अनंगरंग
धुंद एकांत हा - तुझ्या सवेच रंगतो
प्रणयाचा पूर ही - र्हुदयी या उधाणतो ।
स्पर्श स्पर्श जागवी अनोखीच चेतना
श्वास श्वास धुंद हा तनूवरी विसावतो ।
उष्ण अधर कापती - रंगती कपोलही
मुक्त कुंतलात या जीव तुझा गुंततो ।
झंकारे देहवीणा तुझीया कवेत रे
रासझूला चांदवा - अनंगरंग उसळतो ।
विखूरले उशीवरी चांदणे अजूनही
नाहूनी प्रीतीत मन मोगराही उमलतो ।
बरसत्या चांदण्यात तारकांच्या मैफिली
रातराणी बहरे, धुंद चाफा दरवळतो |
उजाडले तरी.....
मि.पा.कर ,
सप्रेम नमस्कार !
सोबत एक गझल जोडत आहे.....पहा जमली आहे का !
उजाडले तरी .....
उजाडले तरी न कां , तांबडे मला दिसे?
केस मोकळें जयांत वदन गुंतले असे !
दरवळतो मोगरा अजूनही उशीवरी
चुरगळल्या कांतीला गंध कसा येतसे?
झुळझुळत्या साडीच स्पर्श मऊ मखमली
दूर जरी झालीस तू , बोलतात की ठसे !
विचारले न मी तुला , बोललीस तू कुठे?
"ये मिठीत - घे मिठीत " उभयतांस हे पिसे !
सळसळत्या बांगड्या रुमझुमती पैंजणे
अजून यौवनांत तू , अजून मी असा फसे !
Taxonomy upgrade extras
एकाच रंगातून मिळणारी भरपूर समझ-ऊन्हाचा चष्मा.
काही लोकांचं जीवनच दुःखदायी असतं.बरेच वेळां त्याना वाटत असतं की आपण दुःख घेऊनच जन्माला आलो आहो.माझा चुलत भाऊ गिरीश ह्याचं जीवन काहीसं असंच आहे.आयुष्याच्या ऐन उमेदीच्या काळात बिचार्याची दहा वर्षाची मुलगी एका अपघातात गेली.त्याच्याच हलगर्जीपणामुळे वीणा गेली हे त्याच्या मनाला लागलं होतं.वीणा गेल्याचा धक्का गिरीशला एव्हडा बसला की त्याला जीवनच नकोसं झालं होतं.पण निसर्गाची गंमत आहे बघा.निर्मीती ही निसर्गाची आवश्यक जरूरी असल्याने जीवनाचा र्हास होणे त्याला न लगे.
म्हणून कुणाचाही सहजासहजी मृत्युला मिठीमारण्याचा प्रयास निसर्गच उधळून लावतो.
"अबोली"
आज राहुलने मला घरी बोलावले आहे, त्याला माझ्या बरोबर काही तरी महत्वाचे बोलायचे, विचारायचे आहे.
मला कल्पना आली आहे, तो आज मला काय विचारेल, मी माझ्या मनाची तयारी करून ठेवली आहे.
साहिलने कार काढली आणि राहुलच्या घरी जायला निघाला, राहुलच्या घराकडे जाताना मध्ये एक सुंदर तलाव लागतो ५ मि.
भीमाशंकर : खांडस मार्गे [अंतीम]
संपुर्ण अल्बम इथे पहा
भाग १
पायवाट संपुन भीमाशंकरचा पायथा सुरु झाला. वेडे-वाकडे खड्डे, खाच खळगे, उभी चढण आणि पायाखाली सरकणारे दगड आमचा वेग मंदावू पाहत होते. बघता बघता अंधार पडला, आमच्या पुढे अथवा मागे कोणताही ग्रुप नसल्याची जाणिव नव्याने झाली, आणि भर भर पुढे जाण्याच्या नादात विखुरलेले आम्ही १४ जण खर्या अर्थाने एकटे पडलो.
<तक्रार>
प्रेरणा
अमावस्येचा बघतो तुझा चंद्र कधीचा
अंधारले नयन दर्शना घाबरले
का डांबर सदा बरसले तुजवरी
बरसताना बरे मला ते विसरले ;)
अगडबंब देह काळवंडलेली काया तुझी
वाटेवरुन तुझ्या रेडेही मागे सरकले
घाबरले तुज पाहता भुत पिशाच्च आणी हडळी
येता तु गल्लीमधले माझ्या श्वानही टरकले
जळफळली कढई, सखे तुज पाहता
गोंजारता गाल तुझे बघ माझे हातही करपले
आपला,
मराठमोळा.
Taxonomy upgrade extras
जय हो "आंतरराष्ट्रीय" अभिव्यक्ती-स्वातंत्र्य!
'स्लमडॉग मिलेनियर' हा चित्रपट भारतीयांनी बघितला. त्याला ऑस्कर मिळाले. सर्वोत्कृष्ट चित्रपट म्हणून. तसेच 'जय हो' या गाण्याला ही पुरस्कार मिळालेत.
या चित्रपटाकडे एका दृष्टीकोनातून बघितल्यास असे वाटते की, यात भारतातील सत्य पण वाईट गोष्टी म्हणजे झोपडपट्टी, गरिबी, दंगे, बाल गुन्हेगारी असे प्रकार दाखवलेत. या पूर्वी लगान ऑस्कर मध्ये जावूनही त्याला पुरस्कार मिळाला नाही कारण त्यात इंग्रज लोकांविरुद्ध आपण जिंकतो असे दाखवले आहे. लगान हा सगळ्याच बाबतीत 'स्लमडॉग मिलेनियर' पेक्षा सरस होता.
वॉकओव्हर ?
मागल्या आठवड्यात मी मध्यप्रदेशातील विदिशानगरीला गेलो होतो. तेथील स्थानिक हिन्दी दैनिकात आणि लोकांच्या बोलण्यात त्या वेळी एकाच विषयाची चर्चा चालली होती. मुंबईच्या वर्तमानपत्रात हे वृत्त आले होते की नाही हे मला माहीत नाही म्हणून मिसळपावच्या वाचकांसाठी ते इथे थोडक्यात देत आहे.
तेथील लोकसभेच्या जागेसाठी भाजपच्या सुप्रसिध्द नेत्या श्रीमती सुषमा स्वराज या उभ्या आहेत. कॉंग्रेसतर्फे राजकुमार नांवाच्या एका गृहस्थांना ही सीट दिली गेली होती. त्यांनी त्यासाठी फॉर्म भरला आणि त्यांचेच बंधु देवकुमार यांनी डमी कँडिडेट म्हणून.
मिसळपाव
(सविस्तर माहितीसाठी
(सविस्तर माहितीसाठी