Skip to main content

पहिली भेट

लेखक जागु यांनी बुधवार, 01/04/2009 14:56 या दिवशी प्रकाशित केले.
आठवते तुला भेट आपली पहिली पहिल्या भेटीतली गुपिते पहिली हवे तर विचार त्या लाटांना रोजच येतात त्या किनार्‍याच्या भेटीला सुर्यही तुझी वाट पाहत रेंगाळला होता तू आलेला पाहुन निर्धास्त मावळला होता यायला तुला खुप उशिरच झाला होता पण तुझ्या आगमनात अपराधी भावच नव्हता माझा रागही मी तेंव्हा व्यक्त केला नव्हता जवळून तुला न्याहाळण्याचा धिरही होत नव्हता बसलो होतो आपण ज्या दगडावर, विचार त्याला माझा थरथरता देह त्यानेच सावरला होता विचार त्या घोंघावत्या वार्‍याला तो ही सांगेल माझी ती ओशाळली स्थिती जेंव्हा तू हात माझा धरलास बांगडी पाहण्यासाठी दुरावा दुर करण्याचे तुझेही ते होते निमित्त पण तुझ्यात हरवले होते तेंव्ह
Taxonomy upgrade extras

आठवण.... !

लेखक चंद्रशेखर महामुनी यांनी मंगळवार, 31/03/2009 16:10 या दिवशी प्रकाशित केले.
आठवण.... !! आठवणींनी तुझ्या साजणी..र्‍ह्दयाला ग पीळ पडे.... कशी ऐकीशी साद सखे परि... मी इकडे अन तु तिकडे... हे गड्द जांभळे मेघ होउनी...वाटे यावे तव अंगणी... रातराणीचा सुवास होउन.... मी गंधावे तव सदनी... सागरास नदी मिळे कशी ग.. रिती-नीती चे बांध खडे कशी ऐकीशी साद सखे परि... [१] मेघ-वृक्ष अन पान-फ़ुले.. अवखळ निर्झर उंच कडे... चंद्र-चांदण्या हे वारे.. मज भास दाविती तुझे गडे... शोधि तुजला जीव खुळा बघ.. होउन पक्षी चोहिकडे कशी ऐकीशी साद सखे परि... [२] आज जरी तु दूर असे.. प्रिया न माझी मला दिसे... ऐलतीरी मी उभा साजणी..मनी प्रितीचे गीत वसे... ओठांवरचे भावतराणे..

तुमचे एप्रिल फूल

लेखक निशिगंध यांनी मंगळवार, 31/03/2009 15:50 या दिवशी प्रकाशित केले.
एक नविन विषय सुचला आहे. तुमचा प्रतीसाद आवश्यक आहे. कधी तरी तुम्ही कुनाला केले असाल किंवा तुम्ही कुणाचे झाला असाल हो. अहो एप्रिल फूल चे शिकार हो!!!!!!!!! तर मग करा त्या आठवणी ताज्या सर्वासोबत. माझे सांगतो तसे खुप प्रसंग आहेत. पण एक खास. मला एका मित्राचा फोन आला एप्रिल फुल च्या सकाळी. माझ्या लक्षातच नाही राहीले की आज एप्रिल फुल आहे म्हनुन. त्याच्या फोन मधुन बस चा गोंगाट होता. मला म्हणाला मी सोलापूर आलो आहे ( मी मुळचा सोलापूर चा). आणी मी अक्कलकोट ल चाललो आहे, तु जर येत असला तर ये.

सबप्राईम क्रायसिस--पुढे काय?

लेखक क्लिंटन यांनी मंगळवार, 31/03/2009 13:38 या दिवशी प्रकाशित केले.
अमेरिकेतील सबप्राईम क्रायसिसची सुरवात आणि ते संकट जगभर कसे पसरले याचा उहापोह बामनाच्या पोराने सुरू केलेल्या या चर्चेत झालाच आहे.आता या संकटाची पुढील पावले कशी पडतील यावर माझे भाष्य करत आहे.

शर्त - The Challenge

लेखक फारएन्ड यांनी मंगळवार, 31/03/2009 12:39 या दिवशी प्रकाशित केले.
हा चित्रपट पाहताना बाजूला काढून ठेवलेल्या डोक्यात आलेले विचार.... ष्टॅट... हीरो रागाने बघतोय असा पोस्टर म्हणजे अ‍ॅक्शन पॅक्ड वगैरे पिक्चर असावा. बघू. काही गुंड, अतिरेकी वाटणारे लोक कोठेतरी बॉम्ब फोडायच्या तयारीत आहेत. पण स्क्रीन वर एक नुस्ताच बूट दिसतो जाड सोल वाला , मग एक पिस्तूल 'क्लिक' होते. आणि कमांडो च्या वेषातील काही लोक तिकडे जाताना दिसतात व एक एक करून ते गुंड मारले जातात. लगेच एक स्टेज, रॉक स्टार च्या पोज मधे कोणीतरी उभा. हजारो प्रेक्षक दोन्ही हात (लोकल च्या डब्यांना जसे 'चौकट' आकारात वरच्या वायरींना जोडणारे पेंटोग्राफ असतात तसे) वरती जोडून डोलतायत.

आमने सामने

लेखक परिकथेतील राजकुमार यांनी मंगळवार, 31/03/2009 12:15 या दिवशी प्रकाशित केले.
(सदर लेख हा फक्त मौजमजा आणी मिपाकरांना थोडेसे हास्य क्षण द्यावेत म्हणुन लिहिला आहे. लेखात ज्या ज्या मिपाकरांची नावे आली आहेत त्या पैकी एकाचीही मी ह्या साठी परवानगी घेतलेली नाही. ह्या लेखा मागच्या भावना समजावुन घेउन तुम्ही मला माफ कराल असा मनात विश्वास (म्हणजे आपले पानिपत होणार नाही) आहे. ह्या लेखात झालेल्या उल्लेखानी कोणी दुखावले गेल्यास मी त्याची आधीच जाहिर माफी मागत आहे.