Skip to main content

पुष्पक यानात भानू आणि पार्वती

लेखक नरेंद्र गोळे यांनी मंगळवार, 07/04/2009 13:13 या दिवशी प्रकाशित केले.
पुष्पक यानात भानू आणि पार्वती पुष्पक यानात भानू आणि पार्वती. मूळ हिंदी लेखक: गोरा चक्रबर्ती, अनुवादकः नरेंद्र गोळे पहिले सादरीकरणः श्री.अशोक चिटणीस व सौ.शुभा चिटणीस, १४-१२-२००८ रोजी भवन्स सभागृह अंधेरी येथे. सार्वजनिक सादरीकरणाच्या अनुमतीसाठी 'मिपाच्या पोस्ट हापिसाचा' उपयोग करून मला पत्र लिहा. प्रस्तावनाः भानू आणि पार्वती पुष्पक यानात बसलेले आहेत. गंतव्य स्थळः चंद्र. काही क्षणातच उपग्रह प्रक्षेपण वाहनातून, पुष्पकयान अवकाशात प्रक्षेपित होणार आहे. थुंबा प्रक्षेपण केंद्रात उलटी मोजणी सुरू झालेली आहे. दहा, नऊ, आठ, सात, सहा, पाच, चार, तीन, दोन, एक, शून्य ...

निनावी नगर

लेखक जागु यांनी मंगळवार, 07/04/2009 12:46 या दिवशी प्रकाशित केले.
एक नगर असावं निनावी तेथे कुणी न राजा न राणी मानवतेची जात असावी समानतेची साथ असावी रुपया नाणी नसो व्यवहारी असो माणूसकीची देणी घेणी अनाथ आश्रमे तेथे नसावी वृद्धाश्रमेही ओस पडावी कायद्याची वाट नसावी मंदीराला हाक असावी एकात्मतेची असो दिवाळी स्वार्थाची पेटावी होळी प्रेमाची बरसात असावी मायेची पालवी फुटावी पौर्णिमा येथेच खिळावी अमावस्येला जाग न यावी.
Taxonomy upgrade extras

अनाथाश्रमाची भेट!

लेखक उमेश कोठीकर यांनी मंगळवार, 07/04/2009 10:58 या दिवशी प्रकाशित केले.
अनाथाश्रमी जाण्या झाले निमित्त दु:खाचे बाळ सोडून गेले माझे दोन दिवसांचे अनाथश्रमी मी गेले दु:ख हलके कराया माझ्या बाळाच्या आठवाने फुले देवाची बघाया पोचताच मी तेथे बाई समोर आली करडा आवाज देता मुले पळत आली हात जोडून सारी माझ्या समोर बसली फुले देवाची निष्पाप धुळीत मातेने फेकली कोणी छोटी कोणी मोठी ठायी त्यांच्या फक्त आशा आई बाबा या हो लवकर! रडवेली त्यांची दशा! चूक आमची काय? आम्ही देवाघरची फुले तुम्ही तरी न्या हो घरी! आईबाबा आठविले भाव निरागस त्यांचे हसू ओळखीचे वाटे आई आली का न्याया?
Taxonomy upgrade extras

आणखी एक कला

लेखक धनंजय यांनी मंगळवार, 07/04/2009 05:15 या दिवशी प्रकाशित केले.
आणखी एक कला *** हरवायची कला नाही कठिण शिकायला. इतक्या वस्तू बनल्या आहेत घेऊनच आस हरवायची - ती आपत्ती नको वाटायला. * रोज काही हरवू द्या - होऊ दे गडबड शोधायला - हरवा छल्ला चावीचा, जाऊदे वाया एक तास. हरवायची कला नाही कठिण शिकायला. * सरावाने भराभरा, भारंभार लागा हरवायला नावांस, ठिकाणांस, सफर करायच्या त्या स्वप्नांस हरवू देत.
Taxonomy upgrade extras

रंगांची गोष्ट!

लेखक उमेश कोठीकर यांनी मंगळवार, 07/04/2009 00:13 या दिवशी प्रकाशित केले.
फार फार वर्षांपूर्वीची गोष्ट..... सगळे रंग..कॅनव्हासवर सुखाने रहात होते.. हिरवा,निळा,भगवा वगैरे..! आपापल्या जागी सुखी होते... कॅनव्हास पण समाधानी.... पांढरी रंगाई पण सुखाने नांदत होती... हिरवा हळूहळू पसरत होता...उगीचच निळा.. तसा नविन.. हसत होता... भगवा..एकटाच! तळपत होता.. सगळे आपापल्या जागी ...मजेत पण....कली आला..! गर्जला... "सगळे सुखी? चांगले..? पांढरा पण..? दाखवलेच पाहिजे..कॅनव्हासला!" हळूच म्हणाला रंगांना,"हिरवे मियाँ; पसरा खूप अजून, देतील नाहीतर हाकलून..!" "अहो निळेबाबा, तुम्ही नविन ना? घ्या ना जागा हक्काची! राखीव.!.मागेच रहाल" "काय भगवे राजे? कसले हो? मोठे व्हा!
Taxonomy upgrade extras

(सहा) हजार चौरासी की मां!

लेखक आपला अभिजित यांनी सोमवार, 06/04/2009 23:20 या दिवशी प्रकाशित केले.
तसा नेहमीचाच रविवार. सकाळी उशिरा उठल्यानंतर चहा कुणी करायचा यावरून भांड्याला भांडं (चहाच्या नव्हे!) लागलेलं. नंतर नाश्‍त्याला काट मारून थेट पावभाजीच्या जेवणाचाच बेत. पाव किती आणायचे, कुणी आणायचे, मीच का आणायचे, यावरून पुन्हा एक `लडिवाळ' संवाद! शेवटी घरचा कर्ता (आणि आठवडाभर नाकर्ता) पुरुष म्हणून जबाबदारी अस्मादिकांवरच! वर "फुकटचं गिळायला मिळतंय, हे नशीब समजा!' हा कृपाप्रसाद!! झक्‌ मारत पाव आणायला नि बाकी कचरापट्टी जमवायला बाजारात रवानगी. मग `जातोच आहेस, तर माझ्या बॅंकेतून पैसेही काढ' ही एक प्रेमाची गळ. मुंडी हलवून संमती देण्याव्यतिरिक्त दुसरा पर्यायच नाही!

(मी एकदा चहा केला)

लेखक ३_१४ विक्षिप्त अदिती यांनी सोमवार, 06/04/2009 19:19 या दिवशी प्रकाशित केले.
प्रेरणा काल अचानक डोक्यात आले चहा बनवून पाहू वाटले चहा बनवायला लागतेच काय? चहा, साखर अन थोडीशी साय भरकन जाऊन खरेदी केली आधणासाठी छोटी पातेली घेतली आधी काकूला फोन केला चहाचा चमचा (किती मोठा) विचारून घेतला हाय!
Taxonomy upgrade extras