मराठी साहित्य, संस्कृती आणि लेखनाचे व्यासपीठ

तू पुन्हा केव्हा जरी...!

केशवसुमार · · जे न देखे रवी...
लेखनविषय:
आमची प्रेरणा प्रदीप कुलकर्णींची सुरेख गझल तू म्हणे केव्हातरी...! ........................................... तू पुन्हा केव्हा जरी...! ........................................... ... आज मज थोडी उशीराने सकाळी जाग आली! कालच्या रात्री जराशी वारुणी मी जास्त प्याली! रोज मी माझ्या मनाला सांगतो की आज नाही... आणि संध्याकाळ होता बारची मी वाट चाली! चालली आहे हिच्याशी ही कधीपासून मज्जा... प्रश्न बापाने तिच्या हा टाकला होता निकाली! तू पुन्हा केव्हा जरी दिसलास ह्या गल्लीतसुद्धा... सांगतो आहे तुझ्या मी काढेन रे सोलून साली! एवढा हा ढोस मजला आणि शब्दांनी मिळाला... (... वाटला होता मला बाबा तिचा पुरता मवाली! ) ही कथा एकाच ओळीची...पुढे सरलीच नाही... 'सांगता अमुच्या कथेची शेवटी मदिरेत झाली! ' सूर्य अस्ताला निघाला की पुन्हा तय्यार होतो... रंगते चर्चा जुनी अन ओतता पेल्यात लाली! तू म्हणे केव्हातरी लिहितोस "केश्या" काव्यसुद्धा... सांग मग तू का कवींच्या काढशी सोलून साली? - केशवसुमार ................................. रचनाकाल ः २४ मार्च २००९ .................................

वाचने 2284 वाचनखूण प्रतिक्रिया 9

राघव 25/03/2009 - 10:22
हसून हसून मेलो.. वारलो.. बाप रे.. !! चालली आहे हिच्याशी ही कधीपासून मज्जा... (... वाटला होता मला बाबा तिचा पुरता मवाली! ) 'सांगता अमुच्या कथेची शेवटी मदिरेत झाली! ' सूर्य अस्ताला निघाला की पुन्हा तय्यार होतो... हे म्हणजे खास हात झालेत.. ब्येश्टेश्ट!! अन् हा कहर.. तू म्हणे केव्हातरी लिहितोस "केश्या" काव्यसुद्धा... सांग मग तू का कवींच्या काढशी सोलून साली? =)) =)) =)) तुम्हाला कोपरापासून हात जोडलेत.. राघव

जयवी 25/03/2009 - 10:43
केशवसुमारा....तुम्हाला साष्टांग दंडवत....!! तुस्सी ग्रेट हो :)

विशाल कुलकर्णी 25/03/2009 - 12:00
=)) गुरुजी..चरणस्पर्ष !! सस्नेह विशाल ************************************************************* इतक्या वर्षानंतर तिला पाहिली तेव्हा कशी भासली सांगु.... कल्पनेतला "ताजमहाल" हिणकस ठरला !!! :-) :-)

केशवसुमार 26/03/2009 - 18:10
प्रतिसाद दिलेल्या आणि प्रतिसाद न दिलेल्या सर्व वाचकांचे मनापासुन आभार!! (आभारी) केशवसुमार..