यांनी बुधवार, 25/03/2009 11:44 या दिवशी प्रकाशित केले.
परवा दिवशी सकाळी ऑफीसमध्ये आलो तेच एकावर एक धक्के खात. नेहमीप्रमाणे गेटवर बाईक थांबवली आणि एकदा हॉर्न देवुन वाट बघत बसलो. आमचा सिक्युरिटी गार्ड गेट सोडुन कुठेही असु शकतो. त्यामुळे रोजची सवय झालीय आता , हॉर्न द्यायचा आणि गाडी बंद करुन त्याची वाट बघत बसायचे. परवा दिवशी मात्र हॉर्न वाजवला आणि साहेब हजर.... मी अवाक वगैरे झालो..., " किशनजी आज तबियत तो ठिक है आपकी?" तो आपला उगीचच हसला.. " का करे साहब, हम तो नामका सिक्युरिटी गारड हु, बाकी काम तो सब करने पडत है हिया!

व पु

लेखक विनायक पाचलग यांनी बुधवार, 25/03/2009 10:00 या दिवशी प्रकाशित केले.
आज २५ मार्च २००९ प्रख्यात लेखक व.

दिवस जूने भुलायचे,काळजी वाचून जगायचे

लेखक श्रीकृष्ण सामंत यांनी बुधवार, 25/03/2009 08:27 या दिवशी प्रकाशित केले.
आज प्रो.देसायांच्या आयुष्यातला आनंदाचा दिवस उजाडला. महिन्याला शेकडो डॉलर देऊन दोघांसाठी खाजगी विम्याचा हाप्ता द्दायला पैसा खूपच खर्च व्हायचा.आज पासून सरकारने त्यांना मोफत विमा द्दायचा निर्णय कळवला. हेल्थ स्कीममधून सिनियर सिटीझननां ही सवलत होती. भाऊसाहेब मला फोन करून म्हणाले, " जुने दिवस आता भुलायला पाहिजेत.
Taxonomy upgrade extras

तू पुन्हा केव्हा जरी...!

लेखक केशवसुमार यांनी बुधवार, 25/03/2009 04:20 या दिवशी प्रकाशित केले.
आमची प्रेरणा प्रदीप कुलकर्णींची सुरेख गझल तू म्हणे केव्हातरी...! ........................................... तू पुन्हा केव्हा जरी...! ........................................... ... आज मज थोडी उशीराने सकाळी जाग आली! कालच्या रात्री जराशी वारुणी मी जास्त प्याली! रोज मी माझ्या मनाला सांगतो की आज नाही... आणि संध्याकाळ होता बारची मी वाट चाली! चालली आहे हिच्याशी ही कधीपासून मज्जा... प्रश्न बापाने तिच्या हा टाकला होता निकाली!

"मिसळपाव" - काही सूचना (अधिक सदस्योपयोगी होण्यासाठी...)

लेखक वाचक यांनी मंगळवार, 24/03/2009 23:00 या दिवशी प्रकाशित केले.
नमस्कार सुहृदहो... माझा बराच वेळ मिपा वाचण्यात जातो. मला खात्री आहे इतरांचा ही जात असणार. त्या वेळाचा जास्तीतजास्त इफेक्टीव्हली वापर व्हावा म्हणून हा काथ्याकूट ! कुठल्याही संकेतस्थळावर, विशेषतः जे नियमित अद्ययावत होत रहाते, त्यावर सर्वात महत्त्वाची माहिती ताबडतोब मिळावी असा उद्देश, प्रयत्न असतो. मिपाही त्याला अपवाद का असावे ? संस्थळावर येणार्‍या वाचकांचे दोन गट - एक नियमित आणि दुसरे (क्वचित किंवा) प्रथमच येणारे. (त्यातही वाचनमात्र असलेले) ह्या दोघांना उपयोगी पडतील अशा गोष्टी मुख्यपॄष्ठावर असाव्यात अशी अपेक्षा.